Skip to main content

एक होती चाळ...

लेखक निश यांनी शुक्रवार, 13/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीं आठवता आठवता,अशी माझी चाळ होती दोन खोल्यांच घर आमच,तरी सगळ्या चाळीशी आपुलकी होती. चाळ कधी वाटलीच नाही ती, चाळकरी लोकांच ते एक कुटुंबच होत. परक्या लोकानाही आपलस वाटाव अस मायेच छप्पर होत. नेहमीच येता जाता पाठीवर शाबासकीची थाप होती. चुका केल्या तर कानफडात मारणारी आप्त होती. एका घरात चहा झाला तर दुसर्‍या घरात खाण व्हायच. रात्री आई बाबाना घरी यायला उशीर झाला तर शेजारुन घरपोच जेवण यायच. जाती पातीला इथे नेहमीच दुय्यम स्थान होत. माणसातल्या माणुसकीला नेहमीच पहिल मानाच पान होत. घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती. गावाहुन आलेल्या लोकांची इथे रहायची हक्काची सोय होती. संकट आल एखाद्या घरी तर चाळ मदतीस धाऊन यायची. सुखात मात्र नेहमीच सदा सावली देणार झाड व्हायची. इथे माणसाना कधी कोणी खर्‍या नावाने हाक मारीतच नसे बेबी, नाना, अण्णा,यमी ह्यांचीच चलती नेहमी असे. मन खरच अजुनही भुतकाळात सतत सतत रमत. चाळ अजुन हवी होती म्हणत धाय मोकलुन रडत. आज आहेत जिकडे तिकडे उंच उंच इमारतींचे मनोरे लवकरात लवकर घेतले जातील उरलेल्या चाळीचे जीव रे. चाळ जरी आ़ज नसली तरी,आठवणीत अजुनही जिवंत ती. ‍ चाळ जरी आ़ज नसली तरी,आठवणीत अजुनही जिवंत ती.
लेखनविषय:

वाचने 3398
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

छान.. लहानपनच्या चाळीतल्या वर्षांची अन शेजार्‍यापाजार्‍यांची आठवण झाली. बाकी वर्णन बरंच मिळतंजुळतं.. चाळसंस्कृतीत प्रायव्हसीची वाट लागायची हे खरं पण सपोर्ट सिस्टीम आणि एकत्रितपणा होता हेही खरं.

In reply to by गवि

सहमत आहे.
एका घरात चहा झाला तर दुसर्‍या घरात खाण व्हायच.
या ओळीत 'ण' वर अनुस्वार न दिल्याने याला जुळणारी भलतीच ओळ सुचली.

In reply to by नगरीनिरंजन

या ओळीत 'ण' वर अनुस्वार न दिल्याने याला जुळणारी भलतीच ओळ सुचली. स्वाभाविक स्वाभाविक म्हणतात ते हेच.... ;)

गवि साहेब, अगदी बरोबर बोललात. चाळसंस्कृतीत प्रायव्हसीची वाट लागायची हे खरं पण सपोर्ट सिस्टीम आणि एकत्रितपणा होता हेही खरं. चाळ म्हटल तर शहरात वसलेल छोट एक गावच होत.

ही कविता वाचताना फ.मु. यांच्या 'आई' या कवितेची आठवण होत होती.....

निश, कविता ओके पण लेखनचुका खूप - खोल्यांच, आमच, लोकांच, होत, आपलस, वाटाव , अस , मायेच, खाण, व्हायच, यायच, पहिल, मानाच, मन, आल, धाऊन, देणार, खरच, रमत, रडत, हे सारे शब्द कवितेशी बोली शैली पहाता चुकीच्या पद्धतीने लिहिले आहेत. तात्पर्य= मराठी इज अ व्हेर्र्रीईई फन्नी लॅंग्वेज ! तू मित्र ,त्यामुळे न कंटाळता कंट्रोल सी कंट्रोल व्ही केले आहे.

In reply to by चौकटराजा

मास्तर इथे शुद्धलेखन नाही हो कविच्या भावना महत्वाच्या... ;) अस नका खेळु त्यांच्या (नवकवीं) भावनांशी.. ;)

In reply to by पक पक पक

मग शद्ध तुपाचा वापर प्रसादात का करायचा ? खालील दोन वाक्य पहा पक राव , म्हंजे आमास्नी काय म्हनायचं ते उमगंल . आता उमगंल हा शब्दच पहा व उमगलं या शब्द पहा पहिला भविष्य काळाशी संबंधित तर दुसरा भूतकाळाशी . आणखी पुढे उदाहरण पहा - १) तुला सांगतो त्याला पुरता गाड २) काय सांगायचं कसंतरी चाललंय आमच गाडं या दोन्ही वाक्यातील गाड या शब्दातील अनुस्वारावर त्यातील " भावना" कशा अवलंबून आहेत .

In reply to by चौकटराजा

चौकटराजा साहेब, तुमच म्हणण व समजावुन सांगण एकदम मान्य. ज्या सहजतेने तुम्ही गाड / गाडं हया मधील फरक समाजाउन दिला आहात तो खरच मान्य होण्यासारखा व थेट मी केलेल्या चु़कांवर बोट ठेवणारा आहे. मराठी भाषा व अचुकता ह्यांच नात थेट पणे सांगणारा आहे. मागे असाच एका माझ्या प्रतिसादावर प्रभाकर पेठकर सरानी मला हाच मुद्दा सांगितला होता. मराठी भाषा व ती लिहिताना घ्यावयाची काळजी ह्याबद्दल.

'हे चित्र आणि ते चित्र' असे रंगविल्यास जास्त परिणामकारक होईल असे वाटते. एक प्रयत्न... आज आहेत जिकडे तिकडे उंच उंच इमारतींचे मनोरे रुक्ष 'फ्लॅट्'सना नाहित भावनांचे कंगोरे. 'शेजार' आता कुठेही उरलाच नाही, 'नेबर', मात्र मनाने कधी भावलाच नाही. चाळींबरोबर गेला 'मराठी'चा ओलावा, आजकाल सोसायट्यांमध्ये 'विंग्रजी'चाच कालवा. कळत नाही कसे आता हे आवरायचे रे, लवकरच घेतले जातील उरलेल्या चाळींचे जीव रे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर काका, अप्रतिम कविता आहे . मला वाटत मला जे माझ्या कवितेत सांगायच होत ते तुम्ही अचुकपणे तुमच्या ह्या कवितेत सांगितल आहेत.

एकुण एक शब्द खरा आहे, आम्ही पण श्रावणापासुन ते गुढीपाड्व्यापर्यत सर्व सण एकत्रित साजरे करायचो, बाकि गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....................