प्.पू.चैतन्य महाराज प्रवचने- समर्थ रामदासांची करुणाष्टके

विटेकर's picture
विटेकर in जनातलं, मनातलं
25 Nov 2011 - 3:09 pm

॥ श्रीराम समर्थ ॥
" मासानां मार्गशीर्षो s हम... असे भगवंताने भगवदगीतेत आपली विभूती
सांगताना म्हटले आहे. दि. २६ नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे. आपणा सर्वांच्या सदभाग्याने याच काळात वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष प. पू. चैतन्य महाराज देगलूरकर यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे, कृपया सर्वांनी या अपूर्व संधीचा लाभ घ्यावा.

विषय - समर्थ रामदासांची करुणाष्टके
स्थळ - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
वेळ - सकाळी ९ ते ११., शनिवार दि. २६ नोव्हे. आणि
रविवार दि. २७ नोव्हेंबर २०११.

या निमित्ताने " श्रीमद ग्रंथराज दासबोध अभ्यास उपक्रम ( पत्राद्वारे/ ई-मेलद्वारे ) संकेतस्थळ( वेबसाईट)” सुरु होत आहे. त्याचे उदघाटन प्रसिद्ध विचारवंत
प्रा.डोक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते दि. २६ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा ही विनंती!

आपले
डो.राम साठ्ये श्री.सुहास क्षीरसागर श्री. सुनील चिंचोलकर
Website : www.samarthramdas400.in
Blog : http://samartharamdas400.blogspot.com

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

धर्मबातमी

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Nov 2011 - 3:42 pm | मदनबाण

या चांगल्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा ! :)

अमोल केळकर's picture

25 Nov 2011 - 3:54 pm | अमोल केळकर

माझ्याही अनेक शुभेच्छा :)

अमोल केळकर

परिकथेतील राजकुमार's picture

25 Nov 2011 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार

अनेकानेक शुभेच्छा :)

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2011 - 5:13 pm | टवाळ कार्टा

सर्वप्रथम शुभेछ्छा

माझी काही मते

>>"वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष प. पू. चैतन्य महाराज देगलूरकर यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे"
चांगली गोष्ट आहे...पण त्याच बरोबर जर लोकांमधे थोडा जागरुकपणासुध्धा आणता येइल
जसे...

दिल्लीमधे जे काही झाले तर त्याची प्रतिक्रिया इथे कशाला???
प्रवचनाला जे मध्यम्वर्गीय येतील त्यांच्यापैकी काही जणांच्या घरातील तरुण राजकीय पक्शांशी संबंधीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही....या प्रवचनाचा त्या तरुणांवर काही सकारात्मक प्रभाव पडु शकेल का? जेणेकरुन इथे ज्या काही मुर्ख लोकांच्या "उत्स्पुर्त प्रतिक्रिया" होतात त्या भविष्यात कमी होतील

अर्धवटराव's picture

25 Nov 2011 - 8:40 pm | अर्धवटराव

हा मद्य पिऊन दिग्विजय सिंगची मिमीक्री करायचा प्रयत्न म्हणावा काय?

अर्धवटराव

चैतन्य दीक्षित's picture

25 Nov 2011 - 5:39 pm | चैतन्य दीक्षित

पुण्यात नसल्याने,
देगलूरकर महाराजांची अमृतवाणी ऐकायला मिळण्याचा दुर्मिळ योग ज्यांना मिळेल, त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतोय.

अवांतर-
टवाळ कार्टा-
अहो, तुम्ही म्हणता तशा काही अपेक्षा करणे म्हणजे,
'माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते'- अर्थात, मधाच्या एका थेंबाने समुद्रात गोडी निर्माण करण्याची इच्छा बाळगण्यासारखे आहे !

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2011 - 9:20 pm | टवाळ कार्टा

>>'माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते'- अर्थात, मधाच्या एका थेंबाने समुद्रात गोडी निर्माण करण्याची इच्छा बाळगण्यासारखे आहे !

अगदी बरोबर...पण जे बदलतील ते आणखी काही लोकांना बदलतील....
atleast start a chain reaction....

पण कहीही न करता आपल्या आजुबाजुची परीस्थीती बदलण्याची अपेक्शा करणे यापेक्शा तरी छोटा प्रयत्न करणे हे कधीही चांगले

निवेदिता-ताई's picture

25 Nov 2011 - 7:41 pm | निवेदिता-ताई

:)

अर्धवटराव's picture

25 Nov 2011 - 8:44 pm | अर्धवटराव

|| जय जय रघुवीर समर्थ ||

शक्य असल्यास या कार्यक्रमाची चलचित्र फीत तुनळी वा तत्सम स्थळी चढवून लिंक शेअर करावी हि विनंती.

(कार्यक्रमाचं रसग्रहण वाचण्यास उत्सुक) अर्धवटराव