होते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी
कृत्रिम या जगाशी, संधान सांधले मी
अस्तित्व आज माझे, दुनिया निघे पुसाया
आईसवेच माझ्या, गर्भात भांडले मी
रूढी, परंपरा, अन्, शीलास झेलताना
काट्यास त्या भुकेच्या, बेहाल गांजले मी
होती शिकावयाला, बंदी मलाच केली
बाराखडीत माझ्या, ध्येयास मांडले मी
क्रांतीस पेव फुटले, ठिणगी सवे भडकली
पाठीस मूल होते, रक्तास सांडले मी
मकरंद
२१०२१००२
प्रतिक्रिया
2 Feb 2012 - 4:21 am | दीपा माने
अप्रतिम शब्दरचना! वाचताना मनच मोहरल्यासारखे वाटले.
2 Feb 2012 - 7:13 am | इन्दुसुता
अप्रतिम...
स्त्री भावना बोलक्या केल्या आहेत... काहींना पचायला कदाचित जड जातील...
काट्यास त्या भुकेच्या, बेहाल गांजले मी
रक्तास सांडले मी
विशेष आवडले
2 Feb 2012 - 8:37 am | अत्रुप्त आत्मा
वा..वा...फारच छान कल्पना,आणी त्याहून प्रभावी शब्दरचना
2 Feb 2012 - 2:03 pm | फिझा
अप्रतिम...!!! खुपच छान !!