आमची एक अप्रकाशित कविता...

शेखस्पिअर's picture
शेखस्पिअर in जे न देखे रवी...
8 Jun 2008 - 9:12 pm

विषय सांगण्याची आवश्यकता नाही...स्वस्पष्टीकर आहे...

शूर आम्ही सरदार आम्हाला, ठावूक नव्हती भीती ...
काय जाहले विपरित घडले चढलो बोहल्यावरती... ध्रु.(बाकी कविता नाही लक्षात राहीली तरी चालेल..हे लक्षात ठेवा)

आईच्या पदरास धरूनी चालत आलो येथ..
तरवारीशी लगीन लागलं कसली येडी प्रीत...
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती...
पण हे संकट खचित आगळे मूर्तिमंत ही भीती... १

करून पहावं पाहुन करावं हेच आम्हाला ठावं...
पळूनच जावं ,"समर्थ "बनावं हे नच आम्हा व्हावं...
लग्नापायी स्वातंत्र्याची मोजू किंमत भारी...
काय जाहले विपरित घडले चढलो बोहल्यावरती... २

विडंबन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

8 Jun 2008 - 11:01 pm | बेसनलाडू

मस्त!
(आनंदित)बेसनलाडू
याला विडंबन म्हणावे काय? जाणकार मिपाकरांनी प्रकाश टाकल्यास उत्तम :)
(पृच्छक)बेसनलाडू

मन's picture

9 Jun 2008 - 12:38 am | मन

आहे कविता.

आपलाच,
मनोबा

फटू's picture

9 Jun 2008 - 2:35 am | फटू

अशी भीती नका दाखवू हो...

'लग्न' या कल्पनेनंच आमचं अंग अंग मोहरून जातं... आणि तुम्ही अशी भीती दाखवलीत तर कसं व्हायचं...

शेखस्पिअरराव, बाकी झकास लिहिलंय तुम्ही...

(तुमच्या कवितेला विडंबन म्हणावे की नाही या बुचकळ्यात पडलेला)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चतुरंग's picture

9 Jun 2008 - 2:51 am | चतुरंग

आपले निधड्या छातीचे शूर विडंबन आवडले! ;)

(स्वगत - हा सरदार गेली कित्येक वर्ष लढतोय! सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढत नाहीत काहीत हरण्यातही मजा असते! ;) )
चतुरंग

अजय जोशी's picture

9 Jun 2008 - 12:25 pm | अजय जोशी

लग्नापायी स्वातंत्र्याची मोजू किंमत भारी...

मी असं ऐकलंय,
लग्न हे आलेलं दु:ख नसतं, तर स्विकारलेलं दु:ख असतं ..
आणि ...
लग्नानंतर जे खांद्यावर येतं ते उचललेलं दु:ख असतं.

(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी

वरदा's picture

9 Jun 2008 - 6:32 pm | वरदा

विडंबन म्हणून चांगलं आहे
सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढत नाहीत काहीत हरण्यातही मजा असते!
हे सगळ्यात खरं

कवटी's picture

12 Jun 2008 - 12:31 pm | कवटी

झकास जमलय.
अवांतरः हे तुमच्या लग्नाआगोदर लिहिलय की लग्नानंतर हो? (ह.घ्या.)