होते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी
कृत्रिम या जगाशी, संधान सांधले मी
अस्तित्व आज माझे, दुनिया निघे पुसाया
आईसवेच माझ्या, गर्भात भांडले मी
रूढी, परंपरा, अन्, शीलास झेलताना
काट्यास त्या भुकेच्या, बेहाल गांजले मी
होती शिकावयाला, बंदी मलाच केली
बाराखडीत माझ्या, ध्येयास मांडले मी
क्रांतीस पेव फुटले, ठिणगी सवे भडकली
पाठीस मूल होते, रक्तास सांडले मी
मकरंद
२१०२१००२
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1057
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम शब्दरचना! वाचताना मनच
अप्रतिम... स्त्री भावना
वा..वा...फारच छान कल्पना,आणी
अप्रतिम...!!!