Skip to main content

मजला महाग पडले.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 26/09/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
रुप बहरता हसणे, मजला महाग पडले. तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले. ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे. अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले. ते कोवळे तारुण्य.बांधले रेशिम काचोळित अनंग ठसा उमटवणे,मजला महाग पडले. नजर, कधि लाजरी, तर कधि नाचरी नजरेस नजर देणे ,मजला महाग पडले. तु श्रुंगार वेडी, असे बेधुंद रागीणी विसावणे मिठीत तुझ्या,मजला महाग पडले. फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळतो देहात देह मीसळणे.मजला महाग पडले अविनाश...
लेखनविषय:

वाचने 2763
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by आत्मशून्य

आता ठसा उठवताना काळजी घ्यायचा नाही का? नंतर उगाच असे बोंबलत फिरायचे कारणच उरणार नाही. असो. पण ठसा अनंग होता ना? मग महाग कसा काय पडला बुवा? तुम्हाला अनंत म्हणायचे होते का?

In reply to by विनायक प्रभू

सराईत ठसेबाज, ठसा न उमटवताच निशानी सोडतात असं काहीस विप्र गुर्जी मागे बोलले होते बॉ.. बाकी ठश्याला अनंत म्हणताय की ठश्याने तयार झालेल्या पावतीस?

In reply to by शैलेन्द्र

अनंग ठसा उमटवल्याने तो ठसा उमटवल्याच्या मालकाने लगावलेला ठोसा हा महागात पडला असावा. बाकी गझल छानच आहे.

इतके सगळे झाल्यावर लग्न करावे लागले असेल तेच बहुतेक महाग पडले असेल...... किमान सात जन्म ईएम आय द्यावे लागतात

ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे. अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले. अहाहा.....! -दिलीप बिरुटे

अविनाशजी -छान ,सुरेख गझल रुप बहरता हसणे, मजला महाग पडले. तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले.

रुप बहरता हसणे, मजला महाग पडले. तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले. ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे. अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले. ते कोवळे तारुण्य.बांधले रेशिम काचोळित अनंग ठसा उमटवणे,मजला महाग पडले.
काका मस्त कविता एकदम ... खुप दिवसानी कविता वाचायला मिळाली तुमची.. आणि एकदम अविनाश स्टाईल कविता.