Skip to main content

प्.पू.चैतन्य महाराज प्रवचने- समर्थ रामदासांची करुणाष्टके

लेखक विटेकर यांनी शुक्रवार, 25/11/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्रीराम समर्थ ॥ " मासानां मार्गशीर्षो s हम... असे भगवंताने भगवदगीतेत आपली विभूती सांगताना म्हटले आहे. दि. २६ नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे. आपणा सर्वांच्या सदभाग्याने याच काळात वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष प. पू. चैतन्य महाराज देगलूरकर यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे, कृपया सर्वांनी या अपूर्व संधीचा लाभ घ्यावा. विषय - समर्थ रामदासांची करुणाष्टके स्थळ - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे. वेळ - सकाळी ९ ते ११., शनिवार दि. २६ नोव्हे. आणि रविवार दि. २७ नोव्हेंबर २०११. या निमित्ताने " श्रीमद ग्रंथराज दासबोध अभ्यास उपक्रम ( पत्राद्वारे/ ई-मेलद्वारे ) संकेतस्थळ( वेबसाईट)” सुरु होत आहे. त्याचे उदघाटन प्रसिद्ध विचारवंत प्रा.डोक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते दि. २६ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा ही विनंती! आपले डो.राम साठ्ये श्री.सुहास क्षीरसागर श्री. सुनील चिंचोलकर Website : www.samarthramdas400.in Blog : http://samartharamdas400.blogspot.com ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4345
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सर्वप्रथम शुभेछ्छा माझी काही मते >>"वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष प. पू. चैतन्य महाराज देगलूरकर यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे" चांगली गोष्ट आहे...पण त्याच बरोबर जर लोकांमधे थोडा जागरुकपणासुध्धा आणता येइल जसे... दिल्लीमधे जे काही झाले तर त्याची प्रतिक्रिया इथे कशाला??? प्रवचनाला जे मध्यम्वर्गीय येतील त्यांच्यापैकी काही जणांच्या घरातील तरुण राजकीय पक्शांशी संबंधीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही....या प्रवचनाचा त्या तरुणांवर काही सकारात्मक प्रभाव पडु शकेल का? जेणेकरुन इथे ज्या काही मुर्ख लोकांच्या "उत्स्पुर्त प्रतिक्रिया" होतात त्या भविष्यात कमी होतील

पुण्यात नसल्याने, देगलूरकर महाराजांची अमृतवाणी ऐकायला मिळण्याचा दुर्मिळ योग ज्यांना मिळेल, त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतोय. अवांतर- टवाळ कार्टा- अहो, तुम्ही म्हणता तशा काही अपेक्षा करणे म्हणजे, 'माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते'- अर्थात, मधाच्या एका थेंबाने समुद्रात गोडी निर्माण करण्याची इच्छा बाळगण्यासारखे आहे !

In reply to by चैतन्य दीक्षित

>>'माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते'- अर्थात, मधाच्या एका थेंबाने समुद्रात गोडी निर्माण करण्याची इच्छा बाळगण्यासारखे आहे ! अगदी बरोबर...पण जे बदलतील ते आणखी काही लोकांना बदलतील.... atleast start a chain reaction.... पण कहीही न करता आपल्या आजुबाजुची परीस्थीती बदलण्याची अपेक्शा करणे यापेक्शा तरी छोटा प्रयत्न करणे हे कधीही चांगले

|| जय जय रघुवीर समर्थ || शक्य असल्यास या कार्यक्रमाची चलचित्र फीत तुनळी वा तत्सम स्थळी चढवून लिंक शेअर करावी हि विनंती. (कार्यक्रमाचं रसग्रहण वाचण्यास उत्सुक) अर्धवटराव