धमुचे केळवण (जेव्हा पुरी नि भाजी - )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
26 Jun 2008 - 1:28 pm

मनस्वी ताईंनी 'धमाल मुलासाठी 'केलेला केळवणाचा बेत पाहुन तोंडाला पाणी सुटले आणी हे काव्य ही स्फुरले
चालः जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली ,झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली !!
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - यशवंत देव
स्वर - अरुण दाते

'

------------------------------------------------------------------------
जेव्हा पुरी नि भाजी ताटात ही पडाली !
जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!

ताटातल्या अन्नांचे मणिहार मांडलेले !
भोवती काकडीचे सॅलेड सजलेले !
खुशीत पाहुण्यांची पंगतही बसली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!

आमटीतल्या शेंगाना कोवळा स्पर्श होता!
वाटीतल्या रसाला केसर रंग होता !
आ़जीच्या ताटातली बेसन वडी मिळाली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!

नसतेच भुक जेव्हा, असते शांत सारे
वासाचा गंध येता पोटात काव कावे
ओथंबला तुपानी मेतकुटभात भारी ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!

अवांतर - कैवल्या माझ्यातर्फे हे कवितारुपी केळवण गोड मानुन घे ;)

विडंबनप्रतिसाद

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

26 Jun 2008 - 2:26 pm | धमाल मुलगा

अमोलभाऊ,
धन्यवाद :)
खास माझ्यासाठी केळवण लिहुन काढलंस म्हणून :)

चल, तू दिलेल्या केळवणाला मी येऊन गेलो, आता तू ८ जुलैला लग्नाला नक्की येतोयस. :)

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 8:36 am | विसोबा खेचर

आमटीतल्या शेंगाना कोवळा स्पर्श होता!
वाटीतल्या रसाला केसर रंग होता !
आ़जीच्या ताटातली बेसन वडी मिळाली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!

वा! क्या बात है...

आपला,
(आज्जीच्या हातची बेसनवडी आवडणारा) तात्या.