मजला महाग पडले.
रुप बहरता हसणे, मजला महाग पडले.
तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले.
ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे.
अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले.
ते कोवळे तारुण्य.बांधले रेशिम काचोळित
अनंग ठसा उमटवणे,मजला महाग पडले.
नजर, कधि लाजरी, तर कधि नाचरी
नजरेस नजर देणे ,मजला महाग पडले.
तु श्रुंगार वेडी, असे बेधुंद रागीणी
विसावणे मिठीत तुझ्या,मजला महाग पडले.
फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळतो
देहात देह मीसळणे.मजला महाग पडले
अविनाश...
लेखनविषय:
याद्या
2741
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
कविता आवडली पण नक्कि महाग काय
अनंग ठसा उमटवणे,मजला महाग
In reply to कविता आवडली पण नक्कि महाग काय by शैलेन्द्र
ठसा
In reply to अनंग ठसा उमटवणे,मजला महाग by आत्मशून्य
सराईत ठसेबाज, ठसा न उमटवताच
In reply to ठसा by विनायक प्रभू
अनंग ठसा उमटवल्याने तो ठसा
In reply to सराईत ठसेबाज, ठसा न उमटवताच by शैलेन्द्र
इतके सगळे झाल्यावर लग्न करावे
छान
जल्ला तरीच..
लैच भारी.
अविनाशकुलकर्णी झिंदाबाद.
अविनाशकुलकर्णीझिंदाबाद
In reply to अविनाशकुलकर्णी झिंदाबाद. by नितिन थत्ते
अविनाशजी -छान ,सुरेख गझल रुप
रुप बहरता हसणे, मजला महाग
छान...