Skip to main content

जगदीश खेबुडकर कालवश......

जगदीश खेबुडकर कालवश......

Published on 04/05/2011 - 10:27 प्रकाशित मुखपृष्ठ
महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, गीतकार श्री. जगदीश खेबूडकर (१० मे १९३२ - ३ मे २०११ ) यांचे मंगळवार दुपारी सव्वा दोन वाजता निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या बद्द्ल काही अधिक माहिती असल्यास धाग्यावर टाकावी............
लेखनप्रकार

याद्या 3883
प्रतिक्रिया 18
हो आत्ताच वाचली ही बातमी. फार वाइट वाटल. कोल्हापुरच्या प्रायव्हेट हायस्कुल मध्ये शिकवायचे ते. काय एकेक अप्रतिम गाणी दिली त्यांनी आपल्याला! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!! __/\__

In reply to by स्पंदना

मोठा माणुस ... काही दिवसापुर्वी कॉलेजच्या स्नेहसमेलनाला आले होते , ओळख झाली होती .. आता , उरल्या फक्त आठवणी ... सलाम...

सध्या काही आठवडे सकाळ मध्ये त्यांची लेख माला येत होती. त्यात बर्‍याच चित्रपट / गाण्यांबद्दलच्या आठवणी आहेत. ही बातमी वाचून त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. बातमीच्या शेवटी त्यांच्या सर्व लेखांचा दुवा पण दिला आहे.

एक उत्तम कवी /गीतकार काळाच्या पड्दयाआड गेला.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!!

त्यांच्या लावण्या, आणि त्या लावण्यांमागचे अर्थवाही शब्द.. साध्या, ग्रामिण ढंगाच्या बोलीतूनही उत्तम साहित्य कसे होऊ शकते ह्याचं उदाहरणच. खेबुडकरांना भावपुर्ण श्रध्दांजली.

हे मिडीया वाले नक्को त्या ओसामाला एवढा कवरेज देतात अन गुणी , मनस्वी जगदीश खेबुडकरांसाठी मात्र छोटासा कवरेज देतात :-( 'साधी माणसं ' , 'पिंजरा' या चित्रपटातील त्यांची गाणी अप्रतिम, रचना कधीही न विसरता येणारी !! ___/\____

".....आणि या गीताची रचना आहे जगदीश खेबुडकर यांची." आकाशवाणीवर बरयाच वेळा ऐकलेले हे शब्द. भावपूर्ण श्रद्धांजली.

जगदीश खेबुडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली! काय-काय सुरेख गाणी दिली होती त्यानी...

अनेक सुरेख गाणी आणि कविता रचणार्‍या खेबुडकरांना भावपुर्ण श्रद्धांजली...

श्रद्धांजली... टाईम्समधील आणि इ-सकाळ वृत्ताप्रमाणे, गांधीहत्येच्या धक्क्याने १६ वर्षीय खेबुडकरांनी पहीली कविता (मानवते, तू विधवा झालीस) लिहीली. त्यांनी एकून ३५०० कविता, २५ कथा आणि पाच नाटके लिहीली असे टाईम्सने म्हणले आहे. खेबुडकरांची काही गाणी: (कुठल्याही प्रमुख मराठी वृत्तपत्रात पटकन दिसली नाहीत.) बाई बाई मन मोराचा धुंद एकांत हा ऐरणीच्या देवा तुला चंद्र आहे साक्षीला विठू माउली तू सख्या रे घायाळ मी हरीणी धुंदी कळ्यांना आज प्रितीला पंख हे लाभले मी आज फूल झाले स्वप्नात रंगले मी स्वप्नात साजणा येशील का नाचू कशी, लाजू कशी कंबर लचकली पिंजर्‍यातील गाणी ....

पिंजर्‍यातील गाणी तुम्हाला पिंजरा ह्या चित्रपटातील गाणी असे म्हणायचे आहे, असे गृहित धरतो! (ह्.घ्या) खेबूडकरांना श्रद्धांजली. त्यांनी चित्रपटातील गाण्यांव्यतिरिक्त काही काव्यरचना केल्या आहेत काय, ह्याची माहिती मिळाली नाही.

नाना जरी गेले असले तरी त्यांनी लिहीलेल्या अविट गीतांच्या माध्यमातून नेहमीच आठवत राहतील. त्यांना भावपुर्ण आदरांजली.