विषय सांगण्याची आवश्यकता नाही...स्वस्पष्टीकर आहे...
शूर आम्ही सरदार आम्हाला, ठावूक नव्हती भीती ...
काय जाहले विपरित घडले चढलो बोहल्यावरती... ध्रु.(बाकी कविता नाही लक्षात राहीली तरी चालेल..हे लक्षात ठेवा)
आईच्या पदरास धरूनी चालत आलो येथ..
तरवारीशी लगीन लागलं कसली येडी प्रीत...
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती...
पण हे संकट खचित आगळे मूर्तिमंत ही भीती... १
करून पहावं पाहुन करावं हेच आम्हाला ठावं...
पळूनच जावं ,"समर्थ "बनावं हे नच आम्हा व्हावं...
लग्नापायी स्वातंत्र्याची मोजू किंमत भारी...
काय जाहले विपरित घडले चढलो बोहल्यावरती... २
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3349
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाव्वा!
वा!झकास
काय राव...
शेखस्पिअर साहेब
मजेशीर
ह्म्म्म
छान