लहानपणी नेहमी वाटे कधी आपण मोठे होणार!!!
बाबांसारखी brief case घेऊन कधी बरं office ला जाणार
कल्पना साडी नेसून खेळू मैत्रीणी घर-घर
हातात purse आईची आणि बाहुली असे कडेवर
हळू हळू शिकत पुढे शिक्षण आपलं पूर्ण करतो
टप्पे टोणपे खात engineer म्हणून बाहेर पडतो
मग सुरू होतो आपला खरा अनोळखी प्रवास
चालू होतात Campus Placements साठी चकरा आणि वाचू लागतो Classifieds
Written Test, Tech round, HR च्या सापडतो जाळ्यात
काही प्रयत्नानंतर अडकून जातो Corporate च्या विळख्यात
Induction program नी मन अगदी मोहून जातं
घर्-बस-office-weekend हे सगळंच अंगवळणी पडतं
Office सुदधा एक शिक्षणाचं दालन बनतं, भेटतात स्वभाव चित्र विचित्र
खरा फरक लक्षात येतो - कोण colleague नी कुठला सख्खा मित्र
project,client,technology; सारखं असतं deadlines च tension
भविष्याची काळजी वाटते; अधून मधून असतंच recession
त्याच त्याच कामाचा काही वर्षांनी कंटाळा येऊ लागतो
सुखी वाटतात पुर्वीचे दिवस जेव्हा कधी मागे वळून बघतो
आता वाटतय मोठं होण्यात कहीच नाही मजा
बालपणातच आनंद होता, मोठं होणे म्हणजे नुस्ती एक सजा
नव्ह्ती कसलीच काळजी, कटकट नी भविष्याची चिंता
पुढे काय करायचं, काय होईल असा कसलाच नसे डोक्याला भुंगा
प्रतिक्रिया
11 Oct 2011 - 12:41 pm | प्रभाकर पेठकर
'रम्य ते बालपण' हेच शेवटी खरे म्हणायचे.
11 Oct 2011 - 3:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान झालय मुक्तक.
एक विनंती: इंग्रजी शब्दांशिवायही हे मुक्तक लिहीता आले असते, असे वाटते.
11 Oct 2011 - 5:06 pm | गणेशा
खरे आहे ...
लिहित रहा... वाचत आहे
11 Oct 2011 - 11:33 pm | पैसा
पण शक्य तितकं मराठीत लिहून बघा कसं वाटतंय ते!