ते गांव माझे..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
25 Oct 2007 - 4:48 am

सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर..
पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर...

महालक्ष्मीचे ते करवीर, पन्हाळा-ज्योतिबा खांद्यावर..
परंपराही शूरवीरांची, सांगे माझे कोल्हापूर..

बाजी लावती कुस्तीगीर, भव्य रंकाळा दूरदूर..
परीस स्पर्शानं शाहूंच्या, भारलं गं कोल्हापूर...

कलेची पंढरीच ती, नृत्य- नाट्य संगीत सूर..
भालजींच्या 'जयप्रभा'त, रंगलं गं कोल्हापूर...

नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर..
आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर...

नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं..
मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर...

साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर..
मन नाही थाऱ्यावर, आठवे माझे कोल्हापूर........

- प्राजू
(२४ ऑक्टो २००७)

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

सहज's picture

25 Oct 2007 - 5:37 am | सहज

कविता आवडली. कोल्हापूरबद्दल जे काही ऐकले आहे ते सगळं किती मस्त बसलयं ह्या कवितेत.

अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. :-) गंमत हा, ह. घ्या.

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 8:57 pm | प्रियाली

कविता मस्तच!

अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात.

पुणे तुमचे माहेर-इन्-लॉ की काय हो? ;-) ह. घे.

विसोबा खेचर's picture

25 Oct 2007 - 7:54 am | विसोबा खेचर

नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं..
मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर...

साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर..
मन नाही थाऱ्यावर, आठवे माझे कोल्हापूर........

क्या बात है, साध्यासोप्या शब्दातली परंतु तेवढीच सुंदर कविता...!

जियो प्राजू, औरभी लिख्खो...

अवांतर - वरील दाद ही 'कोल्हापूरच्या' प्राजूला आहे, 'पुण्याच्या' नाही! :)

आपला,
(निपाणीप्रेमी) तात्या.

चित्रा's picture

26 Oct 2007 - 1:46 am | चित्रा

>साध्यासोप्या शब्दातली परंतु तेवढीच सुंदर कविता...!
> वरील दाद ही 'कोल्हापूरच्या' प्राजूला आहे, 'पुण्याच्या' नाही! :)

सहमत!

देवदत्त's picture

25 Oct 2007 - 9:03 am | देवदत्त

वर्णन छान आहे.

नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं..
मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर..

मस्तच :)

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

प्राजु's picture

25 Oct 2007 - 9:20 am | प्राजु

सहजराव, तात्या आणि देवदत्त...
मनापासून धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्द्ल.

-(कोल्हापूरची मिरची) प्राजक्ता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2007 - 11:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साध्यासोप्या शब्दातली सुंदर कविता !

अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात.
हेच विचारतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ध्रुव's picture

25 Oct 2007 - 11:24 am | ध्रुव

छान आहे.

ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

कविता आवडली. भालजींच्या जयप्रभा स्टुडिओ चा उल्लेख वाचल्यावर लता मंगेशकर, शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. बातम्या आठवल्या.
त्याचं पुढे काय झालं हो?

पुरणपोळी's picture

25 Oct 2007 - 8:35 pm | पुरणपोळी

सुधारणेस वाव आहे ( भरपूर..)

प्राजु's picture

25 Oct 2007 - 8:51 pm | प्राजु

मोगॅम्बो, पुरणपोळी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

भालजींच्या जयप्रभा स्टुडिओ चा उल्लेख वाचल्यावर लता मंगेशकर, शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. बातम्या आठवल्या.
त्याचं पुढे काय झालं हो?

मोगॅम्बो...

मला नाही माहिती काय झालं ... तूच सांग माहीती काढून मला. :)))

- प्राजक्ता.

राजे's picture

25 Oct 2007 - 9:04 pm | राजे (not verified)

"सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर..
पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर... "

वा, कोल्हापुरची आठवण करुन दिलीत, तेथेच पंचगंगेच्या तीरावर आमची शाळा होती..... काय ते दीवस व काय त्या खोड्या.... सगळच मीस करतो आहे अजून.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

बेसनलाडू's picture

26 Oct 2007 - 1:57 am | बेसनलाडू

नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं..
मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर...
वावा!!! छानच!
पुणे माहेरघर दिसते तुमचे ;) (ह.घ्या.)

तात्या विंचू's picture

26 Oct 2007 - 12:43 pm | तात्या विंचू

प्राजू जीक तू जीक........
एक गोश्ट विसरली आहे...मटण,ताम्बडा आणि पान्ढरा रस्सा......

कोल्हापूरकर अनुप

कोल्हापूरचे काका काकी
काल आले एका एकी
काका आमचे नंबर एकचे
सांगू लागले गावा कडचे
"आमच्या तिकडे कोल्हापूरला
एकाने एक कोल्हा पुरला
कोल्ह्याचे मग झाड आले
झाडालाही कोल्हेच आले
ते लोकांना चावत सुटले
तसे लोक धावत सुटले
जो तो गेला जिकडे तिकडे
आम्ही आपले आलो इकडे

धनंजय's picture

26 Oct 2007 - 8:54 pm | धनंजय

ही कविता "अजबखाना" शैलीची वाटते. एकदम मस्त!

स्वाती राजेश's picture

26 Oct 2007 - 10:35 pm | स्वाती राजेश

मी पण कोल्हापुरची आहे. शिवजी पेठ. सध्या यु.के.मधे.
कविता वाचून कोल्हपुरा मधे आहे असे वाटले.

नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर..
आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर...

खरेच, दसरा-दिवाळीचा रंगच वेगळा असतो.
पुण्या मधे सुध्दा इतकी सुंदर मी पाहिली नाही.

तसेच २६ जानेवारी ला जिलेबी .वा काय तो थाट.....

मी खुप मीस करते. आपल्या रुपाने ते भेटते.

मराठी फोरम ला नेहमी भेट देणारी
स्वाती

प्राजु's picture

27 Oct 2007 - 9:21 am | प्राजु

अनुप, राजे, बेसनलाडू आणि मोगॅम्बो... आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद..

स्वाती,
अगं काय सांगतेस? तू ही कोल्हापूरची का? अस्सल शिवाजीपेठी.... सह्ह्ह्ह्ह्ही..!
वा वा... बरं वाटलं मला.

- प्राजु.

स्वाती राजेश's picture

29 Oct 2007 - 4:34 pm | स्वाती राजेश

तू कुठे रहात होतीस कोल्हापुर मधे?
शाळा ?
तु़झ्या वेगवेग्ळ्या लिहीलेल्या खुप प्रतिक्रिया वाचल्या आहेत. तसेच कविता सुध्दा.
सुंदर लिहीतेस. मला इतके सुंदर लिहीता येत नाही.
पण ....... प्रयत्न करते. at least प्रतिक्रिया लिहायचा.

प्राजु's picture

29 Oct 2007 - 7:57 pm | प्राजु

स्वाती इथे लिहीणारे एकापेक्षाएक आहेत.. माझं काय घेऊन बसलीस..! मी ही प्रयत्नच करते... आणि बहुतेक प्रयत्नच करत राहणार जन्मभर्.... हाहाहा..
- प्राजु.

दिगम्भा's picture

30 Oct 2007 - 10:33 am | दिगम्भा

प्राजुताई,
जालावर कोल्हापूरचे एवढे लोक पाहून बरे वाटते.
आम्ही शाहूपुरीवाले. पण "गावा"त येऊन जाऊन असणारे. "भक्ति-सेवा" चे विद्यार्थी. रोज वर्गात बसल्या-बसल्या अंबाबाईची वाजंत्री ऐकणारे.
नंतर प्रत्यक्ष संबंध कमी झाला, तुटला.
खरंऽऽ, मनात अजून कोल्हापूर आहे, तिथली बोली आहे.
(आमच्या लहानपणीचा एक विनोद आठवला:
बाप मुलाला सांगतोय - "अरं गन्या, बामनावानी खनखनीत मोठा न म्हन !")

असेच कोल्हापूरविषयी लिहीत रहा व आमच्यासारख्यांना आनंद देत जा.
- दिगम्भा

स्वाती राजेश's picture

30 Oct 2007 - 3:51 pm | स्वाती राजेश

मी विद्यापीठ ची ८६ ल १०वी पास आउट. कोल्हपुर मधेच बी एस्.सी. एल्.एल्.बी. केले.
तसेच, बन्केत नोकरी सुध्दा केली. जरी परदेशात असले तरी मनाने कोल्हपुरचीच आहे.
३ वर्षापुर्वी गेट टुगेदर केले होते. कोल्हपुरच्या क्लासमेट नी सर्व तयारी केली होती. जवळ जवळ ७० फॅमिलीज आल्या होत्या.
खुप मजा आली.

आता तिथे घराघरातून फराळाचे वास येत असतील." माझी चकली मउ झाली. माझी शेव खुप मस्त झाली." असे संवाद ऐकायला मिळत असतील.

we miss all

प्राजु's picture

30 Oct 2007 - 6:44 pm | प्राजु

दिगम्भाताई,
मी राजेंद्रनगर वासी. जोक मात्र छान.

स्वाती, तुझंही खरंय.. अशी चर्चा अगदी खमंगपणे होत असणार आता तिथे.
मी सायबर मधून १९९९ ला ग्रॅज्यूएट झाले. आम्ही हि ९४ च्या पाटणे च्या बॅच ने गेटटुगेदर केलं होतं... सह्हि मज्जा आली होती.
- प्राजु.

बेसनलाडू's picture

31 Oct 2007 - 12:09 am | बेसनलाडू

आठवणींच्या नादात झालेल्या एका चुकीची दुरुस्ती सुचवावीशी वाटते - दिगम्भाताई नको, दिगम्भाबुवा हवे (माझ्यासाठी दिगम्भा काका / आजोबा :) )
(सुधारक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

31 Oct 2007 - 12:41 am | विसोबा खेचर

दिगम्भाताई,
मी राजेंद्रनगर वासी. जोक मात्र छान.

अगं प्राजू, आपले दिगम्भा हे 'ताई' नसून 'दादा' आहेत...:)

आपला,
तात्यादादा!

सुवर्णमयी's picture

30 Oct 2007 - 11:25 pm | सुवर्णमयी

कोल्हापुराचे वैशिष्ट्य सांगणारी कविता मस्त झणझणीत आहे. आवडली.

प्राजु's picture

31 Oct 2007 - 12:48 am | प्राजु

कळली चूक माझी तात्या.. मी त्याना व्य. नि. पाठवते आहे..
-प्राजु.

लबाड मुलगा's picture

20 Dec 2007 - 5:54 pm | लबाड मुलगा

छान वाटले

पक्या

गणेशा's picture

28 Jan 2011 - 11:32 am | गणेशा

हि कविता मला खुप आवडली ..
एकदम झकास वर्णन.
कोल्हापुर ला फक्त २ दाच जाणे झाले आहे, तरीही खुप आवडलेले शहर आहे हे.
तेथील भाषा ही माझी सर्वात आवडती मराठी भाषा आहे.
माझे रुम मेट्स तिकडचेच होते त्यामुळे कोल्हापुरच्या माणसांबद्दल्चे अनुभव ही छान आहेतच.
सर्व गोष्टीम्ची आठवण आली, आणि नुकतीच ऑर्कुट ग्रुप बरोबर केलेली पन्हाळा ट्रीप आठवली ..
धन्यवाद