Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हर्षद खुस्पे on Tue, 05/01/2012 - 10:29
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
कोल्हापूर जिल्ह्यामधील एक खेडेगाव . आम्ही सरकारी डॉक्टर त्या खेडेगावामध्ये नोकरीला (सरकारी इस्पितळामध्ये ) होतो...सकाळचे काहीतरी १०-११ वाजले असतील.....दवाखाना तसा सुस्तच होता. नुकताच राउंड टाकून आलो होतो आणि सर्व रुग्ण व्यवस्थित आहेत याची तपासणी आणि सिस्टर ना इतर सूचना करून माझ्या रुग्ण तपासणी खोली मध्ये येउन बसलो होतो आणि इस्पितळामध्ये असलेल्या इतर ऑफिस च्या लोकांशी काही बोलत होतो तो पर्यंत एक गलका ऐकू आला. गलका दवाखान्याच्या दिशेनेच येत होता म्हणून उत्सुकतेने मी पाहू लागलो तर एक साधारण ३५-४० वयाचा माणूस एका ७-8 वर्षे वयाच्या मुलाला दोन्ही हातामध्ये धरून पळत येत होता. तो माणूस येताच त्याने सागितले कि पोराने काही तरी खाल्ले आहे आणि पोरगा बेशुद्ध पडला आहे . मी बारकाईने बघोतले तर त्या मुलाच्या तोंडाला काहीतरी पांढरे लागले होते. मी मुलाच्या डोळ्यामध्ये battery चा प्रकाश टाकला असता त्याची बुब्बुळ आकसली होती. त्यावरून माझ्या काहीतरी लक्षात आले आणि जवळ जमलेल्या लोकांना खोली बाहेर काढले व मुलाजवळ गेलो आणि हळू आवाजात म्हटले ' मला माहित आहे कि तू बेशुद्ध नाहीस, इथले सगळे खोली बाहेर आहेत आणि तू डोळे उघड, मी कोणालाही काही सांगणार नाही,' मग १-२ मि. त्यामुलाने डोळे उघडले, हळूच कानोसा घेतला आणि कोणीहि नाही ह्याची खात्री पटताच तो लगेच उठून बसला. मी त्याला विश्वासात घेउन विचारले कि बाबा तू असं का केलेस? तर त्याने दिलेले उत्तर मोठे धक्कादायक होते....तो म्हणाला ' आम्ही मुले - मुले दररोज तोंडाजवळ whitner ( जे type केलेले अक्षर खोडायला वापरतात ते पांढरे द्रव्य :) ) नेतो आणि त्याचा वास घेत आसतो... मग मी विचारले कि ह्याला पैसे कुठून आणता तर त्याने उत्तर दिले कि आम्ही मुल - मुलं घरी खाऊला जे पैसे देतात ते साठवतो आणि हे विकत घेतो. १ बाटली संपे पर्यंत पैसे साठतात मग दुसरी घेतो. आज जेव्हा वास घेत होतो तेव्हा अचानक वडील समोर आले मग आता हातामधील बाटली कुठे फेकणार म्हणून मी ते तोंडाला लावलं आणि बेशुद्ध पडायचं ढोंग केला.......मग मी मुलाला ह्या सर्व गोष्टीचे वाईट परिणाम सांगितले आणि म्हटला पुन्हा असं काही करून तू तुझा आयुष्य वाया घालवू नको. मग मुलाला घेउन मी बाहेर आलो आणि सांगितला कि injection दिले आणि बरा झाला आसे सांगून त्याच्या वडिलांना औषध घ्यायला थोड्यावेळाने या आसे सांगितले...व ते वडील आल्यावर सांगितले कि त्याला मारू नका ...पण असं असं झाले होते...त्याला सांभाळा., वडील न मारण्याचा वचन देउन गेले. नंतर गावामध्ये कळला कि वडील पण दारुडे होते. :)
  • Log in or register to post comments
  • 7052 views
  • डॉक्टरचा अनुभव २

Book traversal links for एका डॉक्टरचा अनुभव

  • डॉक्टरचा अनुभव २ ›

प्रतिक्रिया

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 05/01/2012 - 10:38

Permalink

अनुभव कथन आवडलं

लिहीत राहा!
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद खुस्पे on Tue, 05/01/2012 - 11:16

Permalink

अनुभव कथन आवडलं

पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्यावे ही विनंती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Tue, 05/01/2012 - 12:38

In reply to अनुभव कथन आवडलं by हर्षद खुस्पे

Permalink

छान

लिहीले आहेत, असेच अजूनही लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 05/01/2012 - 11:37

Permalink

मस्त लिहिले आहे.

अजुन लिहा तुमचे अनुभव.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 05/01/2012 - 11:38

Permalink

मिपावर स्वागत!

असेच तुमचे अनुभव लिहीत रहा. पुढील लेखनाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 05/01/2012 - 12:09

In reply to मिपावर स्वागत! by पैसा

Permalink

काही काय ?

असेच तुमचे अनुभव लिहीत रहा. पुढील लेखनाला शुभेच्छा!
देव करो आणि असे अनुभव वारंवार न येवोत.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 05/01/2012 - 12:19

In reply to काही काय ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

-१

पराशी असहमत. ज्याची त्याची जाण हे सत्यवचन मान्य करुनही तेझ सिनेमा बघण्यापेक्षा व्हाईटनरची बाटली हुंगणे हे तुलनेत सुरक्षीत आयुष्य आहे / योग्य निवड आहे / अनुभवाने मोठे होणे आहे वगैरे वगैरे ;-) डॉक्टरसाहेब असेच किस्से ऐकवत जा!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 05/01/2012 - 12:23

In reply to -१ by सहज

Permalink

हम्म्म्म

चला, आता इकडे व्हाईटनर शोधणे आले.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 05/01/2012 - 12:32

In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

पण डॅडीना घाबरणारा मुलगा कुठून आणायचा?

आणि व्हाईटनर मुळेच तर सगळे प्रश्न निर्माण झालेतना!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 05/01/2012 - 12:38

In reply to पण डॅडीना घाबरणारा मुलगा कुठून आणायचा? by संजय क्षीरसागर

Permalink

सहमत !

आणि व्हाईटनर मुळेच तर सगळे प्रश्न निर्माण झालेतना!
ह्यासाठीच अफू सारख्या शेतीला उत्तेजन देणे गरजेचे आहे. 'विड' हा प्रकार मुळातच अत्यंत महाग म्हणून गणला जातो, त्यात आता अफू आणि गांजा देखील निर्यात व्हायला लागल्याने अशा मुलांनी करायचे काय ? त्यात पुन्हा दारुचे भाव देखील वाढत चालले आहेत. अशावेळी अशा गरजवंतांपर्यंत स्वस्त दरात व चांगल्या प्रकारची मादक द्रव्ये पोचवणे हे बालकल्याण खात्याचे काम नाही काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 05/01/2012 - 13:21

In reply to सहमत ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा, तुला प्रश्न बाऊन्सर गेलाय!

मुलांकडे व्हाईटनर भरपूर आहे, डॅडी नुसत्या ब्रशचं काय करणार? हा सध्याचा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/02/2012 - 11:41

In reply to परा, तुला प्रश्न बाऊन्सर गेलाय! by संजय क्षीरसागर

Permalink

हम्म्म्म

मुलांकडे व्हाईटनर भरपूर आहे, डॅडी नुसत्या ब्रशचं काय करणार? हा सध्याचा प्रश्न आहे
प्रतिसाद अंमळ अश्लील आहे असे मत नोंदवतो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/02/2012 - 13:57

In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

काव्यात्मक अर्थ आहे

मुलांकडे व्हाईटनर भरपूर आहे, (याचा अर्थ सध्याची मुलं बेगुमान आहेत) डॅडी नुसत्या ब्रशचं (असहाय्यता या अर्थानं) काय करणार? हा सध्याचा प्रश्न आहे या आधीचा प्रतिसाद पाहिला तरी असाच अर्थ व्यक्त होईल
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 05/01/2012 - 12:45

Permalink

डॉक्टर साहेब, लिहित रहा हो.

डॉक्टर साहेब, लिहित रहा हो. तुमच्या पेशात खूप विविध अनुभव येतात. मांडा इथे!
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Tue, 05/01/2012 - 14:40

In reply to डॉक्टर साहेब, लिहित रहा हो. by बिपिन कार्यकर्ते

Permalink

असेच!

असेच म्हणते. तुमच्या पेशात विविध अनुभव येतात ते मांडा इथे. ता.क. संजोप रावांनी दिलेल्या लिंकवरून लोकप्रभातील कोंकणचो डॉक्टर वाचतेय. मस्त आहे. आता तुम्ही मस्त कोल्हापूरी डॉक्टर सिरीज टाका बघू. बाकी बिका, हे डॉक्टर लोक आपले अनुभ्व लिहायला इतका आळशीपणा का करतात हो? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 05/01/2012 - 18:42

In reply to असेच! by साती

Permalink

>>>बाकी साती, हे डॉक्टर लोक

>>>बाकी साती, हे डॉक्टर लोक आपले अनुभ्व लिहायला इतका आळशीपणा का करतात हो? ह्याला स्वगत म्हणतात स्वगत. आता बिका हा सातीचा अथवा साती हा बिकाचा 'नुसताच आयडी' असला तर प्र'श्ण' मिटला :) बाकी डाक्टरसाहेब, सरकारी अडचणीत न येता बक्कळ लिहा.... लेखन आवडण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 05/02/2012 - 00:34

In reply to असेच! by साती

Permalink

त्याचं काय आहे ना साते, हे

त्याचं काय आहे ना साते, हे डॉक्टर लोक मूळातच आळशी असतात. काही म्हणजे काही करायला नको असतं यांना... साधं लॉगिन नाही करत दिवसचे दिवस... नियमित लिहिणार काय? कप्पाळ? ;) अवांतरः इथे फक्त डॉ. वर मतप्रदर्शन आहे, प्रा. वाल्या डॉं.नी कृपया लक्ष देऊ नये! :ड ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 05/02/2012 - 16:39

In reply to त्याचं काय आहे ना साते, हे by बिपिन कार्यकर्ते

Permalink

त्याचं काय आहे ना साते, हे

त्याचं काय आहे ना साते, हे डॉक्टर लोक मूळातच आळशी असतात. काही म्हणजे काही करायला नको असतं यांना... साधं लॉगिन नाही करत दिवसचे दिवस... नियमित लिहिणार काय? कप्पाळ? >>> =)) =)) =)) =)) =)) अवांतरः इथे फक्त डॉ. वर मतप्रदर्शन आहे, प्रा. वाल्या डॉं.नी कृपया लक्ष देऊ नये! >>> दंतवैद्याबद्दल आपले हेच मत आहे का ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 05/01/2012 - 19:12

Permalink

हा अनुभव वाचताना भानामतीच्या

हा अनुभव वाचताना भानामतीच्या लेखातली डोळ्यातून खडे येण्याच्या प्रसंगाची आठवण आली.
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद खुस्पे on Tue, 05/01/2012 - 21:35

Permalink

हे डॉक्टर लोक आपले अनुभ्व लिहायला इतका आळशीपणा

आहो आळशीपणा नाही हो. लिहायची भीती वाटत होती. :) आपल्या प्रतिक्रिया काय आसतील ह्याची...पण आता हरकत नाही. ह्यापुढे सुरुवात असेल हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Tue, 05/01/2012 - 23:57

Permalink

छोटासा मस्त अनुभव. अजुन

छोटासा मस्त अनुभव. अजुन लिहा. --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 05/02/2012 - 00:27

Permalink

प्राडॉ

समस्त डॉक्टर आणि प्राध्यापक मंडळींनी लिहायला चालू केलं पाहिजे असं मत व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द आपण शांत चित्ताने वाचून घेतलेत त्याबद्दल आभार मानतो. जैहिंद!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 05/02/2012 - 07:31

Permalink

पहिल्या लिखाणाच्या मानानं

पहिल्या लिखाणाच्या मानानं बरंच शुद्ध लिहिलं आहे, प्रथम त्याबद्दल धन्यवाद. खरंच तुमच्या क्षेत्रातले अजुन अनुभव ऐकायला आवडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 05/02/2012 - 14:17

Permalink

अनुभव उत्तम लिहिला आहेत.. पण

अनुभव उत्तम लिहिला आहेत.. पण प्रसंगातल्याच एका तपशिलाबद्दल वाचताना शंका उत्पन्न झाली.. ती तुम्हाला विचारुन तसा उपयोग नसला तरी इथे नोंदवतो.
आज जेव्हा वास घेत होतो तेव्हा अचानक वडील समोर आले मग आता हातामधील बाटली कुठे फेकणार म्हणून मी ते तोंडाला लावलं आणि बेशुद्ध पडायचं ढोंग केला.......
याने काय साधले ? अगदी इम्पल्सिव्ह निर्णय म्हटलं तरी, त्या द्रव्याचा वास घेताना वडिलांनी पाहिलं तर मार, रट्टे, बोलणी इत्यादि घडेल या भीतीला समजू गेले असता, तेच द्रव्य पिताना वडिलांनी पाहिलं तर हा मार / रट्टे / बोलणी कशी टळली असती असं त्याला वाटलं? द्रव्याचा वास घेणं हे तुलनेत समजायला अवघड आणि लपवायला सोपं. वडिलांसमोर ते पिण्यापेक्षा.. की पोरगा सिरियस झाला या भीतीने तूर्तास तो विषय बाजूला पडला असता अशी अटकळ बांधली.. तसं तर मग तोंडाला लावून पिण्याचा आरोप न घेता नुसतंही बेशुद्ध पडल्यासारखं करता आलं असतं. उगाच आपली शंका.. लेखाच्या उत्तमपणाशी त्याचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 05/02/2012 - 14:58

In reply to अनुभव उत्तम लिहिला आहेत.. पण by गवि

Permalink

>>>याने काय साधले ? मुलाचा

>>>याने काय साधले ? मुलाचा 'अनुभव' कमी पडला असेल गवि! डॉक्टर साहेब, त्या मुलाला मिपा सदस्य करुन घ्या हो! अनेक 'सिद्धपुरुष' आहेत इथं. ज्ञान प्राप्त करके किर्पा आएगी उस लडकेपे|
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद खुस्पे on गुरुवार, 05/03/2012 - 00:39

In reply to अनुभव उत्तम लिहिला आहेत.. पण by गवि

Permalink

उगाच आपली शंका.. लेखाच्या उत्तमपणाशी त्याचा काही संबंध नाही.

आहो तिसरी मधला पोरगा...अक्कल नको तिथे जास्त.....
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 05/02/2012 - 14:58

Permalink

छेटेखानी अनुभवाचे बोल

छेटेखानी अनुभवाचे बोल आवडले. और भी आंदो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Wed, 05/02/2012 - 16:27

In reply to छेटेखानी अनुभवाचे बोल by गणपा

Permalink

+१

हेच बोल्तो.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 05/02/2012 - 17:14

Permalink

लिहित रहा! सवयीने अजून रंजकता

लिहित रहा! सवयीने अजून रंजकता वाढवता येईलच! पहिला प्रयत्न म्हणून छान आहे अवांतरः
सर्व रुग्ण व्यवस्थित आहेत याची तपासणी आणि सिस्टर ना इतर सूचना करून
काय बरं असतील 'इतर' सुचना? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद खुस्पे on गुरुवार, 05/03/2012 - 00:42

In reply to लिहित रहा! सवयीने अजून रंजकता by ऋषिकेश

Permalink

काय बरं असतील 'इतर' सुचना?

आहो सरकारी हास्पिटल्यामध्यल्या सिस्टर खरोखर सिस्टर म्हणायच्याच लायकीच्या आसतात :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 05/03/2012 - 00:44

In reply to काय बरं असतील 'इतर' सुचना? by हर्षद खुस्पे

Permalink

तुम्हाला कीती बहीणी आहेत

तुम्हाला कीती बहीणी आहेत म्हणायच्या?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com