मिड्लाईफ क्रायसीस.

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
19 Mar 2012 - 8:54 pm

टळट्ळीत दुपारी, पायाशी पडलेल्या सावलीने,
हळुच मागे वळुन पाहिल्या, स्वतःच्याच पावुलखुणा.
काही ठसठशीत होत्या दुरवर, मातीत जवळ्च्या काही विरलेल्या..

एका रेषेत रस्ताही नव्हता, पावलही पडलेली झिंगल्यासारखी,
आठवतात आता वाटांचे ईषारे, मागच्या वळणांची निमंत्रणही..
हसत स्वीकारलेली, रडत अव्हेरलेली, मुकी अजुनही उभी माझ्यासाठी..

काही अत्रुप्त इच्छांचे भोग, काही अत्रुप्त भोगांच्या ईच्छा..
काही त्रुप्तल्या भोगांच्या आवर्तनांची, जळजळुन उठणारी वखवख..
आजही बनवतोय एक नैतिक चौकट, माझ्या पापांच्या मापाची..

कधी वार्‍यावर वाहत गेलेलं मन, कधी मनावरुन वारं गेलेलं,
दगडी पायाला फुटलेली शेवाळ, अन मातीच्या धरणांत अडलेले महापुर.
सगळच क्षुल्लक वाटतय इथुन, ज्याच्यामुळे मी इथे पोचलो तेही!

शरीराच्या स्त्रावांचे गुलाम असलेले भाव, उचंबळुन उठतात अजुनही,
जरी पचवलेत अनेक पावसाळे, आणी ओळखीची झालेली लाटांची वादळं,
न खेळलेल्या जुगारांची निनादती हाक.. बहुदा मिडलाइफ क्रायसीस....

---शैलेंद्र..

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Mar 2012 - 9:34 pm | पैसा

कविता आवडली. मिलाक्रा असेल किंवा नसेलही. इतर भाव कधीही येऊ शकतात.

शैलेन्द्र's picture

19 Mar 2012 - 10:26 pm | शैलेन्द्र

:)

प्रचेतस's picture

19 Mar 2012 - 10:44 pm | प्रचेतस

जबरदस्त.

सांजसंध्या's picture

20 Mar 2012 - 3:13 am | सांजसंध्या

निव्वळ अप्रतिम... नि:शब्द !!

पक पक पक's picture

20 Mar 2012 - 8:37 am | पक पक पक

झक्कास ,आवडली आहे.... :)

स्पा's picture

20 Mar 2012 - 8:41 am | स्पा

जबराट

स्पंदना's picture

20 Mar 2012 - 8:42 am | स्पंदना

फार छान.

शैलेन्द्र साहेब, निव्वळ लाजवाब कविता.

शरीराच्या स्त्रावांचे गुलाम असलेले भाव, उचंबळुन उठतात अजुनही,
जरी पचवलेत अनेक पावसाळे, आणी ओळखीची झालेली लाटांची वादळं,
न खेळलेल्या जुगारांची निनादती हाक.. बहुदा मिडलाइफ क्रायसीस

हे शेवटचे कडवे म्हंजे कवितेचा high point आहे.

निव्वळ अप्रतिम, लाजवाब कविता.

शैलेन्द्र's picture

21 Mar 2012 - 12:53 pm | शैलेन्द्र

आभारी आहे.. नुसत शैलेन्द्र म्हणाला असतात तर अतिशय आभारी असतो.. :)

प्यारे१'s picture

20 Mar 2012 - 3:33 pm | प्यारे१

सुपर्ब....

चित्रा's picture

20 Mar 2012 - 5:33 pm | चित्रा

कविता अतिशय आवडली.

(मात्र कवितांसाठी तरी र्‍ह्स्व-दीर्घासाठी प्रमाणलेखनाकडे लक्ष असावे असे वाटते. कविता फुटकळ असतात, तेव्हा फरक पडत नाही. पण कविता चांगली आहे असे वाटल्याने तिच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तरी लेखन प्रमाण हवे असे वाटते. )

शैलेन्द्र's picture

31 Mar 2012 - 5:30 pm | शैलेन्द्र

धन्यवाद, खरं तर इच्छा असते प्रमाण लिहीण्याची, पण मुळात शुद्धलेखनच कच्चे आहे.. :) जालावर कुठे हे ठीक करुन मिळते का?