Skip to main content

तेंव्हा आणि आता.....

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी बुधवार, 15/08/2012 09:56 या दिवशी प्रकाशित केले.

*
तेंव्हा आणि आता

तेंव्हा होती तमन्ना......सरफरोशीची
आणि होती इच्छा...
शत्रूच्या बाहूतली ताकद आज्मावण्याची
आज आहे इच्छा.... दोस्ताच्या सरफरोशीची...
आणि जागलीय तमन्ना .... गृहयुद्धाची!!
****
तेंव्हा गायलं स्तोत्र...
अधमांच्या रक्तानं रंगलेल्या
सृजनांनी पूजलेल्या .... स्वतंत्रतेचं
आज आहे स्वातंत्र्य.... अधमांना
सृजनांच्या रक्तानं रंगण्याचं !!
****
तेंव्हा पाहिलं स्वप्न....
रात्रीच्या गर्भातल्या उष:कालाचं
आज आहे सावट
उष:कालीच आलेल्या काळरात्रीचं !!
****
-अशोक

लेखनविषय:

वाचने 1673
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

सत्याचा विजय सुरुवातीस नाही, तर शेवटी होतो. रात्रीचं ही तसंच आहे ! सकाळ झाल्या खेरीज रात्र संपत नाही !!


In reply to by तिमा

आम्हीच कां, तुम्हीही जिवंत असावे ही आमची (शेवटची) इच्छा आहे तिरसिंगराव !!