आईबापा विना कोण गुरु मोठा ?
पायी असे त्यांच्या देव विसावला.
झिजवी देह सदा आई व बाप
दुजा गुरु काय करील असे तप?
बोट धरुनिया दाखविती जग,
स्वसुखे सारुन बाजुसी , जगती आई बाप.
करती मोठा त्याग विनामोबदला,
असती गुरु माझे आई व वडिल.
आई बाप आहेत देवाचेही देव
तेच आहेत गुरु पुजनिय.
निशदास म्हणे , शोधु नये कधी बाहेरचा गुरु.
आईबाप खरे गुरुंचेही गुरु.
आईबाप खरे गुरुंचेही गुरु.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7325
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
निशदास म्हणे..
चौकटराजा साहेब, तुमचे मनापासुन आभार.
In reply to निशदास म्हणे.. by चौकटराजा
सुंदर कविता !!
अर्धवटराव साहेब, दासनिश हे जास्त बरोबर वाटत आहे.
In reply to सुंदर कविता !! by अर्धवटराव
व्वा ! मस्तच.....
चांगली रचना...
मुक्त विहारि साहेब, अमितसांगली साहेब, दोघांचेही आभार.