आर्थिक अराजकता

अमितसांगली's picture
अमितसांगली in जनातलं, मनातलं
26 Jun 2012 - 8:20 pm

'स्टँडर्ड व पुअर्स' या जगातील सर्वात मोठय़ा पतमापन संस्थेने भारताचे पतमानांकन निगेटिव्हमध्ये घटवून 'भारत हा गुंतवणूक करण्यायोग्य देश नाही' असा शिक्का मारला आहे. 'मूडी' या संस्थेने मात्र थोडासा दिलासा देत 'भारतीय अर्थव्यवस्था फार वाईट स्थितीत नाही' असे मत व्यक्त केले आहे. या सर्वांवर संयुक्त पुरोगामी आघाडीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवून कळस चढविला आहे. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे देश आर्थिक अराजकतेच्या मार्गावर उभा असून आर्थिक सुधारणांच्या रुतून बसलेल्या गाडीला धक्का देणे फार गरजेचे आहे.

भारताचा विकासदर ९.५ टक्क्याहून(मार्च २००७) घसरून आता ५.३ टक्क्यावर(मार्च २०१२) आला आहे. विकासदर ४ टक्क्यांनी घसरला असला तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ३० टक्क्यांनी घसरून ४६ रुपयांहून ५७ रुपयांपर्यंत आले आहे. औद्योगिक उत्पादनांच्या निर्देशांकात २०११-१२ या वर्षात २.८ टक्क्यांनी वाढ झाली असून हीच वाढ २०१०-११ या वर्षात ८.२% इतकी होती.

रुपयाचे मूल्य घसरत चालल्यामुळे ज्या भारतीय कंपन्यांनी परदेशातून कर्जे घेतली आहेत त्यांना रुपयाच्या घसरत्या दराने व्याज व मुद्दलासाठी जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. तसेच भारतातून जे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाणार आहेत त्यांनाही याच घसरत्या दराने प्रवेश फी किंवा अन्य खर्च करावा लागणार आहे.

कारणे:
१. आयात-निर्यात यामध्ये असणारी प्रचंड मोठी वित्तीय तुट:-
*हि एकूण तफावत ५,२२,००० करोड रुपये असून त्यापैकी तब्बल ४०% म्हणजे २,०८,००० करोड एवढी प्रचंड रक्कम विविध सबसिडीवर खर्च केली जाते
*आयतीमध्ये मुख्यत: तेल व सोने यांचा समावेश होतो. जागतिक बाजारात वाढणाऱ्या तेलाच्या किमती व त्यांचा भार सामान्य नागरिकांवर टाकण्यासाठी होत असलेली उदासीनता हेच यामागचे मुख्य कारण आहे.
*कापूस, साखर यासारख्या पिकांचे अमाप उत्पादन होऊनही चुकीच्या किंवा विलंबाने होणाऱ्या निर्यात धोरणांमुळे हि तफावत वाढत चालली आहे.

२. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव :-
*तेल, धान्य, खते यावर दिली जाणारी सबसिडी तसेच रोजगार हमी योजना, माध्यान भोजन योजना, परदेश दौरे यावर होणारे खर्च व एअर इंडियासारख्या तोट्यात चाललेल्या कंपन्या.
*अतिशय घाईने व अविचाराने 2G स्पेक्ट्रमचे रद्द केलेले परवाने व त्यांच्या पुनरलिलावासाठी होणारा विलंब.
*अनिवार्य असताना देखील रद्द केलेली रेल्वे भाडेवाढ.
*विमान वाहतूक व विमा या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक वाढविण्याबाबत करण्यात येत असलेली चालढकल.

३. परदेशी कंपन्यांना रिटेल क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी होणारा विरोध

४. स्पेन, ग्रीस, इटलीसारख्या युरोपीय देशांची ढासळलेली व आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची डबघाईस आलेली अर्थव्यवस्था.

५.GAAR (Genaral Anti Avoidance Rule):
या नियमानुसार उत्पादनशुल्क (आयकर) विभागांना जे व्यवहार कर चुकविण्यासाठी संशयास्पदरीतीने केले गेले आहेत किंवा ज्यांचा उद्देश कर चुकवेगिरी आहे अशा व्यवहारांची चौकशी करण्याचे अधिकार दिले गेले आहेत. या नियमाद्वारे कर चुकवेगिरीला आळा घालण्याचा व एप्रिल २०१२ पासून या नियमाची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार होता. परंतु या नियमातील तरतुदी खूपच अस्पष्ट असल्याने व परदेशातील श्रीमंत गुंतवणूकदार यांच्यावर हा नियम लावण्याच्या भीतीमुळे भारतीय शेअर बाजाराने गेल्या महिन्यात १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक गमाविल्याचा अंदाज आहे. न्यूयार्कमधील काही कंपन्यांनी भरतातील गुंतवणूक पूर्णपणे थांबवली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी ६०० करोड रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. यामुळे या नियमाची अंमलबजावणी २०१३-१४ पर्यंत लांबणीवर टाकण्याची घोषणा सरकारने केली आहे.

६. बोकांडीवर बसलेला भ्रष्टाचार

जबाबदार कोण:

१. सर्वस्वी पंतप्रधान:
*या विषयाशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींवर देखील त्यांचे नियंत्रण राहिले नाही. त्यांचे मुख्य अर्थविषयक सल्लागार कौशिक बसू यांनी जागतिक चर्चेमध्ये २०१४ मधील निवडणुका झाल्याशिवाय भारताच्या आर्थिक धोरणात बदल होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
*आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणतेही कठोर निर्णय घेतले नाहीत.

२. रिझर्व्ह बँक :
*महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर ६ टक्क्यांवरून (२००३) वाढवून ९.५%(२०१२) इतका केला आहे. याचा विकासदरावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
* ४ जून रोजी सुबीर गोकर्ण(Deputy Governer) यांनी विकासदर अपेक्षेपेक्षा कमी असल्याने व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले होते. दुसऱ्याच दिवशी डॉ.के.सी.चक्रभारती(Senior Deputy Governer) यांनी भारतात व्याजदर जास्त नाहीत असे वक्तव्य केले होते. उघडपणे दोन महत्वाच्या व्यक्तींनी परस्परविरोधी वक्तव्य केल्यामुळे गुंतवणूकदारात संभ्रमता निर्माण होते.
*सध्या ब्राझील वगळता सर्व महत्वाच्या विकसित व विकसनशील देशामध्ये भारतापेक्षा कमी व्याजदर आहेत.

३. अर्थमंत्रालय:
*चलन तुटवडा कमी करून परकीय गंगाजळ वाढावी यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत (अपयशात सातत्य)
*गेल्या १८ महिन्यात विकासदर प्रत्यक्षात ५.३ टक्क्यांपर्यंत घसरला असतानादेखील तो ८ ते ९ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल.
*अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बँक व पंतप्रधांचे कार्यालय यामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसून आता प्रत्येकजण आपली जबाबदारी झटकत आहे.

४. सुस्त झोपलेले विरोधी पक्ष व निष्क्रिय अशी प्रसारमाध्यमे

उपाय:
१.रिझर्व्ह बँकेने काल परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढविली असून रुपयातील कर्जफेडीसाठी परकी उचल घेण्याची मर्यादा १० अब्ज डॉलरपर्यंत वाढविली आहे.(यातून काही साध्य होणार नसल्याचे तज्ञांचे मत)

२. भारताने स्वताच्याच अर्थविषयक वाढीचा पुन्हा एकदा मागोवा घेऊन व्याजदरात कपात करावयास हवी (whenever interest was low growth was higher).

३. सबसिडी कमी करणे तसेच पेट्रोल,डीझेल व गॅसच्या किमतीत वाढ करून तुटीला आळा घालणे.

४. परदेशी कंपन्यांना रिटेल क्षेत्रात(घाऊक बाजारात) प्रवेश करण्यास परवानगी देणे व सोने-चांदीच्या अनावश्यक आयातीत कपात करणे.

याबाबतीत मान्यवरांची मते जाणून घेण्यास आवडेल.......

अर्थव्यवहारधोरणगुंतवणूकसमाजजीवनमानअर्थकारणराजकारणविचारमतप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सुनील's picture

26 Jun 2012 - 9:06 pm | सुनील

याबाबतीत मान्यवरांची मते जाणून घेण्यास आवडेल.......
हेच म्हणतो!

दादा कोंडके's picture

26 Jun 2012 - 9:58 pm | दादा कोंडके

याबाबतीत मान्यवरांची मते जाणून घेण्यास आवडेल.......

मान्यवर म्हणजे, "हॅ, ह्यात काय एव्हढं, याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती १७६० साली होती!" असं म्हणणारे का? ;)

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2012 - 9:09 pm | श्रीरंग_जोशी

अमित - प्रथमदर्शनी या लेखातून आपली देशाबद्दलची काळजीची भावना दिसत आहेच.
हा विषय माझ्याही आवडीचा आहे पण माझे यातील ज्ञान कुठलेही मत व्यक्त करण्याइतके परिपक्व नाही.
तरीही खालील २ मुद्दे मांडतो..

१. या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था व मंडळी जरी भारत सरकारच्या केवळ चुका व अपयश उचलून धरत असली तरी मला अशी (वेडी)आशा आहे की, सरकारची कामगिरी दिसते तेवढी वाईट नसावी. कारण याच सरकारमधली बरीच मंडळी १९९१ साली सत्तेत होती अन त्यांनी तेव्हाचे आव्हान यशस्वीपणे पेलले. अन आज ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत याचे सकारात्मक परिणाम दिसायला काही वेळ लागेल. त्यावेळी हिच तज्ज्ञ मंडळी या सरकारचे व रिझर्व बँकेचे गुणगान गातील.

२. धोरणलकवा - याबाबतीत मी लेखात मांडलेल्या विचारांशी व उदाहरणांशी पूर्णपणे सहमत आहे. राजकीय इच्छाशक्ती व धैर्य असते तर २ वर्षापूर्वीच राजीनामा देऊन जनतेच्या दरबारी आपली बाजू मांडून बहुमत मिळवण्याचा प्रयत्न केला गेला असता. त्याऐवजी आला दिवस ढकलायचे अन कसेही करून सत्ता टिकवून ठेवायची असे धोरण आखलेले दिसत आहे. दुर्दैवाने याहून वाईट तर महाराष्ट्र सरकारचे आहे जे काही महिन्यांत सत्तेची सलग १३ वर्षे पूर्ण करतील.

अमितसांगली's picture

27 Jun 2012 - 8:08 am | अमितसांगली

सरकारमधली बरीच मंडळी १९९१ साली सत्तेत होती अन त्यांनी तेव्हाचे आव्हान यशस्वीपणे पेलले....सहमत...संपुआ-१ दरम्यान यांनी चांगले निर्णय घेतले होते पण प्रणवदा यांची अर्थमंत्री म्हणून कारकीर्द अपयशी ठरली.

तर्री's picture

26 Jun 2012 - 9:28 pm | तर्री

हे सगळे समजणारे अल्पसंख्य आहेत व न समजणारे बहुसंख्य आहेत.
आपल्या "लोप"शाहीत बहुसंख्य म्हणजे (३५-४०% झालेल्या मतदानातील बहुसंख्य ) ठरवतात.
युवराज येवूदेत "हे" परवडले म्हणायची वेळ येणार आहे.

नितिन थत्ते's picture

26 Jun 2012 - 10:01 pm | नितिन थत्ते

देशात समान नागरी कायदा नसल्यामुळे असं झालं असावं.

कुंदन's picture

26 Jun 2012 - 10:16 pm | कुंदन

चाचा , आज हे सगळे प्रतिसाद आणी बाणी च्या आठवणीतुन तर दिले नाहित ना तुम्ही?

विकास's picture

26 Jun 2012 - 10:33 pm | विकास

इतकेच नाही तर ७७ साली जनता पक्ष, ८९ साली तिसरी आघाडी, नव्वदच्या दशकात एनडीए यांनी राज्य केल्यामुळे आजची परीस्थिती उद्भवली आहे.

नितिन थत्ते's picture

26 Jun 2012 - 11:11 pm | नितिन थत्ते

हेच म्हणतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले की भारतच मूडीज आणि एस & पी चं रेटिंग करू लागेल,

विकास's picture

26 Jun 2012 - 11:47 pm | विकास

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले की भारतच मूडीज आणि एस & पी चं रेटिंग करू लागेल,

मला काही कल्पना नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणजे बरोबरच असणार! उद्या मुडीज चे मोदीज पण करून टाकतील :-)

नाना चेंगट's picture

27 Jun 2012 - 12:53 pm | नाना चेंगट

हा हा हा

१. सरकारे (केंद्र व राज्य) नेहमीच सामान्य जनतेला दिलेल्या सबसिडीबद्दल बोलत असतात व काही प्रमाणात राजकीय व इतर कारणांमुळे सबसिडी द्यावी लागतेही परंतु कंपन्यांना दिलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सबसिडीबद्दल फ़ारसे कोणीच बोलत नाही. बहुतांश वेळा अशी सबसिडी ही कमी दरात जमीन उपल्ब्धता, वीज व पाणी स्वस्त दरात, बरेचसे कर पहीले काही वर्ष माफ़ करणे वगैरे पद्धतीने दिली जाते. बहुतांश वेळा अशी सबसिडी घेणा-या कंपन्या दिलेली आश्वासने पुर्ण करतातच असे नाही. दिलेल्या रोजगारासंबंधीची आश्वासने पाळली जात नाहीत. इतर देशांमध्येही सवलतीचे प्रमाण भारताएवढेच आहे का व अश्या सवलती देणे किंवा त्यात पारदर्शकता बाळ्गल्यास चलनविषयक कोणत्या समस्या उद्भवतील?
२. कोणतेही उत्पादन अमर्याद काळ विकले जाईल किंवा अशा उत्पादनांची कायमस्वरूपी गरज असेलच असे ग्रुहीत का धरतात? उदा. वैयक्तीक वापराची चारचाकी वाहने. काही काळानंतर जेव्हा अशा वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तेव्हा त्यांचा ख़प कमी होणारच. सध्याची सरकारे व अर्थव्यवस्था नियामक संस्था विशिष्ट वस्तुंचे उत्पादन, शेयर बाजार, कमोडिटी बाजार व अनुत्पादक आयात (सोने इ.) वगैरे बाबींना अतिरीक्त महत्व देत नाहीत का?
3. कोणतेही उत्पादन कायमस्वरूपी ठराविक प्रदेशात विकत राहील असे नाही. तेव्हा सध्याचे केंद्र सरकार नवीन बाजारपेठा शोधण्यास, प्रोत्साहन देण्यास किंवा नवीन उत्पादन संशोधन व निर्मितीला चालना देण्यास कमी पडते असे वाटत नाही का?
4. भारतातील सध्याची व्यवस्था ही बरीचशी अपारदर्शक आहे, जर तीला अधिकाधिक लोकाभिमुख बनविले व लोकांच्या सहकार्याने निर्णय घेतले तर जनता अशा निर्णयांना फ़ारसा विरोध करणार नाही. उदा. सरकार पेट्रोल व डिझेल विक्रीत तोटा होतो असे सांगते पण इथेनॊल अधिक प्रमाणात निसळण्यास किंवा इथेनॊल सक्षम इंजिने बनवण्यास सक्ती का करत नाही? भ्रष्टाचार हेच सध्याच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे असे मला वाटते. भ्रष्टाचारात स्वत:च्या किंवा स्वत:च्या पसंतीच्या कंपन्यांना अधिक प्राधान्य देण्याचाही समावेश होतो त्यामुळे कोणताही पक्ष त्यापसून अलिप्त नाही.

अमितसांगली's picture

27 Jun 2012 - 8:05 am | अमितसांगली

चांगले मुद्दे मांडले आहेत.

शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!.....अप्रतिम

कुंदन's picture

26 Jun 2012 - 10:18 pm | कुंदन

मिपा धुरीण अर्थतज्ञ नाना चेंगट यांचे मत वाचण्यास उत्सुक.

नाना चेंगट's picture

27 Jun 2012 - 11:16 am | नाना चेंगट

आम्ही थत्तेचाचांच्या मताबाहेर नाही. ते म्हणतात ते बरोबरच असते

विकास's picture

27 Jun 2012 - 12:19 am | विकास

लेखकाने चांगली माहिती संकलीत केली आहे आणि विषय महत्वाचा आहे. त्यातील काही मुद्यांशी सहमत आहे तर काहींशी नाही. अर्थात हे +/- लेखकापेक्षा त्यात आलेल्या एस & पी मधील मुद्यांच्या संदर्भात आहे. :)

  1. एस अँड पी जे काय सांगते ते निष्पक्षपाती असते असे समजण्याचे कारण नाही. (लेखक अथवा इतर कोणी समजत असेल असे येथे म्हणायचा उद्देशही नाही).
  2. भ्रष्टाचार आणि निर्णयशक्तीचा अभाव या दोन प्रमुख आणि गंभिर गोष्टी आहेत, ज्याचे परीणाम केवळ अर्थव्यवस्थेसच नाही तर समाजव्यवस्थेस भोगावे लागत आहेत अजूनही अधिक भोगावे लागतील.

मात्र जी काही कारणे दिली आहेत त्यात एक कारण दिसले: "स्पेन, ग्रीस, इटलीसारख्या युरोपीय देशांची ढासळलेली व आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची डबघाईस आलेली अर्थव्यवस्था." मला वाटते एस अँड पी ला ज्या प्रकारे उद्योग धंद्यांसाठी (नियंत्रण)मुक्तअर्थव्यवस्था हवी आहे, तशी या प्रगत राष्ट्रांमध्ये आहे. अमेरीकेत तर नक्कीच आहे. तरी देखील घोड पेंड का खात आहे? मग त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपण पुढे गेलो आणि ते देखील भ्रष्टाचाराच्या भस्मासूरास साथीला घेऊन तर काय होईल? याचा काही विचार केला आहे का? सरकार नक्कीच यशस्वी नाही पण राजकीय मुद्यांच्या व्यतिरीक्त प्रश्न विचारावासा वाटतो: की कम्युनिझम नक्कीच निरूपयोगी आणि धोकादायक प्रकार आहे... अमेरीकन अर्थव्यवस्था (जी थोड्याफार फरकाने पाश्चात्य अर्थतज्ञ भारताने अंगिकारावी म्हणून सांगत असतात), पण जेंव्हा जगभर स्पर्धा चालू झाली तेंव्हा पासून हेलपटू लागली आहे. मग त्याच्या पाठीमागे जावे का? याचा अर्थ अमेरीका बुडती आहे असा धरू नका. कारण एकंदरीतच कायदा, कमी भ्रष्टाचार, उत्तम शिक्षण आणि इनोवेशनला पोषक वातावरण या देशात आहे.

अर्धवटराव's picture

27 Jun 2012 - 2:35 am | अर्धवटराव

सरकारला असले (किंवा कुठलेच) प्रश्न विचारायचे नसतात. काहिही झालं तरी लागले लगेच सरकरला जाब विचारायला. एव्हढ्या "खानदानी" पद्धतीने सरकार चालवायच म्हणजे खायचं काम नाहि. समान नागरी कायद्याबद्दल, मोदींच्या प्रधानमंत्रीपदाबद्दल (असंबद्ध) निर्णय झालाय ना... मग होईल सर्व ठीकठाक.

अर्धवटराव

अमितसांगली's picture

27 Jun 2012 - 8:02 am | अमितसांगली

एस अँड पी जे काय सांगते ते निष्पक्षपाती असते असे समजण्याचे कारण नाही.....पण त्याकडे अगदीच दुर्लक्ष करून चालणार नाही...

अमेरिकेत किंवा युरोपीय राष्ट्रात आलेल्या मंदिपेक्षा भ्रष्टाचार आणि निर्णयशक्तीचा अभाव या प्रमुख कारणांमुळे आपली अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.

मराठमोळा's picture

27 Jun 2012 - 7:03 am | मराठमोळा

माहिती आणि आढावा आवडला..

मिपावर कुणी निर्णय घेण्याची क्षमता असलेले सरकारी बाबू किंवा मंत्री-संत्री / राज्यकर्ते असतील तर त्यांनी इथे मते मांडावीत किंवा देशासाठी योग्य काय ते निर्णय घ्यावेत अशी जाहीर विनंती करतो.

वेताळ's picture

27 Jun 2012 - 8:12 pm | वेताळ

नजरेत आणुन द्यावा असे वाटते.

मुक्त विहारि's picture

27 Jun 2012 - 8:22 am | मुक्त विहारि

प्रतिसाद बराच मोठा झाल्याने आणि माझे अंदाज थोडे वेगळे असल्याने, वेगळा धागा काढीन... राग मानू नये..

अर्थव्यवस्था वाईट असणे म्हणजे त्यात टोकाचा मुक्तपणा असणे किंवा टोकाची बंधने असणे.
आर्थिक परिस्थिती वाईट असणे म्हणजे निर्याती पेक्क्षा आयात जास्त असणे. अशी आमची आपली साधी व्याख्या आहे. कुणाच्या तरी पेकाटात लाथ घालावी लागते या स्तव फक्त कायदे
होतात निवाडे होत नाहीत ( किंवा लांबतात ) याचा मोठाच गैरफायदा घेतला गेला की सगळाच खेळ खलास !

गोंधळी's picture

27 Jun 2012 - 9:00 pm | गोंधळी

मला वाटते कि राजकीय ईच्छाशक्तिचा अभाव हेच अत्यंत महत्वाचे कारण आहे आपल्या देशातील अधोगतीला.

मी वर दिलेल्या प्रतिक्रियेच्या अंगाने पण थोडीशी वेगळी बातमी आज वाचनात आली आहे.


http://online2.esakal.com/esakal/20120628/5696169153057486527.htm

वरील बातमीनुसार कंपनीच्या भागधारकांनी अणूर्जेच्या बाजूने कौल दिला आहे, एक आण्विक अपघात घडूनदेखील. सध्याच्या भारतीय अर्थकारणामध्ये कंपनीच्या भागधारकांचे हित (कंपनीचे सदैव वाढत जाणारे उत्पन्न) महत्वाचे की सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन मह्त्वाचे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एसईझेड, जमीनींचे अधिग्रहण, नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण वगैरे अनेक बाबी यात अंतर्भुत आहेत. सध्याचे केंद्र सरकार व इतर राज्य सरकारे याबाबतीत पारदर्शी नाहीत. त्यामुळे आवश्यक बाबींच्या बाबतीतही असंतोष वाढत आहे. सरकारने त्वरीत लक्ष दिले नाही तर अराजकता निर्माण होऊ शकते. प्रत्येक प्रकरणात पारदर्शीपणे राष्ट्रहिताचे निर्णय घेणे व प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक आहे.