टळट्ळीत दुपारी, पायाशी पडलेल्या सावलीने,
हळुच मागे वळुन पाहिल्या, स्वतःच्याच पावुलखुणा.
काही ठसठशीत होत्या दुरवर, मातीत जवळ्च्या काही विरलेल्या..
एका रेषेत रस्ताही नव्हता, पावलही पडलेली झिंगल्यासारखी,
आठवतात आता वाटांचे ईषारे, मागच्या वळणांची निमंत्रणही..
हसत स्वीकारलेली, रडत अव्हेरलेली, मुकी अजुनही उभी माझ्यासाठी..
काही अत्रुप्त इच्छांचे भोग, काही अत्रुप्त भोगांच्या ईच्छा..
काही त्रुप्तल्या भोगांच्या आवर्तनांची, जळजळुन उठणारी वखवख..
आजही बनवतोय एक नैतिक चौकट, माझ्या पापांच्या मापाची..
कधी वार्यावर वाहत गेलेलं मन, कधी मनावरुन वारं गेलेलं,
दगडी पायाला फुटलेली शेवाळ, अन मातीच्या धरणांत अडलेले महापुर.
सगळच क्षुल्लक वाटतय इथुन, ज्याच्यामुळे मी इथे पोचलो तेही!
शरीराच्या स्त्रावांचे गुलाम असलेले भाव, उचंबळुन उठतात अजुनही,
जरी पचवलेत अनेक पावसाळे, आणी ओळखीची झालेली लाटांची वादळं,
न खेळलेल्या जुगारांची निनादती हाक.. बहुदा मिडलाइफ क्रायसीस....
---शैलेंद्र..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1775
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली.
(No subject)
In reply to कविता आवडली. by पैसा
जबरदस्त.
निव्वळ अप्रतिम... नि:शब्द !!
झक्कास ,आवडली आहे....
जबराट
फार छान.
शैलेन्द्र साहेब, निव्वळ लाजवाब कविता.
आभारी आहे.. नुसत शैलेन्द्र
In reply to शैलेन्द्र साहेब, निव्वळ लाजवाब कविता. by निश
सुपर्ब....
छान
धन्यवाद, खरं तर इच्छा असते.
In reply to छान by चित्रा