Skip to main content

तेंव्हा आणि आता.....

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी बुधवार, 15/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
* तेंव्हा आणि आता तेंव्हा होती तमन्ना......सरफरोशीची आणि होती इच्छा... शत्रूच्या बाहूतली ताकद आज्मावण्याची आज आहे इच्छा.... दोस्ताच्या सरफरोशीची... आणि जागलीय तमन्ना .... गृहयुद्धाची!! **** तेंव्हा गायलं स्तोत्र... अधमांच्या रक्तानं रंगलेल्या सृजनांनी पूजलेल्या .... स्वतंत्रतेचं आज आहे स्वातंत्र्य.... अधमांना सृजनांच्या रक्तानं रंगण्याचं !! **** तेंव्हा पाहिलं स्वप्न.... रात्रीच्या गर्भातल्या उष:कालाचं आज आहे सावट उष:कालीच आलेल्या काळरात्रीचं !! **** -अशोक
लेखनविषय:

वाचने 1656
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

या रात्रीचा शेवट कधी होणार का?

In reply to by पैसा

सत्याचा विजय सुरुवातीस नाही, तर शेवटी होतो. रात्रीचं ही तसंच आहे ! सकाळ झाल्या खेरीज रात्र संपत नाही !!

सत्याचा विजय सुरुवातीस नाही, तर शेवटी होतो. हो, पण तो शेवट बघण्यास तुम्ही जिवंत तर असले पाहिजे!