आठवणीं आठवता आठवता,अशी माझी चाळ होती
दोन खोल्यांच घर आमच,तरी सगळ्या चाळीशी आपुलकी होती.
चाळ कधी वाटलीच नाही ती, चाळकरी लोकांच ते एक कुटुंबच होत.
परक्या लोकानाही आपलस वाटाव अस मायेच छप्पर होत.
नेहमीच येता जाता पाठीवर शाबासकीची थाप होती.
चुका केल्या तर कानफडात मारणारी आप्त होती.
एका घरात चहा झाला तर दुसर्या घरात खाण व्हायच.
रात्री आई बाबाना घरी यायला उशीर झाला तर शेजारुन घरपोच जेवण यायच.
जाती पातीला इथे नेहमीच दुय्यम स्थान होत.
माणसातल्या माणुसकीला नेहमीच पहिल मानाच पान होत.
घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती.
गावाहुन आलेल्या लोकांची इथे रहायची हक्काची सोय होती.
संकट आल एखाद्या घरी तर चाळ मदतीस धाऊन यायची.
सुखात मात्र नेहमीच सदा सावली देणार झाड व्हायची.
इथे माणसाना कधी कोणी खर्या नावाने हाक मारीतच नसे
बेबी, नाना, अण्णा,यमी ह्यांचीच चलती नेहमी असे.
मन खरच अजुनही भुतकाळात सतत सतत रमत.
चाळ अजुन हवी होती म्हणत धाय मोकलुन रडत.
आज आहेत जिकडे तिकडे उंच उंच इमारतींचे मनोरे
लवकरात लवकर घेतले जातील उरलेल्या चाळीचे जीव रे.
चाळ जरी आ़ज नसली तरी,आठवणीत अजुनही जिवंत ती.
चाळ जरी आ़ज नसली तरी,आठवणीत अजुनही जिवंत ती.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3398
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.. लहानपनच्या चाळीतल्या
+१
In reply to छान.. लहानपनच्या चाळीतल्या by गवि
या ओळीत 'ण' वर अनुस्वार न
In reply to +१ by नगरीनिरंजन
मात्रा चुकून भलतीकडेच वाचली
In reply to या ओळीत 'ण' वर अनुस्वार न by पक पक पक
चुकून 'एका हाती चोळी'
In reply to मात्रा चुकून भलतीकडेच वाचली by आंबोळी
गवि साहेब, अगदी बरोबर बोललात.
नगरीनिरंजन साहेब, चुक मान्य.
नको हो ! इतके प्रामाणिक नका
In reply to नगरीनिरंजन साहेब, चुक मान्य. by निश
सुंदर...
अहोरुपमहोध्वनि: ॥
In reply to सुंदर... by अमितसांगली
निश, कविता ओके पण
मास्तर इथे शुद्धलेखन नाही हो
In reply to निश, कविता ओके पण by चौकटराजा
असे कसे म्हंता राव ?
In reply to मास्तर इथे शुद्धलेखन नाही हो by पक पक पक
चौकटराजा साहेब, तुमच म्हणण व समजावुन सांगण एकदम मान्य.
In reply to असे कसे म्हंता राव ? by चौकटराजा
हे चित्र आणि ते चित्र.....
प्रभाकर पेठकर काका, अप्रतिम कविता आहे .
In reply to हे चित्र आणि ते चित्र..... by प्रभाकर पेठकर
एकुण एक शब्द खरा आहे, आम्ही