धर्म लाज संस्कार शरम
सोडुन बनला कसा नराधम -
फासुन व्यवसायास काळिमा
पैसा-पैसा करसी अधमा !
अर्भक दिसले- शस्त्र उचलले
माणुसकीचे नांव न उरले !
जिरला टाहो गर्भातच तो
माउलीस ना पान्हा फुटतो -
स्त्रीभ्रूणहत्या नित्य करावी
कशी कळावी मातृथोरवी !
धन्य होतसे का तव माता -
कृष्णकृत्य तव तिजला कळता ?
म्हणेल माता नक्की तुजला,
देव वाटला- असुर निपजला !!
प्रतिक्रिया
21 Jun 2012 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा
हां...याला म्हणतात खरं सामाजिक आशयपूर्ण काव्य...! --^--^--^--
22 Jun 2012 - 7:49 pm | पक पक पक
____/\___
____/\____
____/\____
23 Jun 2012 - 8:49 am | अमितसांगली
अतिशय योग्य शब्दात माळलेली, गंभीर व आशयपूर्ण कविता.....
23 Jun 2012 - 1:12 pm | मृगनयनी
सहमत!
आणि हे 'कृष्णकृत्य' करणार्या माणसाचे नाव "सुदाम" असावे.. हाही एक विचित्र योगायोग! :|
24 Jun 2012 - 12:02 pm | अत्रुप्त आत्मा
@करणार्या माणसाचे नाव"सुदाम" असावे.. हाही एक विचित्र योगायोग! >>> नावात काय आहे? ;-)
24 Jun 2012 - 12:09 pm | मृगनयनी
अं हं.... आपल्या लाडक्या श्रीकृष्णाच्या परममित्राचे नाव "सुदामा" असे होते.. व तो खूप सद्वर्तनी होता. अत्यन्त गरीबीत जीवन कन्ठत असतानाही त्याने मूठभर पोहे श्रीकृष्णास अर्पण केले.. व कृष्णकृपेने त्याचे नशीब फळफळले.. व तो सुदामपुरीचा राजा बनला..
आपण म्हणता.. ते बरोबर आहे.. अ.आ.. पण या कलीयुगात 'कृष्ण'कृत्य करणार्या व्यक्तीचे नावही "सुदाम"च आहे.. आणि दोन्ही सुदामां'ची कृत्ये ही 'कृष्ण" याच शब्दाशी रिलेटेड आहेत.. पण त्यात जमीन-अस्मानाचे अन्तर आहे...त्यामुळे हा एक अलन्कारिक योगायोग वाटला मला... म्हणून मी तसे नमूद केले... :)
24 Jun 2012 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा
@म्हणून मी तसे नमूद केले... >>> धन्यवाद.
प्रतिसादास सु-दाम मिळाला. :-)