अरुंधती रॉय होण्यापेक्षा मला अण्णा व्हायला का आवडेल?

इष्टुर फाकडा's picture
इष्टुर फाकडा in काथ्याकूट
23 Aug 2011 - 7:49 pm
गाभा: 

हा दुवा देत आहे...कृपया जरूर वाचा. अरुंधती हि मला कायमच बौद्धिक दिवाळखोर वाटत आली आहे, पण तिच्याविरुद्ध इतकी मुद्देसूद टीका करणे आपल्याला जमायचे नाही. म्हणूनच जो हा लेख वाचनात आला तो देत आहे, आंग्ल भाषेत जरी असला तरी फारच व्यवस्थित लिहिला आहे.

http://clearvisor.wordpress.com/2011/08/23/why-i%E2%80%99d-rather-be-ann...

प्रतिक्रिया

पप्पु अंकल's picture

23 Aug 2011 - 9:15 pm | पप्पु अंकल

आंग्ल भाषेत समजला नाय........... जरा भाशांतर कराल काय ?
तां पण हयसरच हां.........

पंगा's picture

23 Aug 2011 - 9:33 pm | पंगा

अरुंधती रॉय होण्यापेक्षा मला अण्णा व्हायला का आवडेल?

'कारण आपण* एमसीपी आहात म्हणून' या निष्कर्षाप्रत येण्याकरिता लेख वाचणे आवश्यक आहे काय? त्याकरिता शीर्षकच पुरेसे नाही काय?

* (पक्षी: संबंधित लेखाचा लेखक.)

(असो. संबंधित लेख वरवर चाळला. अरुंधतीतैंनी इतरत्र लिहिलेल्या अन्य एका लेखातील मुद्द्यांचे क्रमवार खंडन करण्याचा प्रयत्न लेखकाने त्यात केलेला दिसतो. लेखकाचा खंडनातील प्रतिवाद योग्य असेलही किंवा नसेलही, परंतु त्यातून मला कोठेही 'लेखकास अरुंधती रॉय होण्याऐवजी अण्णा हजारे व्हावयास का आवडेल' या (शीर्षकातून सुचवलेल्या) मूलभूत प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही. शेवटी नाइलाजास्तव, 'असते एकेकाची आवड; No accounting for tastes' म्हणून सदर बाब सोडून द्यावी लागली.)

आळश्यांचा राजा's picture

23 Aug 2011 - 11:03 pm | आळश्यांचा राजा

लेखकाचा खंडनातील प्रतिवाद योग्य असेलही किंवा नसेलही, परंतु त्यातून मला कोठेही 'लेखकास अरुंधती रॉय होण्याऐवजी अण्णा हजारे व्हावयास का आवडेल' या (शीर्षकातून सुचवलेल्या) मूलभूत प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही.

लेख चांगला आहे. विचार करण्यासारखा आहे. आणि मला वाटते अरुंधती रॉय होण्याऐवजी अण्णा व्हायला का आवडेल या प्रश्नाचे उत्तरही त्या लेखात आहे.

असो. अरुंधती रॉयचा आणि सदर उल्लेखित लेख दोन्ही आवर्जून वाचण्यासारखे आहेत.

बादवे अरुणा रॉय यांचा यावर काही लेख आलेला कुणाला माहिती आहे काय?

इष्टुर फाकडा's picture

24 Aug 2011 - 3:13 pm | इष्टुर फाकडा

Why I’d rather be Anna than Arundhati - हे या लेखाचे मूळ नाव आहे. शीर्षकाचा अचूक अर्थ आंग्ल भाषेत लागतो. त्याचे थेट मराठी भाषांतर केल्याने इथे ते थोडं वेगळं वाटत आहे. असो, मुद्दा हा नाहीये हे वरवर लेख चाळला तरी लक्षात यायला हवे होते...पण नाईलाजास्तव हि बाब वैयक्तिक 'निवडीवर' सोडून देत आहोत ;)

धमाल मुलगा's picture

24 Aug 2011 - 3:24 pm | धमाल मुलगा

अण्णा देशाबाबत आस्था असणारे आहेत.
आण्णा देशद्रोही नाहीत.

इष्टुर फाकडा's picture

24 Aug 2011 - 3:51 pm | इष्टुर फाकडा

म्हणता ते तंतोतंत बरोबर आहे, माझंही हेच मत आहे. पण तथाकथित बुद्धिवाद्यांना त्यांच्या भाषेतील उत्तर या लेखातून दिल्यामुळे इथे डकवला आहे.

मराठी_माणूस's picture

24 Aug 2011 - 4:17 pm | मराठी_माणूस

तथाकथित बुद्धिवाद्यांना

ह्यांचा सगळीकडेच फार सुळसुळाट झाला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Aug 2011 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार

मला कोणी हे अरुंधती रॉय आणि अण्णा कोण आहेत ते सांगेल काय ?

धन्यवाद.

सहज's picture

24 Aug 2011 - 4:33 pm | सहज

तुम्हीच मागे नाही का व्याख्या केली होती तेच हो.

एखाद्या क्षेत्रात कौतुक झाल्याबरोब्बर लोक तो प्रांत सोडून देश सावरायला निघालेले.

http://www.misalpav.com/node/18327#comment-319253

> तिथे तुम्ही उल्लेख केलेल्या अरुंधतीतै त्याच.

आणी तुम्ही इथे उल्लेख केलेले अण्णा हजारे
http://www.misalpav.com/node/18193#comment-316129

अर्थात मी काही तज्ञ नाही जाणकारांनी खुलासा करावा. ;-)

स्कॉटलंडयार्डात होतात का हो सहजमामा तुम्ही. ;)

धमाल मुलगा's picture

24 Aug 2011 - 6:18 pm | धमाल मुलगा

रशियाचं केजीबी. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

24 Aug 2011 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार

खूप खूप धन्यवाद.

सदर धाग्यातील अण्णा म्हणजे ज्यांचे नाव घेताच कानाच्या पाळीला हात लागतो ते अण्णा नसून उपोषण वाले अण्णा आहेत, तसेच अरुंधती रॉय म्हणजे त्या पांढर्‍यावर काळे करणार्‍या आणि कुठलीशी चळवळ चालवणार्‍या त्याच आहेत ह्याचा उलगडा झाला. आपला आभारीच आभारी आहे.

विंग्रजी कळत न्हाय हो आपल्याला त्यामुळे कानफ्युजन झाले.

अजुन एक शंका :- सदर काकू लेखकास ह्या विधानाद्वारे पुरुष जमातीचा उदो उदो करायचा आहे काय ?

अहिरावण's picture

17 May 2024 - 10:10 am | अहिरावण

अरुंधती रॉय आणि मेधा पाटकर एकाच मापाने तोलता येतील काय?

कांदा लिंबू's picture

17 May 2024 - 10:19 am | कांदा लिंबू

अरुंधती रॉय आणि मेधा पाटकर एकाच मापाने तोलता येतील काय?

उडदांमाजी काळेगोरे |
काय निवडावे निवडणारे |
कुचलिया वृक्षांची फळे |
मधुर कोठोनी असतील ||

अहिरावण's picture

17 May 2024 - 10:23 am | अहिरावण

अन्नासाठी* दाही "देशा"
आम्हा फिरविसी जगदीशा
फिरुन येता आपुल्या देशा
आंदोलना गर्दी ना येई

* प्रत्येकाचे अन्न वेगळे असते. काही सदावर्ती धान्य घेऊन रांधतात, काही मोल देऊन आयते खातात, काही खात्यात फंड गोळा करतात.