*
तेंव्हा आणि आता
तेंव्हा होती तमन्ना......सरफरोशीची
आणि होती इच्छा...
शत्रूच्या बाहूतली ताकद आज्मावण्याची
आज आहे इच्छा.... दोस्ताच्या सरफरोशीची...
आणि जागलीय तमन्ना .... गृहयुद्धाची!!
****
तेंव्हा गायलं स्तोत्र...
अधमांच्या रक्तानं रंगलेल्या
सृजनांनी पूजलेल्या .... स्वतंत्रतेचं
आज आहे स्वातंत्र्य.... अधमांना
सृजनांच्या रक्तानं रंगण्याचं !!
****
तेंव्हा पाहिलं स्वप्न....
रात्रीच्या गर्भातल्या उष:कालाचं
आज आहे सावट
उष:कालीच आलेल्या काळरात्रीचं !!
****
-अशोक
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1656
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुसुमाग्रजांची कविता: त्यांच्याच हस्ताक्षरात !!
!
सत्याचा विजय सुरुवातीस नाही,
In reply to ! by पैसा
जगाच्या शेवटी ?
आम्हीच कां, तुम्हीही जिवंत
In reply to जगाच्या शेवटी ? by तिमा
आम्हीच कां, तुम्हीही जिवंत