(मराठवाडा, कोकण व इतर जागीही शेतकरी जीव देत आहेत. म्हणुन ही कविता.)
आक्री त अस घडल, शेत करपुन गेल
सावकारी कर्ज, डोंगरा एव्हढ झाल.
वाट अशी खडतर, देव झाला गायब
देव भेटला तरी , राक्षस सरकारी साहेब.
पेरण्या आणल बी, सरकारवानी बोगस होत.
सरकारतरी कस, मा़झ नशिब फुटक होत.
विहिरीने घात केला , पाण्याने एकदम तळ गाठला.
त्रासामुळे मग संसारही भार वाटला.
पाणी आणायच कस? चिंतेत मन विटल
जीव संपवायच वादळ, डोक्यात पुन्हा उठल.
जीव दिला तरी , उत्तर मिळणार नाही.
बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही.
बळी राजाच देण ह्याजन्मी तरी फीटणार नाही.
प्रतिक्रिया
20 Mar 2012 - 7:24 pm | हारुन शेख
पहिल्या , तिसऱ्या , पाचव्या , सहाव्या कडव्यांमधले आणि शीर्षकातल्या अनुस्वारांचा बळी गेला आहे. 'फीटणार' शब्दाचे शुद्धलेखन कृपया दुरुस्त करा.
कवितेचा भाव पोहोचला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
20 Mar 2012 - 7:39 pm | पैसा
कविता जरा शुद्ध लिही मरे! तुका काय सांगूचां आसां तां माका कळ्ळां. पण थोडी जास्त सफाईदार व्हयीं. एक सजेस्ट करतां. मालवणीत एखादी कविता लिही बगाया!