सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर..
पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर...
महालक्ष्मीचे ते करवीर, पन्हाळा-ज्योतिबा खांद्यावर..
परंपराही शूरवीरांची, सांगे माझे कोल्हापूर..
बाजी लावती कुस्तीगीर, भव्य रंकाळा दूरदूर..
परीस स्पर्शानं शाहूंच्या, भारलं गं कोल्हापूर...
कलेची पंढरीच ती, नृत्य- नाट्य संगीत सूर..
भालजींच्या 'जयप्रभा'त, रंगलं गं कोल्हापूर...
नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर..
आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर...
नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं..
मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर...
साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर..
मन नाही थाऱ्यावर, आठवे माझे कोल्हापूर........
- प्राजू
(२४ ऑक्टो २००७)
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16849
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे
हेच!
In reply to छान आहे by सहज
सुंदर..
सहमत
In reply to सुंदर.. by विसोबा खेचर
वर्णन छान आहे.
धन्यवाद..
कविता आवडली !
वा!!
मस्त चवदार कविता, कोल्हापुरी मिसळी सारखी!
सुधारणेस
धन्यवाद..
"सह्याद्री
मिसळ आणि चप्पल!
प्राजू
कोल्हापूर वरील एक बालकविता (माझी नव्हे)
अजबखाना
In reply to कोल्हापूर वरील एक बालकविता (माझी नव्हे) by मोगॅम्बो
छानच कविता
धन्यवाद..
शिवाजी पेठ
अगं..
आम्ही शाहूपुरी
मी
अगदी खरं..
दुरुस्ती
In reply to अगदी खरं.. by प्राजु
दिगम्भाताई..:)))))))))))))))))
In reply to अगदी खरं.. by प्राजु
मस्त
हो..
छान
हि कविता मला खुप आवडली