एक भावनुवाद......

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
13 Jun 2008 - 4:34 pm

एका सुप्रसिध्द हिन्दी गाण्याचा हा स्वैर भावानुवाद- एक प्रयत्न.
गाण कुठलं लिहित नाही, ओळखाल ही अपेक्षा.

जीवनाच्या सोबतीने टाकतो मी पावले
चिन्ता नसे की काय येथे, कमविले वा गमविले.....

बाजार येथे वेदनांचा मांडणे होते फुका
दु:ख घेवोनी शिरी मग, सोहळे मी मांडले...

जे मिळाले, तेच माझे , मानुनी स्वीकारले
विसरुनी गेलो पुढे मी वाटेवरी जे हरवले...

दु:ख आणिक सुख अता, मज वेगळे ना राहिले
आल्या क्षणाला माझे म्हणुनी , मी उराशी घेतले....

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

मनिष's picture

13 Jun 2008 - 4:54 pm | मनिष

छान जमलाय भावानुवाद!

आनंदयात्री's picture

13 Jun 2008 - 6:31 pm | आनंदयात्री

सुंदर भावानुवाद फुलवा !

मदनबाण's picture

13 Jun 2008 - 11:19 pm | मदनबाण

दु:ख आणिक सुख अता, मज वेगळे ना राहिले
आल्या क्षणाला माझे म्हणुनी , मी उराशी घेतले....
हे फार आवडल.....

मदनबाण.....

विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 1:14 am | विसोबा खेचर

फुलवासाहेब,

काव्य म्हणून छान आहे त्यामुळे प्रथम त्याला दाद देतो,

परंतु रफीसाहेबांचं मूळ हिंदी गाणं इतकं सुरेख आहे आणि वर्षानुवर्ष कानात इतक छान रुंजी घालतंय की आज त्याचा मराठी अनुवाद वाचून काहितरीच वाटलं!

छ्या..! मूळ गाण्याची सगळी गंमतच घालवली या मराठी काव्याने!

असो, प्रामाणिक मत. राग नसावा...

तात्या.

पद्मश्री चित्रे's picture

14 Jun 2008 - 6:46 am | पद्मश्री चित्रे

>>मूळ गाण्याची सगळी गंमतच घालवली या मराठी काव्याने!
तस झाल असेल तर माफ करा..
पण मुळ गाण अजरामर आहे ,माझ्या ही मनात . ही त्या गाण्याशी स्पर्धा नाही.. अशी हजारो गाणी ओवाळुन टाकावीत अस ते गाणं आहे.
असो,धन्यवाद.

फुलवा..
(मी "साहेब" नाही)

फटू's picture

15 Jun 2008 - 9:01 am | फटू

बघ, तात्याही फसले...

बाकी भावानुवाद छान केला आहेस...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मुक्तसुनीत's picture

14 Jun 2008 - 8:25 am | मुक्तसुनीत

मागील कवितेच्या मानाने हा प्रयत्न फिका वाटला. पण डळमळून जायचे कारण नाही.

भावानुवाद ही एक चांगली संकल्पना आहे , पण भावानुवाद करणे - विशेषतः काव्याचा - तोबा तोबा ! मूळ काव्याचा सुगंध तसाच्या तसा आपल्या भाषेत आणणे हे फार जिकीरीचे काम आहे...

भडकमकर मास्तर's picture

15 Jun 2008 - 12:09 am | भडकमकर मास्तर

मला आवडला हा भावानुवाद...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पक्या's picture

15 Jun 2008 - 12:40 pm | पक्या

>>एका सुप्रसिध्द हिन्दी गाण्याचा हा स्वैर भावानुवाद--
असं न सांगता नुसतंच एक गाणं म्हणून टाकलं असतं तर एकवेळ गाणं बरं वाटलं असतं.
या भावानुवादाची काही मजा आली नाही. मूळ गाण्यातील शब्द सहज सोपे आहेत. ईथे मात्र ते ओढून ताणून आणल्यासारखे वाटतायेत.