Skip to main content

होते स्वतंत्र, मजला......

लेखक मकरन्दबेहेरे यांनी बुधवार, 01/02/2012 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
होते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी कृत्रिम या जगाशी, संधान सांधले मी अस्तित्व आज माझे, दुनिया निघे पुसाया आईसवेच माझ्या, गर्भात भांडले मी रूढी, परंपरा, अन्, शीलास झेलताना काट्यास त्या भुकेच्या, बेहाल गांजले मी होती शिकावयाला, बंदी मलाच केली बाराखडीत माझ्या, ध्येयास मांडले मी क्रांतीस पेव फुटले, ठिणगी सवे भडकली पाठीस मूल होते, रक्तास सांडले मी मकरंद २१०२१००२
लेखनविषय:

वाचने 1072
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अप्रतिम... स्त्री भावना बोलक्या केल्या आहेत... काहींना पचायला कदाचित जड जातील... काट्यास त्या भुकेच्या, बेहाल गांजले मी रक्तास सांडले मी विशेष आवडले