धर्म लाज संस्कार शरम
सोडुन बनला कसा नराधम -
फासुन व्यवसायास काळिमा
पैसा-पैसा करसी अधमा !
अर्भक दिसले- शस्त्र उचलले
माणुसकीचे नांव न उरले !
जिरला टाहो गर्भातच तो
माउलीस ना पान्हा फुटतो -
स्त्रीभ्रूणहत्या नित्य करावी
कशी कळावी मातृथोरवी !
धन्य होतसे का तव माता -
कृष्णकृत्य तव तिजला कळता ?
म्हणेल माता नक्की तुजला,
देव वाटला- असुर निपजला !!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1561
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
हां...याला म्हणतात खरं
____/\___ ____/\____ ____/\__
खूप छान...
सहमत! आणि हे 'कृष्णकृत्य'
In reply to खूप छान... by अमितसांगली
@करणार्या माणसाचे नाव"सुदाम"
In reply to सहमत! आणि हे 'कृष्णकृत्य' by मृगनयनी
अं हं.... आपल्या लाडक्या
In reply to @करणार्या माणसाचे नाव"सुदाम" by अत्रुप्त आत्मा
@म्हणून मी तसे नमूद केले...
In reply to अं हं.... आपल्या लाडक्या by मृगनयनी