आईबापा विना कोण गुरु मोठा ?
पायी असे त्यांच्या देव विसावला.
झिजवी देह सदा आई व बाप
दुजा गुरु काय करील असे तप?
बोट धरुनिया दाखविती जग,
स्वसुखे सारुन बाजुसी , जगती आई बाप.
करती मोठा त्याग विनामोबदला,
असती गुरु माझे आई व वडिल.
आई बाप आहेत देवाचेही देव
तेच आहेत गुरु पुजनिय.
निशदास म्हणे , शोधु नये कधी बाहेरचा गुरु.
आईबाप खरे गुरुंचेही गुरु.
आईबाप खरे गुरुंचेही गुरु.
प्रतिक्रिया
3 Jul 2012 - 5:37 pm | चौकटराजा
निशा, तू आता अभंग, ओव्या, साक्या, दिंडी, आर्या, यांच्याकडे वळणार काय रे बाबा ? चांगले जमलेय !
आईबाप खरे गुरुंचेही गुरू
परि परमगुरु आत्माराम
सदा सर्वथा राहे सन्निध रे
दावि क्षणो़क्षण मोक्ष धाम
3 Jul 2012 - 5:44 pm | निश
चौकटराजा साहेब, तुमचे मनापासुन आभार.
खर तर लहानपणी मी कबिर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, मोरोपंत , भा रा तांबे ह्यांच्यातच जास्त रमलो आहे हा बहुतेक त्याचा परीणाम माझ्यावर झाला असावा.
आणि हो तुमचा अभंग हा अप्रतिम. खुप सुंदर.
3 Jul 2012 - 6:25 pm | अर्धवटराव
ते निशदास ऐवजी "दासनिश" कसं वाटतं ? निशदास म्हणजे रात्रीचा दास...
अर्धवटराव
3 Jul 2012 - 6:32 pm | निश
अर्धवटराव साहेब, दासनिश हे जास्त बरोबर वाटत आहे.
पुढल्या वेळी दासनिश हेच नाव घेईन.
तुमचे मनापासुन धन्यवाद.
3 Jul 2012 - 6:37 pm | मुक्त विहारि
छान जमले आहे..
3 Jul 2012 - 9:08 pm | अमितसांगली
"दुजा गुरु" याचा अर्थ समजला नाही...
4 Jul 2012 - 11:17 am | निश
मुक्त विहारि साहेब, अमितसांगली साहेब, दोघांचेही आभार.
अमित सांगली साहेब, दुजा गुरु म्हंजे दुसरा कोणी गुरु असा त्याचा अर्थ आहे.
आईवडिल जे तप मुलासाठी करतात ते दुसरा कोणी बाहेरचा गुरु करु शकेल काय? असा त्या ओळीचा अर्थ आहे.