महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, गीतकार श्री. जगदीश खेबूडकर (१० मे १९३२ - ३ मे २०११ ) यांचे मंगळवार दुपारी सव्वा दोन वाजता निधन झाले.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या बद्द्ल काही अधिक माहिती असल्यास धाग्यावर टाकावी............
हो आत्ताच वाचली ही बातमी. फार वाइट वाटल. कोल्हापुरच्या प्रायव्हेट हायस्कुल मध्ये शिकवायचे ते. काय एकेक अप्रतिम गाणी दिली त्यांनी आपल्याला! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!!
__/\__
सध्या काही आठवडे सकाळ मध्ये त्यांची लेख माला येत होती. त्यात बर्याच चित्रपट / गाण्यांबद्दलच्या आठवणी आहेत. ही बातमी वाचून त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. बातमीच्या शेवटी त्यांच्या सर्व लेखांचा दुवा पण दिला आहे.
त्यांच्या लावण्या, आणि त्या लावण्यांमागचे अर्थवाही शब्द.. साध्या, ग्रामिण ढंगाच्या बोलीतूनही उत्तम साहित्य कसे होऊ शकते ह्याचं उदाहरणच.
खेबुडकरांना भावपुर्ण श्रध्दांजली.
हे मिडीया वाले नक्को त्या ओसामाला एवढा कवरेज देतात अन गुणी , मनस्वी जगदीश खेबुडकरांसाठी मात्र छोटासा कवरेज देतात :-(
'साधी माणसं ' , 'पिंजरा' या चित्रपटातील त्यांची गाणी अप्रतिम, रचना कधीही न विसरता येणारी !!
___/\____
श्रद्धांजली...
टाईम्समधील आणि इ-सकाळ वृत्ताप्रमाणे, गांधीहत्येच्या धक्क्याने १६ वर्षीय खेबुडकरांनी पहीली कविता (मानवते, तू विधवा झालीस) लिहीली. त्यांनी एकून ३५०० कविता, २५ कथा आणि पाच नाटके लिहीली असे टाईम्सने म्हणले आहे.
खेबुडकरांची काही गाणी: (कुठल्याही प्रमुख मराठी वृत्तपत्रात पटकन दिसली नाहीत.)
बाई बाई मन मोराचा
धुंद एकांत हा
ऐरणीच्या देवा तुला
चंद्र आहे साक्षीला
विठू माउली तू
सख्या रे घायाळ मी हरीणी
धुंदी कळ्यांना
आज प्रितीला पंख हे लाभले
मी आज फूल झाले
स्वप्नात रंगले मी
स्वप्नात साजणा येशील का
नाचू कशी, लाजू कशी कंबर लचकली
पिंजर्यातील गाणी
....
पिंजर्यातील गाणी
तुम्हाला पिंजरा ह्या चित्रपटातील गाणी असे म्हणायचे आहे, असे गृहित धरतो! (ह्.घ्या)
खेबूडकरांना श्रद्धांजली.
त्यांनी चित्रपटातील गाण्यांव्यतिरिक्त काही काव्यरचना केल्या आहेत काय, ह्याची माहिती मिळाली नाही.
हो आत्ताच वाचली ही बातमी. फार
भावपुर्ण श्रद्धांजली
In reply to हो आत्ताच वाचली ही बातमी. फार by स्पंदना
भावपूर्ण श्रद्धांजलि.
हो.. खूपच वाईट झालं
शव कविचे जाळू नका हो
ज्येष्ठ कवी व प्रसिद्ध गीतकार
न भरुन येणारी पोकळी
:(
श्रध्दांजली
गुणी , मनस्वी गीतकारास भावपूर्ण श्रध्दांजली!
".....आणि या गीताची रचना आहे
श्रद्धांजली
श्रद्धांजली..
नानांना भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली...
आदरांजली
नाना जरी गेले असले तरी
हेच म्हणतो..
In reply to नाना जरी गेले असले तरी by पाषाणभेद