नजर

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
23 Aug 2011 - 12:57 pm

आज निजूनि उठलो
अन जाणवले स्पष्ट दिसत नाही
जवळचेच दिसते आहे फक्त
नि लांब चे कळतच नाही

जवळच ठेवलेली वही, पेन, घड्याळ
वर्तमान पत्र आजचे
सर्व काही दिसते आहे, पण
उद्याचा अंक काही दिसत नाही!

नेमके काय घडले आहे
कळंत नाहि मज
सकुंचित नजर झाली माझी
कि आकुंचल्या जवळील गोष्टी!!

कविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

23 Aug 2011 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

आज निजूनि उठलो
अन जाणवले स्पष्ट दिसत नाही
जवळचेच दिसते आहे फक्त
नि लांब चे कळतच नाही.....:bigsmile: हे कडवं वाचुन मनात एकच विचार आला,,,,रात्री कीती 'टाकली' व्हती? :wink:

ह... घेणे...:smile:

मिश्किल प्रतिक्रिये बद्दल आपले स्वागतच आहे!

पाषाणभेद's picture

26 Aug 2011 - 8:13 am | पाषाणभेद

"जवळच ठेवलेली वही, पेन, घड्याळ
वर्तमान पत्र आजचे
सर्व काही दिसते आहे, पण
उद्याचा अंक काही दिसत नाही!"

कविता वर्तमान काळातली आहे तर मग 'उद्याचा अंक' भविष्यकाळ आहे. तर मग 'उद्याचा अंक काही दिसणार नाही!'
असे हवे होते का?

प्रकाश१११'s picture

26 Aug 2011 - 9:24 am | प्रकाश१११

निनाव -कविता छान नि बरीचशी गूढ आहे.
विचार करणारी किंवा विचार करायला लावणारी ..