द्रौपदी व सीता ह्या दोन व्यक्तिमत्वांच्या रूपाने व्यास व वाल्मिकी या दोन दिव्य प्रतिभावंत कवींनी स्त्रीचे आदर्श निर्माण केले. (चुकलोच की, असे म्हणू "त्यांना त्या काळात वाटले असे " ) दोघींवर प्रचंड संकटे कोसळली तरी धैर्याने त्यांना तोंड देऊन दोघींनी आपली पतीवरील निष्ठा शेवटपर्यंत कायम राखली. या बलिदानाची छाया हजारो वर्षे भारतातील सर्व स्त्रीयांवर पडली आहे. दोघींचेही जीवन अत्यंत दु:खात गेले आहे, पण सीता व द्रौपदी यांच्यात एक फरक आहे. सीतेची दु:खे श्रीरामाच्या कर्तव्यनिष्ठेतून निर्माण झाली व सीतेला त्याची पुरेपूर जाणिव होती. श्रीराम आपल्याइतकाच हतबल आहे, दु:खी आहे हे माहित असल्याने ती श्रीरामाला कधीही दोष देत नाही. द्रौपदीची संकटे तिच्या पतीच्या चुकीच्या धर्मकल्पनेमुळे निर्माण झाली व हे ठाम माहित असल्याने ती पतीला दोष देते. त्यांच्याशी वादविवाद करते. जरूर तेव्हा त्यांच्या भावनेला हाक मारते.
या दोघींचे गुण इतके सर्वश्रेष्ठ आहेत की दोनही महाकवींच्या प्रतिभेला त्यांना मानवी जन्म देणे योग्य वाटले नाही. दोघीही अयोनिज आहेत. सीतेचा जन्म भूमीतून झाला व तिने आपल्या आईकडून क्षमा, वात्सल्यता, सहनशीलता असे गुण उचलेले. ती कोणावरही रागावत नाही. द्रौपदीचा जन्म यज्ञकुंडातून झाला. ज्वालेकडून तिने धगधगित क्रोध उचलला. ती महामानिनी आपली अवहेलना १३ वर्षे विसरली नाही. कृष्ण कौरवावांव्या दरबारात जायला निघाल्यावर तिने त्याला स्पष्ट सांगितले ," माझा अपमान माझे पती विसरले असतील व त्यांना आपल्या पत्नीच्या अब्रूची चाड नसेल ; तरी माझ्या पुत्रांना आपल्या मातेची अब्रू रक्षणीय खास वाटेल. माझे पाच पुत्र अभिमन्युला पुढे करून कौरवांशी लढतील. " लक्षात घ्या, आपल्या पाच मुलांपेक्षा आपला सावत्र मुलगा युद्धशास्त्रात जास्त निपुण आहे हे तिला चांगले माहीत आहे व तो आपल्या करिता प्राणपणाने लढेल हेही ती जाणून आहे. ती पुढे कृष्णाला भरीस घालते," अभिमन्युसारखे ते पाच तुझेच भाचे आहेत." कृष्णाला तिला आश्वासन द्यावे लागले की " शत्रूंचा विनाश होऊन पती वैभवास चढलेले तू पहाशील ".
उत्पत्ती
द्रोणांनी द्रुपदाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य घेतले हा अपमान द्रुपद विसरला नाही.द्रोणांचा वध करणारा पुत्र मिळवण्यासाठी त्याने एक यज्ञ केला. त्या वेदीतून धृष्टद्युम्न बाहेर पडला व त्यामागून द्रुपदाने न मागतलेली आणि त्याला कल्पनाही नसलेली कुमारी, द्रौपदी, उत्पन्न झाली. तिच्या अंगप्रत्यंगातून सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार होत असून ती अत्यंत लावण्यसंपन्न होती. सावळ्या रंगाची, निळ्या कमलाप्रमाणे विशाल नयन, लांबसडक काळेभोर केस,धनुष्याकृति भिवया, यामुळे इहलोकी आलेली साक्षात देवताच वाटत होती. ती इतकी सुंदर होती की अर्जुनाने पण जिंकला होता तरी सर्व भावांना ती पत्नी म्हणून पाहिजे होती. मग तिला पाचही भावंडांशी लग्न करावे लागले व तसे केले नाही तर आपणास अर्जुन मिळणार नाही जे जाणून तिने परिस्थितीचा स्विकार केला.
महाभारतातील तीनही सौंदर्ययुक्त व्यक्ती कृष्ण, द्रौपदी व अर्जुन रंगाने सावळ्याच आहेत.
शिक्षण
महाभारतकाळी स्त्रीया शिकण्यासाठी गुरूगृही जात नसत. त्यांचे शिक्षंण घरीच घरातले वृद्ध, मुद्दाम योजलेले गुरू यांच्याकडून होत असे. द्रुपदाने मुलीला उत्तम शिक्षण दिले होते. महाभारतकार तिला "पंडिता " म्हणतात. युधिष्टराशी ती वाद घालत असते तेव्हा याची खात्री पटते. (येथे उतारे देत नाही.)
स्वयंवर
द्रुपदाची इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी अशी होती. पण पांडव जळून मेले अशी बातमी आली म्हणून त्याने असा पण लावला की असला तर अर्जुन किंवा निदान त्याच्या समान योद्धाच तो पण जिंकेल. स्वयंवराच्यावेळी धृष्टद्युम्नाने घॊषणा केली की " हे धनुष्य, हे बाण. यांनी लक्ष्यवेध करावयाचा आहे. हे महान कृत्य करणारा जो कोणी आमच्या कुळाला योग्य असा कुळवंत, रूपवान व बलसंपन्न असेल त्याचीच भार्या माझी ही भगिनी कृष्णा होईल." अटी स्वच्छ शब्दात सांगितल्या आहेत. कर्णाने धनुष्याला हात घातल्यावर द्रौपदीने उच्च स्वरात सांगितले की " काय वाटेल ते झाले तरी मी सूताला वरणार नाही." यात कर्णाचा अपमान झाला हे खरे पण ती त्याने आपल्यावर ओढून घेतलेली आपत्ती होती.
द्युतप्रसंग
या प्रसंगी द्रौपदी प्रथम वकिली डावपेच खेळली. तिने भीष्म-द्रोणांना साक्षीला बोलाविले. चांडाळचौकडीपुढे त्याचा काही उपयोग झाला नाही व शेवटी गांधारीच्या सांगण्यावरूनच तिची सुटका झाली. धतराष्ट्राने तिला वर मागावयास सांगितल्यावर तिने युधिष्ठिराला दासमुक्त करण्यास सांगितले. ती म्हणते " माझा मुलगा अतिविंध्य याला लोकांनी दासपुत्र म्हणू नये. मोठमोठ्या राजांनी सम्राटाचा पुत्र म्हणून त्याचे कौतुक केले, त्याला दासपुत्र असे विशेषण कोणी लावावयाला नको ". धृतराष्ट्र तिला दुसरा वर माग म्हणाल्यावर तिने शस्त्रास्त्रांसहित भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे स्वातंत्र्य मागितले. तो तिसरा वर माग म्हणाल्यावर तिने त्याला नकार दिला. " लोभ धर्माचा नाश करतो. दुर्गतीतून पार पडून स्वतंत्र झालेले माझे पति स्वत:च्या भरवशावर गेलेले वैभव परत मिळवतील. " आता तिला वर मागून मिळवलेले राज्य नको आहे. स्वत:च्या पतींनी पराक्रम करून, कौरवांना धूळीत मिळवून मिळवलेले राज्य हवे आहे.
वनवास
वनवासात तिच्यावर संकटे कोसळली, दुर्वासांकडून सत्वपरिक्षेचा प्रसंग ओढवला. जयद्रथाने पळवून नेले व इच्छा असूनही त्याला देहदंड देता आला नाही. प्रिय पती अर्जुन याला युद्धाच्या वेळी उपयोगी पडणारी अस्त्रे देवांकडून मिळवण्यासाठी दूर जाण्याची गरज निर्माण झाली म्हणून निरोप द्यावा लागला. परंतु वनवासात एक असा प्रसंग घडला की व्यासांनी त्यात तिच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा एक दैदिप्यमान पैलू दाखवून दिला.
पांडवांना भेटावयाला श्रीकृष्ण सत्यभामेसह वनात आला. तेव्हा एकांतात असतांना भामेने द्रौपदीला विचारले की " हे द्रौपदी, लोकपालासारखे पराक्रमी, एकमेकावर प्रेम करणारे पांडव तू स्वाधिन करून घेतले आहेस, ते तुझ्यावर कधीही कृद्ध होत नाहीत, प्रत्येक महत्वाच्या गोष्टीत तुझ्याकडून मार्गदर्शन होईल अशा अपेक्षेने तुझ्याकडे पाहतात, इतके वर्चस्व त्यांच्यावर गाजवण्यासाठी तू कोणते व्रत, मंत्र, विद्या, औषध, अंजन इ,चा उपयोग करतेस ते मला सांग. म्हणजे मी ही कृष्णावर त्याचा उपयोग करून त्याला कायमचे माझे स्वाधीन करून घेईन." द्रौपदीने दिलेले उत्तर व्यासांनी ६०-७० श्लोकात दिले आहे. आपण त्यातले काही पाहू.
" हे सत्यभामे, दुर्वृत्त व भ्रष्ट स्त्रीयांचा मार्ग तू विचारलास, मी त्याचे काय उत्तर देऊं? श्रीकृष्णाची प्रिय महाराणी होण्याचे भाग्य लाभलेल्या स्त्रीच्या तोंडी असा प्रश्न वा संशय शोभत नाही. मंत्र वा औषध यांच्या सहाय्याने स्त्री आपल्याला स्वाधीन ठेवते असे पतीला कळले तर तिचे दर्शनही त्याला त्रासदायक वाटेल. अन्नातून भलत्याभलत्या गोष्टींची प्रयोग करून जलोदर, कुक्षीव्याधी,श्वेतकुष्ठ, जडत्व, अंधत्व बधिरपणा, नपुंसकत्व असे भीषण रोग पतीला जडतात. असे आचरण पत्नीने कधीही करू नये.
पतीला स्वाधीन करून घ्यावयाचा खरा मार्ग आपल्या पतीला आवडणार नाही असे आचरण पत्नीने कधीही न करणे हाच आहे. बसणे, जाणे,हावभाव वा अंत:करणचे निश्चय यापैकी कोणत्याही बाबतीत यत्किंचित देखील त्यांच्या मनाला लागण्यासारखे काहीही घडू नये यासाठी मी सदैव जपत असते. माझ्या पतींचे भोजन झाल्याखेरिज,त्यांनी विश्रांति घेतल्याविना मी कधीही भोजन व विश्रांतीची अपेक्षाही करत नाही. माझे पति कोठूनही आले तरी दासदासींऐवजी मीच उठून त्यांना आसन व उदक देऊन, मी त्यांचे अंत:करणपूर्वक स्वागत करते.घर व उपकरणे सदैव स्वच्छ राहतील,वेळेवर उत्कृष्ट अन्नाचे भोजन त्यांना मिळेल याची मी स्वत: काळजी घेते.खूप हसणे, खूप रागावणे हे मी चुकुनही कधी करत नाही. माझे पति खानापानात जी गोष्ट आणू इच्छित नाहीत, ज्या गोष्टींचा उपभोग ते घेत नाहीत त्या गोष्टी मी पूर्णपणे वर्जित केल्या आहेत .व्रतनियमांचे मी विनयपूर्वक, आळस न करता आचरण करते. मी नेहमी पतीपेक्षा जास्त निजणे,अधिक खाणे वा स्वत:चा थाटमाट करणे या गोष्टी टाळते. उदार अंत:करणाच्या कुंतीबद्दल कधीही वाईट बोलत नाही. ब्राह्मण, स्नातक,गडी माणसे, दासी हजारोंनी होत्या, त्या सर्वांकडे माझे पूर्ण लक्ष असे. पांडवांच्या आयव्ययाची मला पूर्णपणे माहिती होती. माझ्यावर कुटुंबांचा, राज्यातील अंत:पुराचा भार टाकून पांडव आपापल्या कामात गढून राहात. दिवस आणि रात्री पांडवांचे मन संभाळीत असता मला दिवस आणि रात्र सारखेच झाले आहेत. मी पतीच्या आधी उठते व नंतर झोपते.पतीसारखे सर्व जगात दैवत नाहे. त्याच्या प्रसन्नतेत सर्व इच्छा पूर्ण होतात व त्याच्या अप्रसन्नतेत सर्व इच्छांचा विघात होतो." या नंतर तिने सत्यभामेला श्रीकृष्णाचे प्रेम मिळवण्याकरिता काही tips दिल्या आहेत.त्यातील दोनतीन पाहू. " कृष्णाचे जे आवडते, त्याच्यावर प्रेम करणारे लोक असतील त्यांना विविध उपायांनी भोजन घाल, त्यांची व्यवस्था ठेव. जे कृष्णाचे द्वेष्य, उपेक्ष्य व त्याला अहितकारक असे लोक असतील त्यांच्यापासून चार पावले दूर रहा, कृष्ण तुझ्यजवल जे काही बोलेल ते त्याने गुप्त ठेवावयास सांगितले नसले तरी ते स्वत:च्या अंत:करणातच ठेव. ते तू कोणाशी बोललीस व ते तुझ्या सवतींच्या कानावर गेले आणि ते त्यांनी कृष्णाला सांगितले तर तो तुला वेंधळी समजून तुझ्याविषयी उदासिन होईल "
(द्वापारयुग, दुसरे काय ?)
वज्राघातांची परंपरा
द्रुपद राजाची मुलगी, पाच जगद्जेत्या वीरांची पत्नी, श्रीकृष्णाची प्रिय भगिनी, सुंदर व सद्गुणी द्रौपदी; खरे म्हणजे तिला काहीच दु:ख भोगावे लागावयाचे कारण नव्हते. पण नियतीने तिच्यावर कठोर प्रहार केले. पहिला द्युतप्रसंग, गांधारीमुळे ती त्यातून सुटली. वनवासात जयद्रथाचे तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला,पांडव वेळेवर आल्याने तो फसला. खरे म्हणजे भीम त्याला मारूनच टाकणार होता. पण तो धतराष्ट्राचा जावई होता व आपली बहीण विधवा होऊ नये म्हणून युधिष्टिराने त्याला सोडून दिले. तिसरा विराटाच्या घरी कीचकाचा. तिने भीमाला सांगितले की " तुम्हाला अज्ञातवासाच्या काळात आपण प्रगट होऊ याची भीती वाटत असेल तर तुम्ही गप्प बसा. उद्या सकाळी कीचक मेलेला नसेल तर मी विष खाऊन जीव देईन." भीमाने रात्रीच कीचकाला ठार केले. शेवटचा, युद्ध संपल्यावर, अश्वत्थाम्याने रात्री तिची मुले मारून टाकली ! स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी !!
(लेख लांबला, मान्य. पुढील भीष्मांच्या लेखात काळजी घेईन.)
शरद
प्रतिक्रिया
12 Apr 2012 - 8:21 am | amit_m
आत्तापर्यन्त द्रौपदीचा रोल केवळ वस्त्रहरणापर्यन्तच माहिती होता.
12 Apr 2012 - 8:59 am | इरसाल
लेख अजिबात लांबलेला नाही, उलट अजुन पुढे हवा अजुन हवा असे वाचताना सतत वाटत होते.
लेख खुप म्हणजे खुपच आवडला.
12 Apr 2012 - 12:34 pm | नन्दादीप
<<लेख अजिबात लांबलेला नाही>>
असेच म्हणतो......
12 Apr 2012 - 10:35 am | मिसळलेला काव्यप्रेमी
अत्यंत संयत व माहितीपूर्ण लेख.
आपले शतशः धन्यवाद.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
12 Apr 2012 - 10:48 am | मृत्युन्जय
लेख लांबलेला नाही हो. अजुन थोड मोठा झाला असता तरी चालले असते.
द्रौपदीने अर्जुन मिळावा म्हणुन पाचही जणांशी लग्नाला संमती दिली हे चुकीचे वाटते. तिची संमती विचारण्यात आली होती पंरंतु त्याला फारशी किंमत होती असे वाटत नाही. काय करायचे हे कुंतीने आधीच ठरवुन ठेवले होते. माझे शब्द निष्फळ ठरण्यचा अधर्म माझ्या हातुन होउ नये असे बघा असा कावेबाज पणा कुंतीने केला यातच सगळे आले. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की पाच पती मिळणे यात द्रौपदीला उलट आनंदच वाटला.
द्रौपदी पाच पतींशी देखील एकनिष्ठ राहिल हे तिचे शत्रु देखील जाणुन होते. पांडवांमध्ये फूट पाडण्यासाठी द्रौपदीचा वापर करावा असे दुर्योधनाने सुचवल्यावर असा वेडेपणा चुकुनसुद्धा करु नकोस द्रौपदी पाचही पांडवांशी एकनिष्ठच राहिल असे त्याला कर्णाने सुनावले होते.
द्रौपदीची अजुन एक बाजू लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे कोणाच्याही भावभावनांना आणि अंतर्मनाला ती अगदी सहजपणे हात घालु शकत असे. जेव्हा तिची पाचही मुले मारली गेली तेव्हा तिने अश्वत्थाम्याला मारण्याची इच्छा व्यक्त केली. ते शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्याही परिस्थितीत तिला अश्वत्थाम्याचा मणी काढुन घ्यावा हे सुचले आणि जे लोक मेले (तिची मुले सोडुन) ते स्वतः अन्य्यायाने लढले हे माहिती असुनही तो मणी काढुन घेण्यास तिने सर्वांना प्रवृत्त केले हे विशेष.
तिने सूडाचा विखार कधी शांत नाही होउ दिला हे ही विशेष. युधिष्ठिर सर्वात शांत आहे आणि युद्धाला तो घाबरतो हे ती निश्चितपणे जाणुन होती. त्यामुळे १२ वर्षाच्या वनवासात तिने त्याला सुखाने असे कधी जगु दिले नाही. ती त्याला द्युताबद्दल सतत टोमणे मारायची. स्वतःचे केसे १३ वर्षे मोकळे सोडुन तिने स्वतःच्या अपमानाचा विसर पाचही नवर्यांना पडु दिला नाही हे विशेष.
12 Apr 2012 - 10:50 am | प्रीत-मोहर
असेच म्हणते.
मस्त लेख आहे.
12 Apr 2012 - 11:09 am | शिल्पा ब
तिचा ज्या प्रकारे अपमान झाला त्यामुळे सुड घेण्याची भावना सहाजिकच आहे. बायकोच्या अपमानाचा सुड घेणारे दुसरे उदाहरण दिसत नाही. मुख्य म्हणजे बायकोचा अपमान न होउ देणे महत्वाचे.
कुंतीचं वागणं पटत नाही याचं हे एक अजुन उदा.
अजोनिज वगैरे तर अजिबात शक्यच नाही. भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासात उलगडा होईल.
बाकी अश्वत्थामा या पात्राबद्दल काही समजत नाही. कसलासा मणी कपाळावर असल्याने तो अमर कसा? अमर कोणीच नसतं त्यामुळे याचा उलगडा झाला तर आवडेल.
12 Apr 2012 - 11:42 am | मृत्युन्जय
बाकी अश्वत्थामा या पात्राबद्दल काही समजत नाही. कसलासा मणी कपाळावर असल्याने तो अमर कसा? अमर कोणीच नसतं त्यामुळे याचा उलगडा झाला तर आवडेल.
अंमळ गल्लत होते आहे. तो मणी त्याचे विकारांपासुन संरक्षण करायचा आणि त्याच्या जखमा लवकर भरुन यायच्या तसेच त्याला नागांचे अथवा राक्षसांचे भय उरायचे नाही. तसेच त्याची भुक पण आटोक्यात रहायची (म्हणजे त्याचे भुकेवर नियंत्रण रहायचे) पण त्या मण्यामुळे तो अमर नव्हता.
अमरत्व हे त्याला मिळालेले वरदान नव्हते तर शाप होता. त्याने ब्रह्मशीर उत्तरेच्या गर्भावर वापरले म्हणुन कृष्णाने त्याला ३००० वर्षे वणवण भटकण्याचा शाप दिला. ३००० वर्षे संपुन गेली असली तर इतर पुराणांनुसार कृष्णाच्या शापाने तो अमर झाला असे मानण्यात येते,
12 Apr 2012 - 2:06 pm | शरद
सप्त चिरंजीव
अश्वत्थामा अमर म्हणजे चिरंजीव होता.
अश्वत्थामा बलीर्व्यासो हनुमानस्च बिभीषण: !
कृप:परशुरामस्च सप्तैता चिरजीविन: !!
अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण आणि कृपाचार्य, हे सात चिरंजीव मानले जातात.
शरद
14 Apr 2012 - 5:53 pm | मृगनयनी
सहमत शरद'जी... :)
12 Apr 2012 - 3:25 pm | कपिलमुनी
परशुराम , अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण आणि कृपाचार्य
या ७ व्यक्तीरेखा ७ वेगवेगळ्या वृती आहेत ..ज्या आपल्याला सदैव आढळून येतात ..
म्हणून त्यांना अमर आहे असे म्हणतात ..
14 Apr 2012 - 5:38 pm | मृगनयनी
या ७ व्यक्तीरेखांमध्ये आपल्याला सदैव आढळून येणार्या ७ वृत्तींवर अधिक प्रकाश टाकून त्याबद्दल उचित माहिती दिल्यास कदाचित आमच्याही ज्ञानात भर पडू शकते.
1 May 2012 - 10:25 am | जेनी...
सहमत म्रुगनयनीशी ..
वाचायला आवडेल त्यांच्याबाबतचे खुलासे .
1 May 2012 - 10:39 am | मृगनयनी
पूजा... आपली उत्सुकता अगदी शिगेला पोचलीये ना!!!.. नवे ज्ञानार्जन करण्यासाठी ... :)
26 Apr 2012 - 12:04 pm | मृगनयनी
कपिलमुनी...
त्या "सात" वेगवेगळ्या सदैव आढळून येणार्या वृत्ती अजून तुम्ही सांगितल्याच्च नाहीत की...... ७ दुणे १४ दिवस झालेत.. :|
अजून तुम्हांस या सात वृत्तींशी रिलेटेड उचित सन्दर्भ सापडले नाहीत का ?
की ते आपलं....उगीचंच काहीही.......उचलली लेखणी आणि लागले टंकायला!!! :)
30 Apr 2012 - 10:45 am | कपिलमुनी
या विषयीचे विवेचन नक्की लिहिन
बाकी
>>उगीचंच काहीही.......उचलली लेखणी आणि लागले टंकायला!!! हे स्कोर सेटलिंग का
30 Apr 2012 - 12:28 pm | मृगनयनी
ओक्के!.. आयॅम वेटिन्ग! :) :)
या पर्टीक्युलर "सात वृत्ती" शोधायला तुम्हाला बराच वेळ लागू शकतो.. कारण "सप्तचिरंजीवी म्हणजेच सात वृत्ती" वगैरे सन्दर्भ आत्तापर्यन्त तरी कुठल्याही वेबसाईटवर कुणी टाकलेले नाहीत!! ;) ;) त्यामुळे योग्य ते सन्दर्भ शोधणे आणि "सप्तचिरन्जीवी या सात वृत्ती आहेत" हे सिद्ध करणे.. कठीण जाऊ शकते.
असो!.. अभ्यास वाढवा.... :)
1 May 2012 - 4:45 am | शिल्पा ब
<<"सप्तचिरंजीवी म्हणजेच सात वृत्ती" वगैरे सन्दर्भ आत्तापर्यन्त तरी कुठल्याही वेबसाईटवर कुणी टाकलेले नाहीत!!
तुमची शोधाशोध करुन झालीये का? तुम्ही खात्रीने म्हणताय म्हणुन विचारलं इतकंच. राग नसावा ही विनंती.
1 May 2012 - 10:20 am | मृगनयनी
@शिल्पा ब'-
आमच्यासारख्या काही लोकांचा सप्तचिरंजीवी आणि त्यांच्या माहात्म्यावर पूर्ण विश्वस आहे. परन्तु आपल्यासारख्या (राग नसावा! हं) काही लोकांचे असे म्हणणे आहे की
मुळात "सप्तचिरंजीवी म्हणजे सात वृत्ती आहेत, सप्तचिरन्जीवी अस्तित्वातच नव्हते / नाही" ही संकल्पनाच चुकीची आहे.
त्यामुळे जर या खरोखर "सात वृत्ती" आहेत.. किन्वा सप्तचिरन्जीवी काल्पनिक आहेत..असे जर वाटत असेल तर ते कसे... तर ते आम्हालाही कळू द्यात, असे आम्ही कपिलमुनीं'ना सांगितले...
कारण "त्या" खरोखरच सात वृत्ती वगैरे असतील आणि कुणाला माहित असतील .. तर त्या इथे टंकायला असा फारसा वेळ लागत नाही! :) नाही का? ;) ;)
पण आता इतके दिवस होऊनही अजून त्यांनी काही प्रतिसाद न दिल्याने आणि ते कामात व्यग्र असून सवडीने त्या "सात वृत्तीं"बद्दल सांगणार असल्याचे कळल्यावर आम्हाला वाटले, की बहुधा कपिलमुनींनाही या सप्तचिरन्जीवीबादल आणि तथाकथित सात वृत्तींबद्दल फारसे माहित नसावे! :)
पण आता सात वृत्तींबद्दल सांगायचेच ठरवले, म्हटल्यावर त्यांचा मुळापासून शोध घेण्याचा प्रयत्न नक्की होणार.. हे ओघानेच आले..
आणि काहीच माहित नसलेल्या गोष्टी शोधण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे "वेबसाईट- लिक्न्स" वगैरे शोधून माहिती गोळा करणे! ..-अर्थात या मार्गात :ताकाला जाऊन भान्डे लपवण्यासारखे काहीच नाही. :)
त्यामुळे आमच्या संशोधनानुसार कुणी याही मार्गाने गेल्यास यश मिळणार नाही.. उगीच वेळ वाया जाईल..असा निष्कर्ष काढला... कारण आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार? नाही का!!! शिल्पा ब!..
असो.- या सप्तचिरन्जीवींच्या सश्रद्ध उपासनेचा लोकांना फार फायदा होतो बरंका!.. नवर्याशी न पटणार्या किन्वा न पटवून घेणार्या बायकांनी या सप्तचिरन्जीवींची उपासना जरूर करावी.. उचित लाभ होतो.. :)
1 May 2012 - 10:49 am | शिल्पा ब
हे सप्तचिरंजीवी वगैरे समजा अस्तित्वात होते असं मानलं, बरं का मृगनयनी, तरी ते खरोखरंच चिरंजीवी म्हणजे मरण न येणारे सजीव आहेत असा तुमचा समज असेल तर ते कसं हे सांगितलं तर आम्हालाही कळेल. त्यापेक्षा सात वृत्ती आहेत वगैरे खुलासा पटण्यासारखा वाटतो.
आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट नाही सापडली, संशोधनकरुनसुद्धा याचा अर्थ ती नाहीच असा होत नाही..फक्त तुम्हाला शोधता आली नाही असा अर्थ होतो..नाही का? मृगनयनी!
असो, तुम्हाला या चिरंजीवीउपासनेचा फायदा झाल्याचे वाचुन आनंद वाटला. जालावरच्या लोकांशी पटण्यासाठी किंवा पटवुन घेण्यासाठी कोणतं व्रत करत आहात? कितपत फायदा झाला? म्हणजे तुम्हीच विषय काढला म्हणुन विचारतेय!!
1 May 2012 - 11:56 am | मृगनयनी
हे सप्तचिरंजीवी वगैरे समजा अस्तित्वात होते असं मानलं, बरं का मृगनयनी, तरी ते खरोखरंच चिरंजीवी म्हणजे मरण न येणारे सजीव आहेत असा तुमचा समज असेल तर ते कसं हे सांगितलं तर आम्हालाही कळेल. त्यापेक्षा सात वृत्ती आहेत वगैरे खुलासा पटण्यासारखा वाटतो.
:) बिभीषण, कृपाचार्य, परशुराम, हनुमान, वेदव्यास, बलि, अश्वत्थामा हे सप्तचिरंजीवी आहेत.. अर्थात वर यांचा उल्लेख केला गेला आहेच!.. परन्तु आधी विचारलेल्या प्रश्नानुसार "त्या सात वृत्ती" कोणत्या?.. हा प्रश्न मात्र सोईस्करपणे टाळला जात आहे!! :) आणि "त्या" सात वृत्तींबद्दल काहीही कवडीइतकी माहिती नसतानादेखील आपल्याला "सात वृत्ती आहेत वगैरे खुलासा पटण्यासारखा वाटत असेल." तर मग शेवटी ज्याची त्याची बौद्धिक / मानसिक कुवत आणि समज!! :) :)
आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट नाही सापडली, संशोधनकरुनसुद्धा याचा अर्थ ती नाहीच असा होत नाही..फक्त तुम्हाला शोधता आली नाही असा अर्थ होतो..नाही का? मृगनयनी!
ठ्ठॉSSSSठ्ठॉSSSSठ्ठॉSSSS
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सारवासारवीचा पुन्हा एकदा क्षीण प्रयत्न!!! ;)
असो.. त्या सात वृत्तींबद्दल काय म्हणणे आहे मग? ;)
असो, तुम्हाला या चिरंजीवीउपासनेचा फायदा झाल्याचे वाचुन आनंद वाटला. जालावरच्या लोकांशी पटण्यासाठी किंवा पटवुन घेण्यासाठी कोणतं व्रत करत आहात? कितपत फायदा झाला? म्हणजे तुम्हीच विषय काढला म्हणुन विचारतेय!!
जालावरच्या लोकांबरोबर पटवून घेण्याचा प्रश्नच नाही.. समविचारी लोकांशी माझी मते पूर्वीही पटत होती. आणि आजही पटतात..
काही अश्रद्ध, देवाचे- गुरुंचे अस्तित्व नाकारणार्या, त्यांची कुचेष्टा करणार्या लोकांबरोबर माझे पटवून घेणे.. तर कदापि शक्यच नाही...माझी तशी इच्छाही नाही.. कारण या लोकांची पात्रता, कुवत वगैरे गोष्टींवर मिपावर याआधीही उहापोह झाला आहे. स्वतःला अतिशहाणे समजाणार्या तथाकथित बुद्धिवाद्यांबरोबर फक्त त्यांच्या कम्पूबाझांचे पटते.. माझे किन्वा माझ्या समविचारी लोकांचे यांच्याबरोबर पटणे शक्यच नाही...
आणि शिल्पा ताई- पटण्याबाबतच म्हणत असाल. तर स्वतःच्या "टोकदार" मतांमुळे इथल्या लोकांबरोबर पटत नसल्याचे काही लोकांनी ऑलरेडी खरडवह्यांवर डिक्लेअर केलेलं आहे...
"बाहेर भाव मिळेल" या आशेने इथून बाहेर पडलेले लोक्स २ महिन्यांतच "आशाभंग" झाल्याने पुन्हा इकडे कार्यरत झालेले आहेत..
असो..
अॅक्चुली दोनेक वर्षांपूर्वी मिसळ्पाववर नवीन आलेल्या एका परदेशस्थ ( बहुधा अमेरिका स्थित) महिलेने माझ्याशी ओळख करवून घेताना मला "संदेश" माध्यमातून असा सल्ला /निरोप पाठवला होता, की- "माझे (त्या "श" महिलेचे) आणि माझ्या नवर्याचे बिल्कूल पटत नाही.. लग्न करून मी पस्तावलेय... उगीच काहीच विचार न करता मी लग्न केलं.. पण तू ( पक्षी:- मी) मात्र नीट विचार करून लग्न कर हं!!!.." वगैरे वगैरे.. अनाहुत सल्लेही दिले गेले!... ;) ;) ;)
त्यामुळे "सप्तचिरंजीवीं"ची उपासना करण्याचा सल्ला मी त्या बिच्चार्या परदेशस्थ महिलेसाठी दिला आहे.. :) अर्थात "त्या" महिलेचा या सगळ्यावर विश्वास असला.. तरच तिने ही उपासना करावी... विश्वास नसेल.. तर ती बिच्चारी "सात वृत्ती"च शोधत बसायची! ;) ;) ;)
आणि मला सध्यातरी या स्पेश्शल उपासनेची गरज नाही! :) :) :)
1 May 2012 - 12:01 pm | शिल्पा ब
एवढं मोठठं लिहुन तात्पर्य काहीच नाही. तुम्ही म्हणताय ते सात जण चिरंजीवी आहेत याचाच अर्थ अजुनही जिवंत आहेत असा होतो...अन ते कधीही मरणार नाही असापण होतो. याविषयी काहीही न लिहिता फाटे फोडणं चालु आहे. वर मलाच प्रश्नाला बगल दिली म्हणताय!!
मला त्या सात वृत्तींबद्दल काहीच म्हणायचं नाही कारण कपिलमुनींचा प्रतिसाद येईपर्यंत अशी काही भानगड आहे हेच माहीत नव्हते....पण सात सजीव कधीही मरणार नाहीत यापेक्षा सात वृत्ती कधीही मरणार नाहीत हे पटण्याजोगंच आहे. अर्थात ही आमची समज आहे.
आता बाकीच्या लोकांनी त्यांच्या खवत काय केलंय याचा अन माझा काडीचाही संबंध नाही...अन कोणी तुम्हाला काय व्यनि केला त्याचं उत्तर इतक्या वर्षांनी या धाग्यावर देण्याचं प्रयोजनही समजलं नाही.
असो..आपला देवभोळेपणा अन आपल्या गुरुंनी आपल्यावर केलेले संस्कार पाहुन मन आनंदीत झाले हे वेगळे सांगायची आवश्यकता नाहीच.
4 May 2012 - 6:54 pm | कपिलमुनी
तुम्हाला उत्तर मिळाला असेल अशी आशा करतो..
मि काही दिवस व्यग्र होतो तसा प्रतिसाददेखील दिला होता ..पण २-४ लिंका बघून ...शब्द टंकून गुगल केले म्हणजे "संशोधन " केले असा समज असणार्या बद्दल काय बोलायचे ...
प्रॅक्टीकली कोणताही माणूस अमर असणे शक्य नाही ..
बाकी माझे मत मांडले आहे ..कोणताही प्रश्न सोयीस्कररीत्या न टाळता..
आपले "सप्तचिरंजीवीं" बद्दल काय मत अहे ?? ते सजीव असून अजुन जिवंत आहेत का ?? कि तुम्हाला सात वृतींचे मत पटते ?
की काहीच मत नाही ??
अभ्यास वाढवा ..(जालासोबत पुस्तके पण वाचत चला...पुढेतोंडघशी पडणार नाहीत)
बाकी शेवटी ज्याची त्याची बौद्धिक / मानसिक कुवत आणि समज!
4 May 2012 - 6:26 pm | कपिलमुनी
या साठी मिपाकर शरद यांनी मोलाची मदत केली ..
श्री. दाजी पणशीकरांच्या "महाभारत एक सुडाचा प्रवास " यातील ९ व्या लेखात त्यांनी ही कल्पना मांडली आहे.
हे पुस्तक मिळणे शक्य असेल तर उत्तमच. थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :
(१) अश्वत्थामा --- अतिरिक्त दरिद्री माणुस बुद्धिमत्ता असूनही जेव्हा त्याची महत्वाकांक्षा अपूरी राहते तेव्हा जी व्रुत्ती निर्माण होते ती.
(२) बळी -- अतिरिक्त दानवृत्ती
(३) महर्षी व्यास --अत्युत्कट प्रतिभा
(४) हनुमान -- दास्यवृत्ती
(५) बिभीषण -- भ्याडवृत्ती
(६) कृप -- लाचारव्रुत्ती
(७) परशुराम -- अविवेकी सूडवृत्ती
अवांतर : सगळे ज्ञान वेबसाईटवर मिळते हा समज चुकीचा आहे..जालावर शोधले म्हणजे संदर्भ शोधून झाले असे समजणे त्याहून चुकिचे आहे ..
असो!.. अभ्यास वाढवा....
14 May 2012 - 4:11 pm | मृगनयनी
@ कपिलमुनी,
'शिल्पा ब'नी मला दिलेल्या अर्थहीन प्रतिसादावरून तुम्हाला असे वाटत असेल.. की मला उत्तर दिले गेले आहे.. तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण 'शिल्पा ब' यांना त्या सात वृत्ती किन्वा सप्तचिरन्जीवींबद्दल काहीही घेणेदेणे नाही. कारण एखाद्या लेखात देव्,पुराण,गुरु इ.शी संबंधित गोष्टी दिसल्या की त्यावर आगपाखड करून खिल्ली उडवणे, इतकेच त्यांना येते. बाकी धर्मिक, अध्यात्मिक गोष्टींवर त्यांचा विश्वास नसल्याने निर्जीव असलेल्या सात वृत्ती.. मग त्या कोणत्या का असेनात..त्या माहित नसल्या तरी.. शिल्पा ब' यांचा त्या वृत्तींवर विश्वास आहे!
..अर्थात वरच्या कुठल्याश्या प्रतिसादात त्यांनी स्वतःच हे कबूल केले आहे! :)
असो! .. कपिलमुनी... मुळात 'सात चिरन्जीवीं' अमर असू शकतच नाहीत. या ठाम (अन्ध)विश्वासामुळे '१२ एप्रिल रोजी आपण आपल्या प्रतिसादात "सात वृत्तींचा" उल्लेख केलेला होता. पण फक्त "सात वृत्ती"- असा उल्लेख!.. त्या कोणत्या आहेत..त्यांचा आणि सप्तचिरन्जीवींचा सम्बंध काय.. याबद्दल तुम्हाला कवडीचीही माहिती नव्हती. उगीचंच ते सात नरश्रेष्ठ चिरंजीव असू शकत नाहीत.. हे नाकारण्यासाठी आपण सात वृत्तींचा उल्लेख केला.
बरं आपल्या १२ एप्रिल'च्या प्रतिसादानन्तर १४ एप्रिल'ला मी आपल्याला विचारले, की "कृपया सात वृत्ती कोणत्या ते सान्गा.. म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल!"..
परन्तु त्याव्रर आपला कोणताही प्रतिसाद आलेला नव्हता! त्यानन्तर पुन्हा २६ एप्रिल' रोजी त्या सत वृत्तींबद्दल मी आपल्याला रिमाईन्ड केले.. व "उचित सन्दर्भ सापडत नाहीत का" असाही प्रश्न विचारला..
नॉर्मली कसे असते.. की जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीबद्दल ठामपणे बोलतो.. तेव्हा त्यास त्या गोष्टीबद्दल माहिती असावी.. असे गृहीत धरले जाते. त्यामुळे तुम्हालाही सात वृत्तींबाद्दल माहिती असेल.. असा माझा (गैर) समज झाला!
कारण २ दा विचारणा करूनदेखील तुमचा प्रतिसाद थन्ड होता.
माझ्या माहितीनुसार २६ एप्रिल'ला हा प्रश्न विचारल्या गेल्यानन्तर २ मिनिटांत आपण लॉगिन झालात.. आणि बराच वेळ लॉगिनच होतात!!
पण त्या दिवशीदेखील "सात वृत्तीं"बद्दल माहिती मिळालीच नाही की!
शेवटी अगदीच पिच्छा पुरवल्यावर सोईस्करपणे ३० एप्रिल'ला "व्यग्र आहे...या विषयीचे विवेचन नक्की लिहीन" असा सौम्य प्रतिसाद लिहून आपण शान्त राहिलात. त्यामुळे मला असे वाटले, की मी एवढा पाठपुरावा करायला लागल्यावर तुम्ही नक्कीच त्या सात वृत्तींचे सन्दर्भ शोधयला लागणार!!!...
आणि नक्कीच या सात वृत्तींचा शोध आधी सहज उपलब्ध असणार्या इन्टरनेटवर घेतला जाणार.. हे ओघानेच आले!!..इन्टरनेटवरही त्याबद्दल उचित माहिती न सापडल्याने आपणास सन्दर्भ पुस्तकांचा आधार घ्यावा लागला!!!.. आणि तोही 'सप्तचिरंजीवीं'ची स्तोत्राद्वारे स्तुती करणार्या शरद'जींच्या मदतीने!
=))
शरद'जींना याच लेखात मी दिलेल्या एका प्रतिसादातल्या सन्दर्भाबद्दल शन्का होती. विराटराजाची पत्नी- सुदेष्णा आणि कीचक यांचे नाते बहीण भावाचे कसे?.. याबद्दल शरद'जी साशंक होते. तसा त्यांनी मला 'सन्देश"ही केला होता. व मी उचित सन्दर्भ त्यांना देऊन शन्का निरसनही केले होते. असो.. शरद'जींकडे अजून रिलेटेड पुस्तकांबद्दल तुम्ही सन्दर्भ विचारले असते.. तर कदाचित तुमच्याही ज्ञानात अधिक आणि उचित भर पडली असती!!!
बाकी सप्तचिरंजीवींबद्दल माझे मत विचारत असाल, तर हो!.. माझा पूर्ण विश्वास आहे की परशुराम, अश्वत्थामा,बली, व्यास, हनुमान, बिभीषण आणि कृपाचार्य हे सर्वजण अमर आहेत!.. आणि ते अमर आहेत.. म्हणूनच त्यांना "चिरंजीवी" असे सम्बोधले जाते. या सात जणांच्या व्यतिरिक्त "नारद" आणि "मार्कंडेय" यांनादेखील चिरंजीवी मानले जाते.
मी वाचलेल्या विष्णुपुराण, मार्कंडेय पुराण, पद्म पुराण, शिवपुराण, नारद पुराण, भागवतपुराण, वामनपुराण, रामायण, महाभारत (ओरिजिनल), दुर्गा सप्तशती यांमध्ये
वर नमूद केलेल्या सप्तचिरंजीवींचा आणि मार्कंडेय ऋषींचा देखील उल्लेख आहे. तसेच काही ठिकाणी हरिभक्त "नारदमुनी"देखील चिरंजीवी मानले गेले आहेत.
कपिलमुनी, मला वाटले होते, की इन्टरनेटव्यतिरिक्त सप्तचिरिन्जीवींबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही एखाद्या पुराणाचा किन्वा धार्मिक ग्रन्थाचा आधार घ्याल. पण तुम्ही तिथेही गोची केली.. "महाभारत एक सुडाचा प्रवास" सारखे पुस्तक प्रेफर केले!.. =)) =)) =)) =))
मुळातच या पुस्तकात "सुडाचा प्रवास" दाखवला गेल्याने यामध्ये लेखक- दाजी पणशीकरांना महाभारता'बद्दल काय वाटते..हेच सांगितले गेले आहे. साहजिकच तुम्हीही सात वृत्तींबद्दल या पुस्तकात थोडीफार माहिती मिळाल्यावर त्या व्यतिरिक्त कुठेही काहीही सन्दर्भ न बघता..ती माहिती जशीच्या तश्शी इथे उतरवली! अर्थात तुम्ही अजून इथे सांगितलेलं नाही, की या पुस्तकात मांडलेल्या सात चिरंजीवींच्या सात वृत्तींव्यतिरिक्त तुम्हाला त्यांच्या बद्दल अजून काही माहिती आहे!
"ही माहिती इन्टरनेटवर सापडणार नाही.." असे वारंवार तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश कदाचित तुम्हाला आत्ता कळला असेल. त्याचा गर्भ्रितार्थ असा होता.. की या सप्तचिरंजीवींचे मूळ सन्दर्भ असलेली "पुराणे" जर तुम्ही प्रेफर केली असती.. तर कदाचित त्यांच्याबद्दल सर्वांगीण माहिती तुम्हांस मिळाली असती... आणि वर नमूद केलेल्या त्यांच्या वृत्ती आणि त्याबद्दल तुम्हाला मिळालेली अर्धवट आणि काही अंशी चुकीची माहिती कदाचित तुम्ही टाईप केली नसती!! अॅटलिस्ट सहज उपलब्ध होणारे 'रामायण', 'महाभारत' तरी वाचायला हवे होते.
"जालावर माहिती शोधण्यापेक्षा पुस्तकेही वाचत चला!.." असे डोस मला देण्यापेक्षा कपिलमुनी.. तुम्ही ते स्वतः अमलात आणले असते.. तर बरे झाले असते...कारण प्रतिसादासाठी जवळजवळ १५-२० दिवस मिळून देखील शोधुन शोधून तुम्हाला सूडाच्या प्रवासाचेच पुस्तक मिळाले.. आणि तेही फक्त महाभारताच्या! वास्तविक उल्लेखले गेलेले "चिरन्जीवी" हे काही महाभारताच्या व्यतिरिक्त देखील आहेत.. उदाहरणार्थ- मार्कंडेय ऋषी...नारद मुनी... यांचा किमान उल्लेख देखील तुमच्या प्रतिसादात दिसत नाही.. असो.. बरं इतर सात वृत्तींचे वर्णन करनाही .. प्रत्येकी दोनच शब्द वापरलेलेले आहेत. किमान तिथे तरी जरा विस्तृत माहिती दिली असती..(पक्षी: पणशीकरांच्या पुस्तकातून कॉपी केली असती) तर किमान तुम्ही ते 'सूडाच्या प्रवासाचे' पुस्तक तरी पूर्ण वाचले आहे..असे वाटले असते!!! ;)
कधी कधी माणूस असा अर्धवटज्ञानाने तोंडघशी पडल्यानन्तरही दुसर्याला शहाणपणा शिकवायला जातो.. हे पाहून अम्मळ मौज वाटते!!
असो.. यापुढे किमान सन्दर्भ पुस्तके निवडताना तरी अधिक आणि उचित पर्याय शोधा!... .. अर्थात ही माहिती पण तुम्हाला इन्टरनेटवर सापडणार नाही... त्यामुळे शरद'जींच्या बरोबरच चार अधिक लोकांना भेटा.. जवळच्या लायब्ररींना भेटी द्या...
:) आणि पुन्हा एकदा.....अभ्यास वाढवा... ;) ;) ;) ;)
14 May 2012 - 4:13 pm | मृगनयनी
सप्तचिरन्जीवी:-
(१) अश्वत्थामा ---
कपिलमुनींशी काही अंशी सहमत! "अश्वत्थामा" द्रोणाचार्यांचा एकुलता एक मुलगा. शिवपुराणानुसार "अश्वत्थामा" शन्कराचा अन्श मानला जातो. प्रचन्ड क्रोधी वृत्ती असल्यामुळे यास बर्याचदा अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचा उल्लेख "महाभारत आदिपर्वात" आढळतो. जन्मतःच कपाळावर असलेल्या तेजस्वी मण्यामुळे अश्व्त्थाम्यास अस्त्र, शस्त, रोग, नाग, राक्षस, देव यांच्यापासून अभय प्राप्त झाले होते. द्रोणाचार्यांनी केलेल्या शिवाराधनेनुसार व तपश्चर्येनुसार अश्वत्थाम्यास अमरत्वाचे वरदान मिळाले होते. ब्रह्मास्त्र सोडण्याचे तन्त्र त्यास अवगत होते. पण ते तो परत घेऊ शकत नव्हता. द्रौपदीचा भाऊ द्रुष्टद्युम्न व तिचे पाच पुत्र यांना अश्वत्थाम्याने ठार केले. पण ते अतिशय चुकीच्या पद्धतीने..दिवसातील युद्धाचा ठरलेला कालावधी सम्पल्यानन्तर.. पाच पुत्रांना पान्डव समजून त्याने ठार मारले. अर्जुनावर ब्र्हमास्त्र सोडताना ते परत घेण्याची कला अवगत नसतानाही सम्पूर्ण पृथ्वीचा नाश होऊ शकतो.. हा विचार याने केला नाही. एक ब्राह्मण असूनदेखील त्याने केलेली कृत्ये हीन पद्धतीची होती. ना क्षत्रियवृत्तीला शोभणारी.. ना ब्राह्मणांना शोभणारी... अश्वत्थामा दरिद्री होता.. त्याच्याकडे बुद्धिमत्तेबरोबरच दैवी शक्तीचे वरदान होते.. पण ती शक्ती ही त्याच्या वडिलांच्या तपोबलामुळे लाभली होती. त्यामुळे नवीन साधना करून ती वृद्धिंगत करण्याची वृत्ती अश्वथाम्याकडे नव्हती. तसेच "नरो बा कुन्जरो वा" च्या भ्रमामुळे द्रोणाचार्य मरण पावल्यानन्तर त्यांचे अश्वत्थाम्याशी जोडलेले पुण्यही नष्ट झाले..आपल्या मुलांचे वध केल्यामुळे व्यथित झालेल्या द्रौपदीने अर्जुनास अश्वत्थाम्यास ठार करण्यास सांगितले.. पण "अश्वत्थामा" चिरन्जीवी तसेच शिवाचा अन्श असल्यामुळे अर्जुनाने केवळ अश्वत्थाम्याच्या केसाचे व त्याच्या कपाळावरच्या तेजस्वी मण्याचेही खन्डन केले. त्यामुळे "चिरन्जीवी" असूनही कपाळावरच्या जखमेसाठी "अश्वत्थामा"वर दारोदार तेल मागण्याची वेळ आली. तसेच त्या मण्याच्या नाशामुळे आणि युद्धात अधर्मीपणमुळे त्याच्या हातून घडलेल्या पापांमुळे कोड, महारोग इ. सारख्या अनेक व्याधी अश्वत्थाम्यास चिकटल्या. अनेक वर्षे याच स्थितीत राहण्याचे भोगही त्याला लागले. त्यामुळे एक "चिरंजीवी" असूनही स्वतःच्या अत्यंत वाईट जिणे त्याच्या नशीबी आले. परन्तु अश्वत्थाम्या'सारखे जिणे आपल्या वाट्यास येऊ नये.. यासाठी त्याच्यातल्या शन्कराच्या अन्शाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. त्यामुळे नन्तर पश्चात्ताप पावलेल्या अश्वत्थाम्याला चिरन्जीवी मानून सप्त चिरन्जीवींमध्ये गणले जाते.
14 May 2012 - 4:14 pm | मृगनयनी
(२) बळी --
केवळ "अतिरिक्त दानवृत्ती" इतके वर्णन करून बळीराजाचे वर्णन करताच येत नाही.
वामनपुराणानुसार "बलि-राजा" म्हणजे भगवान विष्णुच्या 'नरसिंह अवतारा'स कारणीभूत ठरलेल्या महान विष्णुभक्त भक्त प्रल्हादाचा नातू. दैत्यकुळाचा वंशज असणार्या बलि-राजाने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी, स्वर्ग यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. स्वर्गलोकाचे सर्व अधिकार त्याने स्वतःकडे घेतले होते. याचकाला विन्मुख न पाठवणे.. त्याने मागितलेले दान त्यास देणे हे बलिराजाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होते. पण स्वतःच्या या दानी वृत्तीचा त्याला अत्यंत अभिमान होता.
किम्बहुना तो केवळ अभिमान नसून अहंकारही होता. सहसा सत्ययुगात असुर दैत्यादि लोक यज्ञ वगैरे करीत नसत. परन्तु बलीराजाने स्वर्गासकट त्रिलोकावर कायमचेच अधिपत्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दैत्यकुलगुरु- शुक्राचार्यांच्या मदतीने अश्वमेध यज्ञ करण्यास सुरु केला. यावेळीही त्यने अतोनात दानधर्म केले. बलीराजाने स्वर्गावर स्वारी करून इन्द्रादि स्वर्गदेवतांना आधीच पदच्युत केले होते. त्यामुळे या अश्वमेध यज्ञामुळे स्वर्ग कायमचाच हातातून जाऊ नये म्हणून इन्द्राने महाविष्णुस प्रार्थना केली. त्यावेळी विष्णुने वामनावतार घेतला. हा स्रर्वांग सुन्दर बटूचा वामन अवतार म्हणजेच विष्णूचा पाचवा अवतार. हा वामनबटू काश्यप आणि अदिती'चा पुत्र असल्याचे काही ठिकाणी मानले जाते. हा वामनबटू जेव्हा बलीच्या यज्ञ ठिकाणी पोचला तेव्हा बलीराजा त्याचे सुन्दर रूप पाहून स्तिमित झाला. व पाहिजे ते दान मागण्याची त्याने बटूस विनन्ती केली. त्या वेळी शुक्राचार्यांनी बलीस तसे न करण्यास सांगितले. कारण शुक्राचार्यांनी महाविष्णुचे रूप ओळखले होते. त्यामुळे महाविष्णु या यज्ञात काहीतरी विघ्न आणून बलीचे त्रिलोकावर राज्य मिळवण्याचे स्वप्न उध्वस्त करेल, याची कुणकुण लागली होती. परन्तु एकदा दिलेला शब्द मागे घेने बलीच्या तत्वात बसणारे नव्हते. त्यामुळे त्याने वामनास दन मागण्याची विनन्ती केली. वामनबटूने बलीकडे फक्त ३ पावले जमीन मागितली. व बलीने ती देण्याचे मान्य केले. वामन बातूने पहिल्या पावलात स्वर्ग व्यापला. दुसर्या पावलात पृथ्वी व्यापली. या दोन्ही पावलातच बलीला महाविष्णुचे रुप समजून चुकले. आपल्या पूर्वजांच्या म्हणजे प्रल्हादाच्या भक्तीला प्रसन्न होऊन खाम्बातून प्रकट झालेला महाविष्णुचाच नरसिंहावतार आठवला. व बलीराजाने वामनबटूस तिसरे पाऊल ठेवण्यासाठी आपले मस्तक पुढे केले. आणि आपण दिलेले वचन पाळले. वामनाने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला खाली पाताळात गाडले. लौकिकदृष्ट्या "पाताळात गाडणे" म्हणजे एखाद्याचा नाश करणे असा जरी अर्थ असला तरी महाविष्णुने बलीचा नाश केलाच नाही. त्याच्यातल्या अहंकाराचा दैत्यवृत्तीचा नाश केला. व त्यास सप्तपाताळांपैकी- एका पाताळाचा म्हणजे- 'सुतल' नावाच्या पाताळाचा अधिपती बनवुन चिरन्जीवी केले. या घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला "बलिप्रतिपदा" सम्बोधले जाते. व दीपप्रज्वलन केले जाते. बलीराजाचे प्रतीकात्मक चित्र काढून त्याची पूजा केली जाते. अश्या प्रकारे महाविष्णुचा आशीर्वाद मिळवून बलीराजा चिरन्जीवी झाला.
14 May 2012 - 4:15 pm | मृगनयनी
(3) महर्षि व्यास / वेदव्यास :-
'सुधन्वा' नावाच्या राजापासून विचित्र पद्धतीने गर्भवती झालेल्या एका माश्याच्या ( जो मासा पूर्वी एक अप्सरा होती.) पोटी एक मानवी कन्या व एक मानवी पुत्र जन्मले. या माश्याला ज्या कोळ्याने पकडले, त्या कोळ्याने मत्स्यपुत्राला सुधन्वा राजाच्या स्वाधेन करून कन्येस अपल्याजवळ ठेवले. हीच कन्या मत्स्यगन्धा/ सत्यवती नावाने ओळखली जात असे. तिच्या शरीरास जरी माश्याचा वास येत असला तरी तिचे सौन्दर्य अलौकिक होते. त्यामुळे पाराशर ऋषींनी तिच्या सहवासाची इच्छा व्यक्त करून तिचे कौमार्य अबाधित ठेवून तीस गर्भवती केले. तसेच तिच्या माश्याच्या गन्धाला दूर करून त्यास सुवासात परिवर्तित केले. तसेच सत्यवतीच्या गर्भात वाढणार्या स्वतःच्या गर्भाला दिव्य शक्ती देऊन पाराशर ऋषी निघून गेले. उचित समय आल्यावर सत्यवतीला पुत्रपाप्ती झाली. व काही वेळातच तो पुत्र मोठा झाला. हा दिव्य पुत्र जन्मतःच वेदांमध्ये पारन्गत होता. त्यामुळे अधिक अभ्यास व तपस्या करण्यासाठी तो पुत्र द्वैपायन नामक द्वीपात निघून गेला. जाताना सत्यवतीला म्हणजे आपल्या आईस त्याने वचन दिले, की जेव्हा गरज पडेल.. तेव्हा तो नक्की येइल. याच पुत्राला "वेदव्यास"असे सम्बोधले जाऊ लागले. याचा वर्ण कृष्ण असून ते द्वैपायनात तपस्येला निघून गेल्यामुळे त्यांना "कृष्ण्द्वैपायन" असेही म्हणतात.
ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असे वेदांचे आणि ऋचांचे विभाजन व्यासांनी आपल्या शिष्यांच्या मदतीने केले. त्यामुळेच त्यांना 'वेदव्यास' असेही म्हणतात. पैल, जेमिनी, वैशंपायन, सुमन्त इ. त्यांचे प्रमुख शिष्य होते. पाचव्या वेदांच्या स्वरुपात त्यांनी अठरा "पुराणां"ची निर्मिती केली. "वेदव्यास" यांच्यामध्ये ब्रह्मा आणि विष्णु या दोघांचेही अंश असल्याचे मानले जाते. त्यामुळे ते चिरन्जीवी असल्याचे मानले जाते.
विचित्रवीर्य, चित्रांगद हे अम्बिका, अम्बालिकेचे पती पुत्र देण्यास असमर्थ असल्याने सत्यवतीने आपल्या पुत्राला -वेदव्यासांना नियोगमार्गाने पुत्र देण्यास विनन्ती केली. त्यानुसार पान्डु, धृतराष्ट्र हे राजकुमार व विदुर या दासीपुत्राचे जन्म झाले. कौरव आनि पान्डव हे वेदयासांचेच वन्शज आहेत. आपल्या दिव्य दृष्टीद्वारे वेदव्यासांना त्रैलोक्याचे, वर्तमान्-भूत-भविष्य या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान होते.
धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरील महायुद्धाचे वर्णन सांगन्यासाठी वेदव्यासांनीच संजयला दिव्य दृष्टी दिली होती. सर्वांत शेवटचे पुराण म्हणून "महाभारत" त्यांनी लिहिले.
कलीयुगातील वाढत जाणारा अत्याचार, भ्रष्टाचार, अल्पायुष्य, अन्धश्रद्धा, धर्मावरील अविश्वास इ. गोष्टी व्यासांना ज्ञात होत्या. व त्याचा उल्लेख भागवत पुराणात आढळतो.
ग्रहपीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी वेदव्यासांनी रचलेले "आदित्यादि नवग्रह स्तोत्र" सुप्रसिद्ध आहे. आजही चिरंजीवी 'वेदव्यास'यांचे अस्तित्व पवित्र यमुना नदीच्या द्वीपात आढळते.
14 May 2012 - 4:16 pm | मृगनयनी
(४) कृपाचार्यः- महाभारत आदिपर्व आणि शल्यपर्वानुसार, गौतम ऋषींचा जो पुत्र- 'शरद्वान' हा बाणासहितच जन्मला. त्यास ब्रह्मधर्मानुसर वेदविद्येमध्ये अजिबात रुची नव्हती. पण तो धनुर्विद्येमध्ये अतिशय पारंगत होता. त्याच्या या प्रावीण्यामुळे स्वर्गाचा राजा इन्द्र देखील भयभीत झाला. व शरद्वानाच्या साधनेत अडथळा निर्माण करण्यासाठी इन्द्राने एका अप्सरेला पाठवले. तिच्यामुळे विचित्र पद्धतीने शरद्वाना'ला एक पुत्र व एक कन्या झाली. ते म्हणजेच "कृपी" आणि "कृप". 'कृप' देखील आपल्या वडिलांप्रमाणेच धनुर्विद्या, शस्त्र-अस्त्र विद्येत पारन्गत होता. त्यामुळे भीष्माने पान्डव-कौरवांना धनुर्विद्य शिकवण्यासाठी "कृप" यांना नियुक्त केले. आणि 'कृप'चे "कृपाचार्य" झाले. कृपाचार्यांची बहीण "कृपा" हिचा विवाह द्रोणाचार्यांशी झाला होता. कृपाचार्यांनी पान्डव-कौरवांना दिलेल्या धनुर्विद्येच्या बेसिक शिक्षणानन्तर द्रोणाचार्यांनी त्यांना पुढील शिक्षण दिले. कृपाचार्य महाभारताच्या १८ दिवसांच्या युद्धात नाईलाजास्तव का होईना.. पण कौरवांच्या बाजूने लढले. मुळात ते अतिशय नीतीमान होते. परन्तु परिस्थितीमुळे व कौरवांच्या उपकारामुळे त्यांना प्रत्येक महत्वाच्या क्षणी मूग गिळून गप्प बसावे लागले. चिरन्जीवी अश्वत्थाम्याच्या पान्डवांचा अधर्मीपणे नाश करण्याच्या हट्टामुळे कृपाचार्य स्वतः चिरंजीवी असूनही शान्त वृत्तीमुळे व कौरवांनी घातलेल्या बन्धनांमुळे त्यास विरोध करू शकले नाही.
अश्वत्थामा व कृपाचार्य दोघेही चिरन्जीवी असले तरी दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. अस्त्र विद्येच्या अर्धवट माहितीमुळे अश्वत्थाम्याने स्वत:चा नाश करून घेतला. अश्वत्थाम्याने पान्डवपुत्रांना ठार मारले. अभिमन्यूची पत्नी -उत्तरेच्या पोटातील गर्भावर शस्त्र चालवून अश्वत्थाम्याने धर्माविरूद्ध वर्तन केले. अर्थात श्रीकृष्णाच्या कृपेने तो गर्भ पुनरुज्जीवीत झाला. तोच पुढे "जनमेजय" राजा म्हणून प्रसिद्धीस पावला. पुढे युद्धानन्तर सर्व संहार झाल्यानन्तर शापामुळे व काढून घेतलेल्या मण्यामुळे अश्वत्थामा बिकट परिस्थितीत जखमेला तेल लावण्यासाठी दारोदार हिन्डत असतो. तर चिरन्जीवी कृपाचार्य नाईलाजामुळे का होईना पण घडलेल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी हिमालयात निघून गेले.
14 May 2012 - 4:17 pm | मृगनयनी
(५) बिभीषण-
कपिलमुनी आपण चिरन्जीवी 'बिभीषणा'चे वैशिष्ट्य सांगताना केवळ "भ्याड वृत्ती" असा जो उल्लेख केला. तो अतिशय हीन आणि हिणकस असून आपल्याला रामायणाबद्दल काडीइतकीदेखील माहिती नाही.. हेच सूचित करणारा आहे.
बिभीषण हा जरी रावणाचा सख्खा भाऊ असला तरी रावण आणि बिभीषणाच्या वृत्तीत जमीन अस्मानाचा फरक होता. अत्यन्त सात्विक आणि न्यायी असलेला बिभीषण प्रत्येक वेळी धर्माला अनुसरून वागलेला आहे. रावणाने सीताहरण केल्यानन्तरही सर्वप्रथम त्याची त्याच्या चुकीबद्दल कानउघडणी करणारा बिभीषणच होता. रावणाचा भाऊ असूनदेखील बिभीषण रावणाला न जुमानता रामभक्तीमध्ये रत असे. लन्केत प्रथम प्रवेश केल्यानन्तर हनुमानाला रावणाच्या राज्यात केवळ एकाच ठिकाणी रामनामाचा जप ऐकू येत होता. ब्राह्मणाचे रूप घेऊन मारुति जेव्हा त्या ठिकाणी गेला, तेव्हा बिभिषणाची व त्याची पहिली भेट झाली. वीर हनुमानाचा अपमान करून रावणने त्याच्या शेपटीस आग लावली तेव्हा मारुतिने केलेल्या लन्कादहनात सम्पूर्ण लन्का जळून गेली. फक्त बिभिषणाचे कुटीर मात्र रामनामामुळे सुरक्षित राहिले.
रामने रावणाशी प्रत्यक्ष युद्ध करण्याच्या आधी त्यास बर्याचवेळा सुधारण्याची सन्धी दिली. हनुमानाला जेव्हा रामाने रावणाशी प्रथमतः बोलणी करण्यासाठी लन्केला पाठवले, तेव्हा दरबारात रावणाने सेवकांना हनुमानाला मारून टाकण्याची आज्ञा केली, तेव्हा "हनुमान हा रामाचा (पक्षी दुसर्या एका राजाचा) दूत म्हणून येथे आलेला आहे, त्याच्याशी असे वर्तन करणे किन्वा त्याला मारून टाकणे हे कोणत्याही राजाला शोभा देत नाही." असे रावणाला भर दरबारात सुनावणारा "बिभीषण"च होता.
लन्कादहनानन्तर रावणाने बिभिषणाचा पदोपदी अपमान करण्यास सुरुवात केली. त्यामुळे माता केकसीच्या सान्गण्यानुसार बिभिषण रामसेनेस येऊन मिळाला. बिभीषणाला रावणाविषयी आणि लन्केविषयी असलेल्या इत्थंभूत माहितीमुळेच रामाला आणि वानरसेनेला लन्केवर स्वारी करणे सोपे झाले. रामाची पर्यायाने सत्याची, न्यायाची साथ देणार्या व रावणाला दुष्कृत्यापासून वारंवार परावृत्त करू पाहणार्या बिभिषणाला कुणी मूर्खच- भ्याड वृत्तीचा, गद्दार वगैरे म्हणू शकतो.
'रावणाचा नाश होण्यासाठी त्याच्या पोटातल्या 'अमृतकूपी'चा नाश होणे गरजेचे आहे' हे गुपित बिभिषणामुळेच रामाला कळले. व रामाला रावणाचा वध करणे शक्य झाले.
रावणवधानन्तर माता सीतेला सुन्दर वस्त्रालंकार भेट देऊन मानाने तिला रामाकडे सुपुर्त करणारा वीर बिभिषणच होता. नंतर माता सीतेने अग्निदिव्य केले (म्हणजेच वेदवतीने कर्मसंकेतानुसार सीतेला रावणाने पळवायच्या आधी मागून घेतलेले सीतेचे रूप परत अग्निला दिले. व अग्निदेवतेत प्रविष्ट असलेल्या मूळ सीतेला परत आणले. व ही मूळ सीता रामाकडे आली. पुढे रामाची/ विष्णुची पत्नी होण्याची कामना ठेवणारी वेदवती पुढील जन्मी पद्मावती म्हणून जन्माला आली व तिरुपती बालाजीची पत्नी झाली.)
त्यानन्तर राम-सीता,लक्ष्मण यांच्यासह अगस्ति ऋषींची भेट घेऊन बिभिषण पुष्पक विमानातून अयोध्येस पोचला. रामाचा राज्याभिषेक झाल्यानन्तर बिभीषणास रामाने लंकेचा अधिकृत राजा म्हणून घोषित करून चिरंजीवी बनवले. व सन्मानाने पुन्हा श्रीलंकेस पाठवले. आजही तिथे बिभिषणाचे अस्तित्व मानले जाते.
14 May 2012 - 4:18 pm | मृगनयनी
(६)परशुराम ;-
"अविवेकी सूडवृत्ती" असे जे वर्णन कपिलमुनीनी परशुरामाचे केले आहे.. ते म्हणजे अविवेकाचा खरोखर कहर आहे!! :|
http://www.misalpav.com/node/21660
14 May 2012 - 4:18 pm | मृगनयनी
(७)हनुमानः- मारूतिचे वर्णन करणे म्हणजे ब्रह्मंडाचे वर्णन करण्यासारखे आहे.
पूर्वजन्मीची इन्द्रलोकीची अप्सरा असलेली अन्जनी वानरयोनीत जन्मल्यावर सुमेरू पर्वतराजीचे वानरराज केसरीशी विवाहबद्ध झाली. तिची शंकरावर निस्सीम भक्ती होती. दिवसरात्र ती शिवाराधनेत निमग्न असे. तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन शन्करांनी तिला आशीर्वाद दिला, की "तिच्या पोटी शन्कराचा अंश जन्माला येईल. जो चिरन्जीवी आणि अकरावा महारुद्र असेल. काही दिवसांनी एक पायसरूपी यज्ञप्रसाद जो अन्जनीच्या हातात आकाशातून पडेल.. तो तिने भक्षण करावा."
अयोध्येस दरशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाद्वारे मिळालेला 'पायसा'चा प्रसाद प्रथम आपल्याला न देता कौसल्येला का दिला म्हणून राणी कैकेयी पायस तसंच हातात ठेवून रुसून बसली. त्यावर ईश्वरी सन्केतानुसार एक घार तिथे आली व तिने कैकेयीच्या हातातला प्रसाद हरण केला. आणि ती दक्षिण दिशेला उडाली. तिथे तो पायसरुपी प्रसाद तिच्या चोचीतून पडला व खाली प्रार्थना करत असलेल्या अन्जनीमातेच्या हाती पडला. तिने तो श्रद्धापूर्वक सेवन केला. व नवमासांती चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्य उगवत असताना शन्कराचा अन्श- मारुति जन्माला आला.
त्यामुळे त्या यज्ञप्रसादाच्या तीन भागांपैकी एक आख्खा भाग अन्जनीस मिळाला. तर कैकेयीला सुमित्रा व कौसल्येने आपल्या पायसातला थोडा थोडा भाग काढून दिल्यामुळे त्याचे विभाजन झाले. त्यामुळे हनुमानाकडे रामापेक्षा जास्त शक्ती होती, सामर्थ्य होते. तसेच मारुति जन्मतःच "जितेन्दिय" असल्यामुळे त्याला जन्मतःच सोन्याची लन्गोटी होती. सूर्य, ब्रह्मा, विष्णु, देवी, वायुदेव, शिवपार्वती या सर्वांनी विविध शक्ती मारुति'स प्रदान केल्या होत्या. या गुरुंनी सांगितलेल्या "जो कुणी तुझी लन्गोटी ओळखेल.. तोच तुझा स्वामी असेल." या वचनानुसार रामाने सीताशोधाच्या वेळी झाडावर बसलेल्या हनुमानाला पाहून लक्ष्मणाला सुवर्ण लन्गोटी'बद्दल सांगितले. तेव्हा मारुतिने त्या क्षणापासून रामाचे दास्यत्व पत्करले. 'राम' हा महाविष्णुचा सातवा अवतार होता.. तर हनुमान अकरावा रुद्र म्हणजेच शन्कराचा अन्श होता. रामाशिवाय अनुमानाचे आयुष्य अपूर्ण होते. तर हनुमानाशिवाय रामाचे जीवन अपूर्ण होते.
सीतेला शोधण्यासाठी, तिच्यापर्यन्त रामाचा निरोप पोचवण्यासाठी, रामाचा दूत म्हणून रावणाकडे जाण्यासाठी हनुमान एकताच समर्थ होता. अहि-महिरावणाच्या कैदेतून केवळ हनुमानामुळेच राम-लक्ष्मण सुखरूप बाहेर पडले. द्रोणागिरी उचलून आणून लक्ष्मणाला संजीवनी औषधी देऊन त्याचे प्राण वाचवणे .. फक्त मारुतिच करू शकला.
एका क्षणात कित्येक योजने पार करून जाण्याची शक्ती फक्त हनुमानाकडेच आहे. 'ब्रह्मांडा भोवती वेढे वज्रपुच्छे करू शके" हे अजिबात खोटे नाही.
त्रेतायुगात राम वनवासानन्तर पुनः अयोध्येला आल्यानन्तरही मारूतिने त्याच्या चरणापाशीच राहणे पसन्त केले. रामावतार सम्पताना पुनः द्वापारयुगात एकदा हनुमाना रामरूपात भेटण्यायाचे वचनही महाविष्णुंनी पूर्ण केले. तसेच महाभारतातील १८ दिवस कुरुक्षेत्री चाललेल्या महायुद्धात श्रीकृष्णाने (मागच्या जन्मीच्या श्रीरामाने) हनुमानाला पान्डवांच्या ध्वजावर स्थान दिले.
शिवाजींचे गुरु- समर्थ रामदास स्वामी हे लहानपणापासूनच प्रभू रामचन्दांचे व मारुतिचे नि:सीम भक्त होते. त्यांना कलीयुगात काही ४०० वर्षांपूर्वी साक्षात मारुतिने सगुणरूपात दर्शन दिले होते. रामदासांनी लिहिलेले "सन्कटनिरसनम् मारुति स्तोत्र- (भीमरुपी महारुद्रा)" अत्यन्त प्रभावशाली आहे. मारुतिरायाचे अगदी तन्तोतन्त वर्णन आणि स्तवन या स्तोत्रात आहे.
सोळाव्या-सतराव्या शतकातल्या 'तुलसीदास' यांना देखील हनुमानाने दर्शन दिले होते. त्यांनी लिहिलेले "हनुमान-चालिसा" नियमित वाचणार्या बर्याच जणांना सन्क्टात असतानादेखील स्वतःभोवती एक सुरक्षा कवच असल्याचे जाणवते. रामभक्त हनुमानाचे अस्तित्व आजही भक्तांना जाणवते.
*~*~*~*~*~*~*
नवरात्र, गणेशपूजन, वास्तुशान्ती इ. मन्गलप्रसन्गी सप्तचिरंजीवींना आवाहन केले जाते व त्यांची पूजा केली जाते. हिन्दु धर्मानुसार एखाद्याचा वाढदिवस हा तिथीनुसार साजरा केला जातो. त्यावेळी सप्तचिरन्जीवींची आठवण काढून श्लोक म्हटला जातो. व वाढदिवस असणार्याला "चिरन्जीवी भव" असा आशीर्वाद दिला जातो. लग्नपत्रिका छापतानादेखील मुलाच्या नावामागे "चिरन्जीव" व मुलीच्या नावाआधी "चिरन्जीव सौभाग्यकंक्षिणी" असे लिहिले जाते. ज्यांना कधीही मरण नाही अश्यांनाच "चिरंजीवी" असे म्हटले जाते.
14 May 2012 - 9:10 pm | शिल्पा ब
<<<कधी कधी माणूस असा अर्धवटज्ञानाने तोंडघशी पडल्यानन्तरही दुसर्याला शहाणपणा शिकवायला जातो.. हे पाहून अम्मळ मौज वाटते!!
अगदी हेच म्हणणार होते. आपल्यासारख्या सुसंस्कृत अन धार्मिक लोकांची देशाला खुप गरज आहे हेसुद्धा नमुद करु इच्छिते.
14 May 2012 - 9:56 pm | मृगनयनी
अगदी हेच म्हणणार होते. आपल्यासारख्या सुसंस्कृत अन धार्मिक लोकांची देशाला खुप गरज आहे हेसुद्धा नमुद करु इच्छिते.
अं... हो का?.. बरं बर्रं... :) बाकी देशाचा विचार करण्यार्या आपल्यासारख्या लोकांकडून टंकलेले संस्कृती, धर्म वगैरे शब्द पाहिले, की आमची अम्मळ करमणूक होते. :)
अवांतर : (भाड्याच्या) उन्टावर बसून दुसर्यांच्या शेळ्या हाकणारे पाहिले, की आम्हाला परदेशातल्या बेरोजगारीचीही कल्पना येते! (आणि कधी कधी कीवपण!!) ;) ;) ;) ;)
अतिअवांतर :- (देशाला खूप गरज असलेल्या) आम्हाला आपण धार्मिक वगैरे म्हटलंच आहे, म्हणून विचारते, "उपासना कशी चाललीये?" ;) ;) संस्कृत उच्चारताना काही अडचण येत असेल.. जरूर विचारा....कारण आमच्या संस्कृतीत "संस्कृत"ला फार महत्व आहे! :)
14 May 2012 - 10:39 pm | शिल्पा ब
आपल्या गुरुंनी (जेवढे असतील तेवढ्या) आपल्यावर केलेले संस्कार असे दाखवत राहील्याने आम्हालाही गुरु करावे असे वाटु लागले आहे. पण नकोच...तो मान आपल्याकडेच शोभुन दिसतो. धन्यवाद.
14 May 2012 - 10:55 pm | मृगनयनी
ह्म्म... तुमची उद्विग्नता मी समजू शकते.. शिल्पा ब ... ;)
15 May 2012 - 12:15 am | शिल्पा ब
चला!! काहीतरी का होईना समजलं हे काय कमी..
15 May 2012 - 11:17 am | मृगनयनी
:) .. ह्म्म.. म्हणजे तुम्ही खरोखर खूप उद्विग्न आहात तर्र!! :)
असू दे असू दे.. डिप्रेशन'मुळे होतं असं कधी कधी!!! ;)
...सांगितलेल्या उपासनेत खन्ड पडू देऊ नका.. म्हणजे उद्विग्नता कमी होईल! :) :) :)
बाकी उन्ट,शेळ्या वगैरे व्यवस्थित आहेत ना! ;) ;) .. भाड्याची असली, तरी मुकी जनावरंच हो ती.. काळजी घ्या हं त्यांची .. उगीच तुमच्या उद्विग्नतेमुळे त्यांना काही झालं.. तर मालक रोजगार बन्द करेल हं! ......
आधीच्च परदेशातल्या बेरोजगारीमुळे आपल्या देशात (पक्षी: आमच्यासारख्यांची गरज असलेल्या देशात) परत आलेल्यांची संख्या काही कमी नाहीये! .. बाकी उपासना नियमित चालू ठेवा.. म्हणजे सगळं व्यवस्थित होईल! :)
12 Apr 2012 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार
माझ्या ज्ञानाप्रमाणे ह्या मागे दोन कारणे होती.
१) आजवर एकसंध राहिलेल्या पांडवांच्यात केवळ द्रौपदीमु़ळे फुट पडण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात येताच कृष्णाने पुढाकार घेऊन कुंती व द्रुपदाशी चर्चा करुन तिचे ५ विवाह घडवून आणले.
२) गतजन्मात घोर तपश्चर्या करून द्रौपदीने ५ गुणांनी युक्त अशा पतीची कामना शंकराकडे* व्यक्त केली. त्यावेळी शंकराने तिला पुढील जन्मी तुला ह्या प्रत्येक गुणात श्रेष्ठ अशा एकेक पतीची प्राप्ती होईल असा आशिर्वाद दिला.
*शंकरच तो देव होता असे आत्ता आठवते आहे, कदाचित ब्रह्मदेव असण्याची देखील शक्यता आहे.
जाता जाता :-
हा परिच्छेद वाचता वाचता किती गृहस्थ मिपाकरांचे डोळे पाणावतील नै ?
13 Apr 2012 - 11:02 am | शरद
१) व २) यांना महाभारतात आधार नाही.
शरद
13 Apr 2012 - 11:06 am | मृत्युन्जय
दुसर्याला नक्की आहे आणि कृष्णाच्या जागी कुंती असे वाचले तर १ ला पण आहे.
13 Apr 2012 - 11:16 am | प्रचेतस
२) ला महाभारतात आधार आहे. आदीपर्वातल्या वैवाहिकपर्वात याचा उल्लेख येतो.
ऋषिकन्या शंकराला तपाच्या योगे प्रसन्न करते. शंकराकडून वर घेतांना मला पुढच्या जन्मी गुणसंपन्न पती दे असे पाच वेळा म्हणते. शंकर पाच पती मिळण्याचा आशिर्वाद देतो. कन्या म्हणते की मला पाच पती नकोत. एकच हवाय. मग शंकर म्हणतो की आता माझ्या मुखातून वर निघून गेला असल्याने तू आता पाच महाबलवान पतींची पत्नी होशील.
13 Apr 2012 - 11:22 am | मृत्युन्जय
महाभारतातच अजुन एक पाच इंद्रांची आणि शचिची कथा आहे ती सुद्धा याच कथेला जोड देते. ते पाच इंद्र म्हणजे पाच पांडव. :)
13 Apr 2012 - 11:31 am | प्रचेतस
होय.
त्या पाच इंद्रांना शंकराने पर्वताच्या घळीत डांबले होते आणि नंतर त्यांच्यासाठी शचिची निर्मिती केली होती.
14 Apr 2012 - 8:13 am | शरद
आली का पंचायत ?
खरे म्हणजे चुक माझीच आहे." याला महाभारतात आधार नाही " असा उद्धटपणा करावयाचे कारण नव्हते. क्षमस्व. आता थोडेसे स्पष्टीकरण. मी लिहलेले चुक नव्हे, लिहले हे चुक. माझ्याकडे चिपळुणकर आणि मंडळीने भाषांतरित केलेले महाभारत आहे. इतरही भाषांतरे व प्रति मिळतात..प्रत्येकात काहीकाही फरक असतो. उदा. कलकत्ता प्रत व हे भाषांतर यात बरेच फरक आहेत. असो. वरील मराठी भाषांतर काय म्हणते ?
(१) अध्याय १९१, पान ३८५.यात कोठेही कृष्ण, कुंती व द्रुपद यांचेबरोबर लग्नाची चर्चा करत नाही.तेथे द्रुपद हजरच नाही. पुढे चर्चा आहे ती व्यास व द्रुपद यांच्यामधील आहे. (अ.१९६, पा.३९३.)
(२) ही कथा व्यास द्रुपदाला सांगत आहेत. पा.३९७. यात पाच गुण वगैरे काही नाही. इति अलम् .
लेखमाला सुरू करतांना एकच उद्देश होता. सर्वसाधारण वाचकाला थोडी माहिती करून देणे. मा.परा, मृत्यंजय, वल्ली, मृगनयनी इत्यादि बहुश्रुत, अभ्यासू सभासदांना यात नवीन काय मिळणार ? त्यांना एकच विनंती , माझ्या लिखाणात काही उणिवा, चुका आढळल्या तर अवष्य नजरेत आणाव्यात. (व प्रतिसादात काही महाभारताबाहेरचे आले तर तेही नमुद करावे.)
शरद
14 Apr 2012 - 10:42 am | मृत्युन्जय
तुम्ही लिहा हो. आम्हाला आवडते आहे. उणिवा दाखवुन देण्याच्या उद्देशाने प्रतिक्रिया देतच नाही आहे कारण महाभरात म्हतल्यावर एका लेखात फक्त गोषवाराच येउ शकतो कितीही लिहिले तरी संपुर्ण महाभारतात जागोजागी असलेली एखादी व्यक्तिरेखा एका लेखात थोडीच बसणार आहे? त्यामुळे आपण आपला सारांश लिहायचा. आमचे प्रतिसाद केवल चर्चा घडवुन आणण्यापुरते. आपण उत्तमच लिहित आहात. माहितीपुर्ण देखील आहे.
14 Apr 2012 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार
हेच आणि हेच बोलतो.
आमचे प्रतिसाद केवल चर्चा घडवुन आणण्यापुरते.
12 Apr 2012 - 10:56 am | मुक्त विहारि
(लेख लांबला, मान्य. पुढील भीष्मांच्या लेखात काळजी घेईन.)
हे असे करु नका....अजुन लिहा....
12 Apr 2012 - 11:28 am | मदनबाण
वा... वाचतोय. :)
ती म्हणते " माझा मुलगा अतिविंध्य याला लोकांनी दासपुत्र म्हणू नये.
या बद्धल मला काहीही माहित नाही ! कॄपया यावर अधिक माहिती दिल्यास आवडेल...
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतो आहे. :)
12 Apr 2012 - 11:36 am | स्पंदना
बरीच माहिती मिळाली, पण एक जयद्रथाने तिला पळवण्याचा भाग मी खरच कधी वाचला नाही. हे जरा नविन .
बाकि द्रौपदीची वेश्या म्हणुन बर्याचदा हेटाळणी झालेली दिसते महाभारतात. त्यालाच निगडीत अशी एक कहाणी.
हस्तिनापुरच्या महालात रोज सकाळी द्रौपदी अन दुर्योधन पत्नि भानुमती तुळशीला पाणी घालताना भेटत, अन रोज भानुमती द्रौपदीला "काल कोण होता? " अस खोचुन विचारत असे.
या विषयीची तक्रार तीने कृष्णाकडे केल्यावर कृष्णाने दुसर्या दिवशी हाच प्रश्न भानुमतीला फिरुन विचार असे सांगितले.
द्रौपदीने अस म्हणायचा अवकाश भानुमती गर्रकन वळुन निघुन गेली , पण जाताना तिच्या हातातला गडु खाली पडला . तो उचलायची फिकिर ही न करता धावत जाणारी भानुमती पाहुन द्रौपदीला आश्चर्य वाटले. तिने कृष्णा कडे खुलासा मागितल्यावर कृष्णाने सांगितलेली कथा अशी की, दुर्योधनाचे आपल्यावरिल प्रेम जरासुद्धा कमी होउ नये म्हणुन भानुमतीने एक वशिकरण तेल बनवुन घेतले होते. रोज रात्री ती त्या तेलाने दुर्योधनाच्या डोक्याला मालीश करत असे. एक दिवस तेल हाताच्या ओंजळीत ओतुन घेत असताना त्यातल थोड चुकुन खाली जमिनीवर पडल, स्त्री स्वभावा नुसार भानुमतीने ते बोटांनी निरपुन घेतल. पण या प्रकारात झाल काय की तिच्या या कृतीने शेषाच्या शीरी तीच्या हातुन मसाज झाल्या सारख होउन , शेष तिच्या आसक्तीने प्रकट झाला. भानुमतीला त्याची वासना पुरवावी लागली.
एकूण पंचकन्यांच्या राशिला बराच त्रास होता अस दिसतय, अन तो ही पुरुषांकडुनच.
12 Apr 2012 - 2:58 pm | मृगनयनी
सहमत .. टू अपेक्षा-अक्षय!..
मला माहित असलेल्या स्टोरीत 'काल कुणाची पाळी होती?'..हा प्रश्न दुर्योधन द्रौपदीस विचारीत असे.. मग पुढे शेषाकडून बायकोचा विनयभन्ग + अजून काही झाल्यावरही दुर्योधनाने पुन्हा दुसर्या दिवशी द्रौपदीस तोच प्रश्न विचारला, तेव्हा पान्चाली म्हणाले, की "काल ना.. शेषाची पाळी होती.." =)) =)) =)) ;)
द्रौपदी अग्निकन्या होती... अर्थात ती अयोनिज होती.
द्रौपदी आधी "स्वर्गलक्ष्मी" होती. (स्वर्ग लक्ष्मी- लक्ष्मीमातेचे एक सुन्दर रूप). एका गाईच्या मागे पाच बैल धावत असताना "स्वर्गलक्ष्मी" चेष्टेने हसली होती... तेव्हा त्या गोमातेने स्वर्गलक्ष्मीस शाप दिला, की " तूही पाच जणांची होशील..आणि तुलाही सारे चेष्टेने हसतील...."
अर्थात द्रौपदी स्वतः स्वर्गलक्ष्मी असल्याने ती कुण्या ऐर्या गैर्या पाच जणांबरोबर सम्बन्ध ठेवणे शक्यच नव्हते. आणि पान्डव देखील ईश्वरी शक्तीचेच प्रकट रूप होते... धर्मराज युधिष्ठिराचे वडील- यमधर्म, भीमाचे वडील- वायुदेव, अर्जुन- इन्द्राचा अन्श होता... तर नकुल-सहदेव हे अश्विनीकुमारांचे अन्श होते. त्यामुळेच स्वर्गलक्ष्मीच्या द्रौपदीच्या रुपासाठी हे पाण्डव अत्यंत योग्य होते.
त्यामुळे आण्लेली भिक्षा पाच जणांत वाटून घ्या" हे कुन्तीमातेचे शब्द ही दैवी योजनाच होती...कुन्तीला असलेली वाचासिद्धी'देखील द्रौपदीला पाच जणांची होण्यास कारणीभूत ठरली...
स्वयंवरात अर्जुनाने माश्याचा डोळा फोडला असल्यामुळे द्रौपदीने त्यास मनापासून वरले होते. पण घरी गेल्यावर कुन्तीच्या आज्ञेनुसार तिला पाच जणांमध्ये स्वतःस वाटून घ्यावे लागले. याचा अर्थ ती एकाच वेळेस पाच जणांची बायको होती, असे नव्हे.
वर्षातील साधारण अडीच महिने प्रत्येकाला वाटून दिले गेले होते. त्या अडीच महिन्यांत ती त्या नवर्याशी एकनिष्ठ असायची. आणि बाकी नवरे त्यांची वेळ यीएपर्यंत तिला हात देखील लावत नसत व मातेप्रमाणे व्यवहार करीत असत.
एकाबरोबरचे अडीच महिने सम्पले की ती स्वतःला "अग्निकुंडा"मध्ये शुद्ध करून घेत असे. व दुसर्या नवर्याशी तितक्याच एकनिष्ठेने पत्नीधर्म निभावत असे. या पाच पांडवांव्यतिरिक्त तिच्या मनात इतर कुणाचाही विचार कधीच्च शिवला नाही.
एकदाच काय ते तिला वाटले होते, की ""या पाच पांडवांप्रमाणे जर "कर्ण" ही घोषित सर्वमान्य पान्डुपुत्र असता, तर कदाचित मी त्याचीही पत्नी झाले असते..."" पण तिच्या भावाने= भगवान कृष्णाने तिच्या मनात आलेला हा विचार पुढे वाढू नये आणि पुन्हा तिच्या मनी असे विचार येऊ नयेत.... यासाठी खूप छान आयडीया करून तो विचार समूळ नष्ट केला... "स्व. विठ्ठल उमप" यांचे प्रसिद्ध जाम्भूळ आख्यान हे याच स्टोरीशी रिलेटेड आहे.
अश्या प्रकारे दौपदी ही मनाने आणि शरीराने दोन्हींनी आपल्या पतींशी एकनिष्ठ होती.
त्यामुळेच पान्चाली- द्रौपदी या स्वर्गलक्ष्मी अग्निकन्येला महान पतिव्रतांमध्ये गणले जाते. :)
12 Apr 2012 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यवाद अपर्णा अक्षय.
ही कथा पहिल्यांदाच ऐकली. अशीच एक कथा द्रौपदीच्या बलात्काराबद्दल आहे, ज्यात चक्क चक्क रोज वासुकी नागाकडून होणार्या बलात्कारापासून कर्ण तिचे रक्षण करतो असे आहे. भिल्ल महाभारता मधे ही कथा वाचता येईल.
लिंक :-
http://www.boloji.com/index.cfm?md=Content&sd=Articles&ArticleID=1194
12 Apr 2012 - 5:48 pm | स्वाती दिनेश
ही तर एकदमच वेगळी गोष्ट.. प्रथमच वाचली परा..
स्वाती
13 Apr 2012 - 11:04 am | शरद
या कथेला महाभारतात आधार नाही.
शरद
12 Apr 2012 - 2:22 pm | स्वाती दिनेश
लेख अजिबात लांबला नाही असे सर्वांप्रमाणेच वाटत आहे,
लेख खूप आवडला.
स्वाती
12 Apr 2012 - 3:33 pm | कपिलमुनी
स्वर्गा रोहण करताना द्रौपदी पडली (मेली) तेव्हा युधिष्ठीर म्हणतो , हीचे सर्वात जास्त प्रेम अर्जुना वर होते म्हणून ही सदेह स्वर्गात येउ शकत नाही ...
असेच भीम अर्जुन आणि इतर भावंडांच्या बाबतीत होते ...
अशी एक कथा आहे !!
अवांतर : पाचजणांशी प्रामाणिक राहणे याला 'एक'निष्ठ कसे म्हणायचे ?? शब्द्च्छल होतोय
30 Apr 2012 - 3:53 pm | गवि
एकनिष्ठ ऐवजी एकेकनिष्ठ म्हणता येईल..
12 Apr 2012 - 5:22 pm | स्वातीविशु
लेख अजिबात लांबला नाही. थोडा वाढला तरी चालेल. :)
पु. भा. प्र.
12 Apr 2012 - 6:08 pm | निनाद मुक्काम प...
बरीच नवी माहिती अलीकडच्या काळात महाभारताबद्दल मिपावर मिळत आहे.
पांचाली वर पूर्वी सहारा टीवी वर एक मालिका लागायची.
हि प्रमुख भूमिका मृणाल कुलकर्णी मोठ्या तडफेने साकारायची. पण अचानक ती मालिका बंद पडली.
आज ह्या लेखामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
महाभारत ह्या मालिकेची लोकप्रियता कळसाला पोहोचली होती. हे तर सर्वश्रुत आहे. पण त्यातील पात्रे सुद्धा आपल्या भूमिकेत पूर्णतः एकरूप झाली होती.
शाळेत अनेक वर्ष चिमण्या पाखरांसारखे बागडल्या वर शेवटच्या दिवशी सेंड ऑफ ला जी काही अवस्था विद्यार्थ्यांची होते. तीच अवस्था महाभारतील सर्व पात्रांची झाली
http://www.youtube.com/watch?v=1hDS1PhKn7A
12 Apr 2012 - 8:25 pm | प्रचेतस
उत्तम व्यक्तिचित्रण.
लेख लांबल्यासारखा अजिबात वाटत नाही. अजूनही काही यायला हवे होते. अर्थात ह्या विषयावर जितके लिहावे तितके कमीच.
12 Apr 2012 - 9:39 pm | पैसा
द्रौपदी म्हणजे धगधगती अग्निशिखा. म्हणून तिला अग्नितून जन्माला आलेली असं म्हटलं असावं. ही कृष्णा शेवटची पडली तेव्हा धर्मराजाने तिच्या अर्जुनावर जास्त प्रमाणात असलेल्या प्रेमाचा उल्लेख करावा, आणि त्याच अर्जुनाने आयुष्यभरात आणखी खूप स्त्रियांशी प्रेमविवाह करावेत हेही तिचं दुर्दैवच.
12 Apr 2012 - 10:48 pm | मृगनयनी
सहमत पैसा ताई..... :)
द्रौपदीचे खरे प्रेम (लोवे अत फिर्स्त सिघ्त) अर्जुनावरच होते.. ;) पण अर्जुन पडला.. इन्द्रदेवाचा अन्श!!! तो इन्द्रदेव ज्याने अत्यन्त हीन आणि हिणकस पद्धतीने अहिल्येस बाटवले... :(
पण अर्जुनाच्या बरोबर श्रीकृष्ण असल्याने त्याची सदसदविवेक बुद्धी बर्यापैकी जागृत होती.
एकदा अर्जुना'वर अप्सरा- उर्वशी अत्यन्त लुब्ध झाली होती..आणि तिने अर्जुनाबरोबर फ्लर्टिंग करायलाही सुरुवात केली होती.. पण अर्जुनाने काही कारणास्तव तिस मातेसमान मानले.. व तो तिच्या पाया पडला.. ""अर्जुनाने आपल्याला धिक्कारले"याचा उर्वशीला खूप राग आला.. तेव्हा तिने अर्जुनास "एक वर्ष नपुंसक" होण्याचा शाप दिला.. अर्थात तो अर्जुनाच्या पथ्यावरच पडला..
या नपुंसकत्वाच्याच काळात पान्डव वेष बदलून विराट-राजाच्या आश्रयास आलेले होते. तेथेच अर्जुन "बृहन्नडा" रुपात राहिला होता.. व आपल्या होणार्या सुनेला (अभिमन्युच्या बायकोला) - उत्तरे'ला नृत्य कला शिकवली होती. येथेच द्रौपदीच्या(सैरंध्रीच्या) रक्षणासाठी भीमाने (बल्लवाचर्याने) याच राजाच्या मेव्हण्याचा- कीचकाचा वधही केला होता..
असो...
अर्जुनाने सुभद्रेबरोबर लग्न करावे, ही श्रीकृष्णाची इच्छा असल्याने त्यास दुर्योधन, बलराम कुणीच अडवू शकले नाही. पाताळलोकात चित्रांगदा तर नागलोकात "उलूपी" यांच्याशीही अर्जुनाने विविध कारणांसाठी लग्न केले..
तसेही द्रौपदीव्यतिरिक्त प्रत्येक पांडवाला १-२ बायका होत्याच...
धर्मराजा- देविका
भीम- पद्मिनी / जलन्धरा, हिडिम्बा
अर्जुन- उलुपी, चित्रांगदा, सुभद्रा
नकुल- करेनुमती
सहदेव- विजया
म्हणजे म्हटलं तर द्रौपदी सगळ्यांचीच होती.. किन्वा म्हटलं तर ती फक्त स्वतःचीच - एक लवलवती शलाका होती ती महाभारताला कारणीभूत ठरलेली तेजस्वी अग्निशिखा होती.
हॅट्स ऑफ फॉर हर!!! :)
13 Apr 2012 - 11:17 am | शरद
कीचक विराटाच्या दरबारात (सूत व) सेनापति होता. उर्वशीबद्दल अर्जुनावरील लेखात जस्त माहिती देणार आहे.
शरद
13 Apr 2012 - 11:49 am | मृगनयनी
कीचक हा विराट'राजाच्या पदरी सेनापती असला, तरी तो त्याचा मेव्हणादेखील होता. विराट राजाची पत्नी- "सुदेष्णा" हिचा कीचक भाऊ होता. (याचा उल्लेख - ओरिजिनल महाभारत तसेच इतर कादम्बर्यांमध्येही आढळातो. - याज्ञसेनी, महासती द्रौपदी, पांचाली, इ... )
पांडव अज्ञातवासात असताना स्वतःची ओळख कोणास सांगू शकत नव्हते. तेव्हा द्रौपदी "सैरन्ध्री" या नावाने सुदेष्णेची दासी बनून राहिली होती. ती एकदा सुदेष्णेची सेवा करीत असता तिथे सुदेष्णेस भेटायला तिचा भाऊ- "कीचक" आला व सैरन्ध्रीस पाहताच तो तिच्या सौन्दर्यावर लुब्ध झाला..
एक्दा दोनदा त्याने सैरन्ध्रीवर बळाजबरी करण्याचा प्रयत्नही केला.. पण सैरन्ध्री / द्रौपदीने भीमास याची कल्पना देऊन भीमाकरवी कीचकाचा वध करविला.
पुढे एक वर्ष सम्पल्यावर सर्व पांडवांनी आपली खरी ओळख विराट राजास दिली.. आणि त्याची मुलगी "उत्तरा" हिचे अभिमन्यूबरोबर लग्न लाऊन दिले.
14 Apr 2012 - 4:46 pm | अप्पा जोगळेकर
बरीच नविन माहीती वाचायला मिळाली.
अयोनिज बद्दल एका पुस्तकात एक विचित्रच माहिती वाचली आहे.
त्या माहितीनुसार अयोनिज अपत्ये अनौरस असावीत असा अर्थ होईल. पण औरस आणि अनौरस याचे अर्थदेखील काळाप्रमाणे बदलतात हे खरेच.
एकूणच पांडवांचे द्रौपदी बरोबरचे वर्तन पाहता ती पांडवांनी 'ठेवलेली बाई' होती असे वाटते.
15 Apr 2012 - 5:38 pm | मन१
शेवटच्या वाक्याबद्दल व शेवटून तिसर्या वाक्याबद्दल एकच प्रतिक्रिया..
बोंबला...
15 Apr 2012 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लेख आणि प्रतिसादातूनही बरीच माहिती मिळाली. धन्स.
-दिलीप बिरुटे
9 Mar 2013 - 7:17 am | मन१
नुकताच होउन गेलेला आंतरराष्ट्रिय महिलादिन व हा धागा; महाभारतकालीन समाज, महिलांविषायक समज.....
11 Mar 2013 - 5:51 am | श्रीनिवास टिळक
२००८ साली Dian Sastrowardoyo यांनी Drupadi या नावाने bahasa indonesia या त्यांच्या भाषेत एक चित्रपट प्रदर्शित केला. द्रौपदीची भूमिका,निर्मिती, आणि दिग्दर्शन पण त्यांचेच आहे तू नळीवर सहा मिनिटांची चित्रफीत उपलब्ध आहे ती अवश्य पहावी. दुवा खालीलप्रमाणे आहे. www.youtube.com/watch?v=FhazkwJzxQU
11 Mar 2013 - 11:57 pm | विनोद१८
शरदराव धन्यवाद एका उत्तम व्यक्तिचित्रणाबद्दल... तसेच काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रियानबद्दल सम्बधित मिपाकरान्चे...!!!!
असेच लिहत रहा.
विनोद१८