जगदीश खेबुडकर कालवश......

मनराव's picture
मनराव in जनातलं, मनातलं
4 May 2011 - 10:27 am

महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, गीतकार श्री. जगदीश खेबूडकर (१० मे १९३२ - ३ मे २०११ ) यांचे मंगळवार दुपारी सव्वा दोन वाजता निधन झाले.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या बद्द्ल काही अधिक माहिती असल्यास धाग्यावर टाकावी............

समाजबातमी

प्रतिक्रिया

हो आत्ताच वाचली ही बातमी. फार वाइट वाटल. कोल्हापुरच्या प्रायव्हेट हायस्कुल मध्ये शिकवायचे ते. काय एकेक अप्रतिम गाणी दिली त्यांनी आपल्याला! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!!

__/\__

विनायक पाचलग's picture

4 May 2011 - 8:59 pm | विनायक पाचलग

मोठा माणुस ...
काही दिवसापुर्वी कॉलेजच्या स्नेहसमेलनाला आले होते , ओळख झाली होती .. आता , उरल्या फक्त आठवणी ...
सलाम...

प्यारे१'s picture

4 May 2011 - 11:01 am | प्यारे१

ईश्वर मृतात्म्यास सद्गति देवो.

रुपी's picture

4 May 2011 - 11:12 am | रुपी

सध्या काही आठवडे सकाळ मध्ये त्यांची लेख माला येत होती. त्यात बर्‍याच चित्रपट / गाण्यांबद्दलच्या आठवणी आहेत. ही बातमी वाचून त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. बातमीच्या शेवटी त्यांच्या सर्व लेखांचा दुवा पण दिला आहे.

रामदास's picture

4 May 2011 - 11:08 am | रामदास

जन्मभरी तो जळतच होता.
फुले तयावर उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतच होता.

ज्येष्ठ कवी व प्रसिद्ध गीतकार "जगदीश खेबुडकर" यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

नि३सोलपुरकर's picture

4 May 2011 - 12:01 pm | नि३सोलपुरकर

एक उत्तम कवी /गीतकार काळाच्या पड्दयाआड गेला..
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!!

धमाल मुलगा's picture

4 May 2011 - 12:13 pm | धमाल मुलगा

त्यांच्या लावण्या, आणि त्या लावण्यांमागचे अर्थवाही शब्द.. साध्या, ग्रामिण ढंगाच्या बोलीतूनही उत्तम साहित्य कसे होऊ शकते ह्याचं उदाहरणच.

खेबुडकरांना भावपुर्ण श्रध्दांजली.

स्वाती दिनेश's picture

4 May 2011 - 12:25 pm | स्वाती दिनेश

जगदीश खेबुडकरांना भावपुर्ण श्रध्दांजली!
स्वाती

हे मिडीया वाले नक्को त्या ओसामाला एवढा कवरेज देतात अन गुणी , मनस्वी जगदीश खेबुडकरांसाठी मात्र छोटासा कवरेज देतात :-(
'साधी माणसं ' , 'पिंजरा' या चित्रपटातील त्यांची गाणी अप्रतिम, रचना कधीही न विसरता येणारी !!
___/\____

किसन शिंदे's picture

4 May 2011 - 2:32 pm | किसन शिंदे

".....आणि या गीताची रचना आहे जगदीश खेबुडकर यांची."
आकाशवाणीवर बरयाच वेळा ऐकलेले हे शब्द.

भावपूर्ण श्रद्धांजली.

स्मिता.'s picture

4 May 2011 - 2:35 pm | स्मिता.

जगदीश खेबुडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

काय-काय सुरेख गाणी दिली होती त्यानी...

चिगो's picture

4 May 2011 - 5:38 pm | चिगो

अनेक सुरेख गाणी आणि कविता रचणार्‍या खेबुडकरांना भावपुर्ण श्रद्धांजली...

नानांना भावपूर्ण श्रद्धांजली.

विकास's picture

4 May 2011 - 8:45 pm | विकास

श्रद्धांजली...
टाईम्समधील आणि इ-सकाळ वृत्ताप्रमाणे, गांधीहत्येच्या धक्क्याने १६ वर्षीय खेबुडकरांनी पहीली कविता (मानवते, तू विधवा झालीस) लिहीली. त्यांनी एकून ३५०० कविता, २५ कथा आणि पाच नाटके लिहीली असे टाईम्सने म्हणले आहे.

खेबुडकरांची काही गाणी: (कुठल्याही प्रमुख मराठी वृत्तपत्रात पटकन दिसली नाहीत.)

बाई बाई मन मोराचा
धुंद एकांत हा
ऐरणीच्या देवा तुला
चंद्र आहे साक्षीला
विठू माउली तू
सख्या रे घायाळ मी हरीणी
धुंदी कळ्यांना
आज प्रितीला पंख हे लाभले
मी आज फूल झाले
स्वप्नात रंगले मी
स्वप्नात साजणा येशील का
नाचू कशी, लाजू कशी कंबर लचकली
पिंजर्‍यातील गाणी
....

सुनील's picture

5 May 2011 - 12:14 am | सुनील

पिंजर्‍यातील गाणी
तुम्हाला पिंजरा ह्या चित्रपटातील गाणी असे म्हणायचे आहे, असे गृहित धरतो! (ह्.घ्या)

खेबूडकरांना श्रद्धांजली.

त्यांनी चित्रपटातील गाण्यांव्यतिरिक्त काही काव्यरचना केल्या आहेत काय, ह्याची माहिती मिळाली नाही.

पाषाणभेद's picture

5 May 2011 - 2:04 am | पाषाणभेद

नाना जरी गेले असले तरी त्यांनी लिहीलेल्या अविट गीतांच्या माध्यमातून नेहमीच आठवत राहतील.
त्यांना भावपुर्ण आदरांजली.

टुकुल's picture

5 May 2011 - 5:00 am | टुकुल

अप्रतीम गाण्यांचा साठा ठेवुन गेले नाना.

भावपुर्ण श्रध्दांजली.

--टुकुल.