रुप बहरता हसणे, मजला महाग पडले.
तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले.
ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे.
अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले.
ते कोवळे तारुण्य.बांधले रेशिम काचोळित
अनंग ठसा उमटवणे,मजला महाग पडले.
नजर, कधि लाजरी, तर कधि नाचरी
नजरेस नजर देणे ,मजला महाग पडले.
तु श्रुंगार वेडी, असे बेधुंद रागीणी
विसावणे मिठीत तुझ्या,मजला महाग पडले.
फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळतो
देहात देह मीसळणे.मजला महाग पडले
अविनाश...
प्रतिक्रिया
26 Sep 2011 - 5:36 pm | शैलेन्द्र
कविता आवडली पण नक्कि महाग काय पडले ते नाही कळले.. ;)
26 Sep 2011 - 5:42 pm | आत्मशून्य
अनंग ठसा उमटवणे,महाग पडले असावे.
26 Sep 2011 - 6:01 pm | विनायक प्रभू
आता ठसा उठवताना काळजी घ्यायचा नाही का?
नंतर उगाच असे बोंबलत फिरायचे कारणच उरणार नाही.
असो.
पण ठसा अनंग होता ना?
मग महाग कसा काय पडला बुवा?
तुम्हाला अनंत म्हणायचे होते का?
26 Sep 2011 - 11:26 pm | शैलेन्द्र
सराईत ठसेबाज, ठसा न उमटवताच निशानी सोडतात असं काहीस विप्र गुर्जी मागे बोलले होते बॉ..
बाकी ठश्याला अनंत म्हणताय की ठश्याने तयार झालेल्या पावतीस?
27 Sep 2011 - 12:59 am | पाषाणभेद
अनंग ठसा उमटवल्याने तो ठसा उमटवल्याच्या मालकाने लगावलेला ठोसा हा महागात पडला असावा.
बाकी गझल छानच आहे.
26 Sep 2011 - 5:49 pm | विजुभाऊ
इतके सगळे झाल्यावर लग्न करावे लागले असेल तेच बहुतेक महाग पडले असेल...... किमान सात जन्म ईएम आय द्यावे लागतात
26 Sep 2011 - 6:23 pm | प्रदीप
बंगाली होती काय?
26 Sep 2011 - 6:48 pm | मी-सौरभ
कोलकाता मधे जाऊन पारोला भेटून आलात वाटतं...
26 Sep 2011 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे.
अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले.
अहाहा.....!
-दिलीप बिरुटे
26 Sep 2011 - 10:12 pm | नितिन थत्ते
अविनाशकुलकर्णी झिंदाबाद.
27 Sep 2011 - 8:09 am | प्रदीप
अविनाशकुलकर्णीझिंदाबाद
27 Sep 2011 - 4:27 am | प्रकाश१११
अविनाशजी -छान ,सुरेख गझल
रुप बहरता हसणे, मजला महाग पडले.
तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले.
27 Sep 2011 - 1:45 pm | गणेशा
काका मस्त कविता एकदम ...
खुप दिवसानी कविता वाचायला मिळाली तुमची..
आणि एकदम अविनाश स्टाईल कविता.
27 Sep 2011 - 8:10 pm | मदनबाण
छान...