लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
13 May 2008 - 4:06 pm

आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो.

तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते.... पुढच्या दृश्यात असे कळते की आदिने त्याची आणि ऋताची एक तो तिच्यावर जबरदस्ती करत असतानाची व्हिडिओ क्लिप तिच्या नकळत मोबाईलवरती शूट केली होती आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे ती क्लिप मोबाईलमधून सगळीकडे पसरलेली आहे.... लहान पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण (विकृत ) आनंदात ती क्लिप पाहत आहेत...या काळात आदिचे मित्र त्याला शिव्या घालून सोडून जातात....एक मैत्रिण फ़क्त ( का कोण जाणे ) त्याला समजून घ्या असे म्हणते. मग ऋता बाहेरगावाहून येते , तिला समजते , ती धैर्याने परिस्थितीशी सामना करते, रडारड करत नाही.... फ़क्त आदिला एकदा विचारेन म्हणते की तू असे का केलेस?... मग आदि शेवटी तिच्यासमोर म्हणतो, की मी सरेंडर करेन., माझी चूक झाली...ती निघून जाते आणि हा रडत राहतो तेव्हा नाटक संपते.

ही एकांकिका मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाहिली....त्यानंतर २००७ सालच्या अनेक स्पर्धांमध्ये या एकांकिकेने पहिली / दुसरी पारितोषिके मिळवली..
अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते.

१. आता हा पोरगा आपल्या गर्लफ़्रेंडवर फ़ोर्स करणार , तिच्या नकळत त्याचे चित्रीकरण करणार आणि वर निष्काळजीपणे ते स्प्रेड होऊ देणार , आणि शेवटी सहानुभूतीची अपेक्षा करत राहणार..( रडणार, मित्र सोडून गेल्यामुळे कसा त्याच्यावर अन्याय झालाय असा अभिनय दाखवणार)
या असल्या क्रिमिनल माणसाला कसली सहानुभूती देता ? त्याची लायकी फ़टकावून काढून पोलीसात द्यायचीच आहे.....
____ म्हणजे त्यांना लग्नापूर्वी संबंध ठेवायचे आहेत की नाही, त्याचे चित्रीकरण करून दोघांनी एकत्र पहायची त्यांची सवय आहे की नाही हा त्यांच्या सेक्शुअल प्रेफ़रंसेस चा वैयक्तिक भाग झाला....

पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले...

२. मला तर ही एका पर्वर्ट बलात्कार्‍याची गोष्ट वाटली.... जो कांगावा करतोय की चुकून क्लिप स्प्रेड झाली, मी खरंतर ती क्लिप माझ्यासाठी बनवली होती..... आता या मुख्य पात्राला सहानुभूती देणारी पुढची सगळी गोष्ट ( बिचार्‍याला सगळे मित्र बोलून सोडून चालले रे..) पाहून मला वाटत राहिले, की बाबा आम्हाला आता कळणार आहे की याने चूक केलेली नाही, काहीतरी गैरसमज होता वगैरे... तसले काही घडत नाही...
मग असल्या ट्रीट्मेंट ने आम्हाला इतका वेळ कशाला येडा बनवले?

३. मग एखाद्या बलात्कार्‍याची गोष्ट नसते का? असू शकते, पण इतक्या सहानुभूतीचे कारण काय?
उलट ऎंटी हीरो चे सिनेमे असतात त्यांचा आलेख वाईट कृत्य, कारणमीमांसा आणि शिक्षा असाच असतो... तसंही इथे कुठे दिसत नाही... उलट ती दुसरी मैत्रीण सोडून जाणार्‍या मित्रांना " अरे त्याला समजून घ्या " स्टाईलचा सूर लावते तेव्हा डोके चक्रावते.

४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते.... ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला पाहिजे?

५. बरं एवढा नीच माणूस आहे तो तर मग त्याला त्या प्रमाणात वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्टट्ट शिक्षा तरी मिळायला हवी की नको? ते ही नाही...तो रडत राहतो आणि नाटक संपते.म्हणजे नाटकाचा प्रिमाईस / वन लाईन स्टोरी काय तर बलात्कार करा, क्लिप काढा पण स्प्रेड होऊ देऊ नका नाहीतर मित्र सोडून जातील ...

या माझ्या शंकांबद्दल मी त्या नाटकाच्या टीममध्ये असलेल्या एका मुलीशी जालावर चर्चा केली... , त्यात तिचे म्हणणे असे होते की आदिने एक छोटीशी चूक केली आहे, तो वाईट नाही..आणि ती स्वत:साठी बनवलेली क्लिप स्प्रेड झाली हे चुकले, मग त्याचा मोठा गुन्हा झाला, त्याची तो पोलिसांना सरेंडर करून शिक्षा भोगणारच आहे......
मी उडालोच..तो वाईट नाही? स्वत: एक मुलगी असूनही प्रेयसीवरती जबरदस्तीने संबंध ठेवून नकळत क्लिप काढणारा माणूस ( प्रत्यक्ष आयुष्यात आपला बॊय्फ़्रेंड असो किंवा जानी दोस्त असो), नीच प्रवृत्तीचा आहे हे तिला जाणवू नये? . तिलाच काय माझ्याबरोबर एकांकिका पाहणाया बर्‍याचशा लोकांना हे जाणवलेच नाही.... परीक्षकांनीही या एकांकिकेला भरपूर बक्षिसे दिली...
कॊलेजची पोरे तर या एकांकिकेने भारावून वगैरे गेली होती...
अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो..

खरं सांगतो, मी ज्या ज्या कॉलेजियन्स ना या एकांकिकेबद्दल विचारले, ते लोक बॉयफ़्रेंड गर्लफ़्रेंड मंडळींनी एकमेकांच्या क्लिप्स मोबाईलवरून तयार करणे या संकल्पनेला इतके सरावलेले वाटले, की मला आधी भीती वाटली आणि मग माझे फ़ार वय झाले आहे असे वाटले.... उद्या कॊलेजच्या रंगमंचावर बलात्काराचे कौतुक करणारी आणि जस्टिफ़ाय करणारी नाटके दिसली तर नवल वाटायला नको, असा टिपिकल वय झाल्याची जाणीव करून देणारा विचार मनात आला खरा...( आजची तरूण मुले म्हणजे ना.......).. ( अरे बापरे, माझा प्रवीण दवणे झाला की काय?या विचाराने अजून भीती वाटली.. )

नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे....
असो...
पुण्यातल्या लोकांपैकी इथे पाहिले का हो कोणी हे नाटक?
( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)...

साहित्यिकसमाजमौजमजाविचारप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

13 May 2008 - 4:16 pm | आनंदयात्री

ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का?

नाही कारण वर लेखात म्हटल्याप्रमाणे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, हा सोडुन बाकी मुद्यांशी सहमत.

भडकमकर मास्तर's picture

13 May 2008 - 4:50 pm | भडकमकर मास्तर

दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत
म्हणून केली गेलेली जबरदस्ती दुर्लक्षणीय ठरते?मला नाही वाटत...
उलट लग्नापूर्वी हा भाई असा वागतो, माझ्या मतांना याच्या लेखी काडीची किंमत नाही, तर नंतर कसा वागेल...असा विचार येऊन मी असल्या बॉयफ्रेंडला अगदी लई वेळा लाथ घातली असती...
... असो...
मात्र "प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते" असं मानण्याचा एखाद्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे, तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा माझा हेतू नाही...
( स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता) भडकमकर

आनंदयात्री's picture

13 May 2008 - 4:55 pm | आनंदयात्री

"प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते"

=)) =)) =)) =)) ... लै लै भारी मास्तर ...

ऋचा's picture

13 May 2008 - 4:35 pm | ऋचा

प्रेम म्हणजे जबरदस्ती नाही.
आणि जर त्यांचं प्रेम होतं तर त्यात जबरदस्ती येऊच नये.

धमाल मुलगा's picture

13 May 2008 - 4:56 pm | धमाल मुलगा

गेली कित्येक वर्षं आम्ही असा येक बाळबोध विचार मनी धरून होतो की हे असे विषय ही समांतर आणि विद्रोही वाल्यांची मक्तेदारी आहे. तिथे विकृत मनोवृत्तीचं उदात्तिकरण केलेलं चालतं, भडक भावना रंगवून रंजक(!) करण्याची हातोटीही तिकडचीच.

मागे एकदा, स्पर्धेसाठी करावी म्हणून एक एकांकिका (नाव आठवत नाही आता..) वाचली आणि झीट येऊन पडलो.
त्यात एक चौकोनी कुटुंब असतं, बाप चिक्कार पैसा मिळवायला आखातात गेलेला, आई पार्ट्या झोडत हिंडतेय, आणि लफडी करतही...

एकदा तो प्रकार त्यांची मुलगी पाहते आणि सुरुवातीला रडते, मग भावाशी बोलते...त्यांचे आधूनिक विचार ऐकून आपण अश्मयुगिन असल्याची भावना वाढीस लागते...तिथेच ब्लॅक आउट ची कंसातली सुचना..आणि मग दोघं बहिण-भाऊ भेसुर चेहर्‍याने एकमेकांकडे पाहताहेत....कारण काय तर बंधूंनी हा आधुनिक विचार बहिणीला फारच सखोल समजावलेला असतो....
मग हे घरी कळणं...एकमेकांना दोष देणं...आणि प्रत्येकानं आपापल्या भूमिकेचं समर्थन करणं........

धन्य झालो होतो वाचूनच...करायला घ्यायची हिंमतच नाही झाली!

त्यापुढे हे लिटिल बॉय तर काय चीज आहे हो?

भडकमकर मास्तर's picture

13 May 2008 - 5:02 pm | भडकमकर मास्तर

धमाल्या , आम्हाला आपली नुसती झलक वाचूनच झीट आली...
बाप रे...
याच्यापुढे अगदीच लिटील बॉय आहे ही म्हणजे....

इनोबा म्हणे's picture

13 May 2008 - 5:13 pm | इनोबा म्हणे

धमाल्या , आम्हाला आपली नुसती झलक वाचूनच झीट आली...
बाप रे...
याच्यापुढे अगदीच लिटील बॉय आहे ही म्हणजे....

हेच म्हणतो....

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा's picture

13 May 2008 - 5:38 pm | धमाल मुलगा

मास्तर, इनोबा,
तो लेखक इतका भारी होता, की बरेच दिवस त्याचे ते विचार डोक्यात घोळत होते! अतिरेक्यांना जसं धार्मिक शिक्षण देऊन ब्रेनवॉशिंग केलं जातं तसं काहीसं व्हायला लागलं होतं...नशीब, लवकर डोकं ताळ्यावर आलं नाहीतर जनावरात जमा व्हायची लक्षणं दिसायला लागली होती.

पण काय साल्यानं ठासून मुद्दे मांडले होते...आठवलं तरी आता गरगरायला होतं

राजे's picture

13 May 2008 - 5:43 pm | राजे (not verified)

लवकर डोकं ताळ्यावर आलं नाहीतर जनावरात जमा व्हायची लक्षणं दिसायला लागली होती.

8}

माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही ;)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

धमाल मुलगा's picture

13 May 2008 - 5:52 pm | धमाल मुलगा

राजे...

सुखी आहात....

हल्ली प्रायोगिक च्या नावाखाली काय काय चाललंय ह्याची सुदैवानं मलाही फारशी कल्पना नाही!
आणि दुर्दैवानं माझी प्रायोगिकची खाज परत जोर धरायला लागली आहे...त्यात असं माझ्या डोक्याला सारखं तोच तो विचार देऊन तेल ओतायचं काम आमचे भडकमकर मास्तर मोठ्या नेटानं करताहेत....

मराठी रंगभूमीचं दुर्दैव, दुसरं काय !!!
(हे दुर्दैव आम्ही स्वतःच्या अस्तित्वाबद्दल म्हणतोय, मास्तरांचं काम बरंच उत्तम आणि मोठं आहे. त्यांचा आणि ह्या दुर्दैवाचा काडीमात्र संबंध लावण्यात येऊ नये, ही विनंती)

"राजा ओयदीपौस"(राजा एडिपस) ह्या नाटकाची.
काय धमाल्या, आठवतय ना?
नै, रंगभुमेवर वावरलेला दिसतोस, म्हणुन विचारतोय.(त्याविषयी ह्या "सभ्य" लोकांत बोलायची हिम्मत होत नाहिये.)

आणि हो. ही असलीच घटना एम.पी मध्ये एका आदिवासी टोळक्यात प्रत्यक्षात घडली होती(५-७ वर्षं झाली असतील आता.).
मुळात "वंश शुद्धी" टिकावी म्हणुन केवळ स्वतःच्या सख्ख्या नातलगांपासुनच अपत्य प्राप्ती करण्याची
प्रथा काही "शाक्य" कुळात फार पुर्विपासुन होती.(अपत्य प्राप्ती मुख्यत्वे "भाउ-बहीण" ह्यातुन व्हायची.)(गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील अनेक कुळांपैकी एकाचा युवराज होता.)
त्यानंतर ती भारतात(विशेषतः पुर्व आणि मध्य भारतात आणि नेपाळ मध्ये) कित्येक राज घराणी पाळत होती.
(रामायणाच्या तिबेटी व्हर्जन मध्ये सीतेला रामाची बहीण व पत्नी मानतात!!)

ह्या गधड्यांना धड नाटक रचण्याची अक्कल नाहीये. आजकाल कोणीही मनुष्य असे जनावरासारखे आचरण करणार नाही.
पण ह्या बिनडोकांना तथाकथित "ज्वलंत" विषय मांडुन प्रसिद्धी मिळवायची (विरोध का असेना लोकांचा पण
ती दीपा मेहता नाही का प्रसिद्ध झाली "फायर " वगैरे मधुन.) होती, तर नीट "चुझ" तरी करायला हवी होती मांडणी.
म्हणजे, भारतिय इतिहासाचा दाखला दिला तर ह्यांना निदान पाठिंबा देणारी तीन्-चार तथाकथित पुरोगामी टाळकी तरी मिळाली असती.निदान माझा सल्ला घ्यायचा ह्यांनी की फुकटात बोंबाबोंब करण्याचे हम्खास मार्ग कुठले आहेत ह्याबद्दल...

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

आंबोळी's picture

14 May 2008 - 2:41 pm | आंबोळी

मुळात "वंश शुद्धी" टिकावी म्हणुन केवळ स्वतःच्या सख्ख्या नातलगांपासुनच अपत्य प्राप्ती करण्याची
प्रथा काही "शाक्य" कुळात फार पुर्विपासुन होती.(अपत्य प्राप्ती मुख्यत्वे "भाउ-बहीण" ह्यातुन व्हायची.)(गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील अनेक कुळांपैकी एकाचा युवराज होता.)
त्यानंतर ती भारतात(विशेषतः पुर्व आणि मध्य भारतात आणि नेपाळ मध्ये) कित्येक राज घराणी पाळत होती.
(रामायणाच्या तिबेटी व्हर्जन मध्ये सीतेला रामाची बहीण व पत्नी मानतात!!)

आयला असला प्रकार भारतात होता हे नविनच ऐकतोय..... रोमच्या राजघराण्यात हे प्रकार शुध्ध रक्तासाठी चालत असे ऐकले होते. पण असेच प्रकार भारतात असल्याचे इतके दिवस ऐकीवात नाही. व्यासानी जग उष्ट केल पण या प्रकाराला तोंड लावले नाही त्याअर्थी हा प्रकार भारतात नसावा असे वाटते.

मिपावरील इतिहासतज्ञ यावर प्रकाश टाकतील काय?

मन's picture

14 May 2008 - 3:41 pm | मन

थोडासा आठवतोय तो असा:-
रं. ना गायधनी ह्यांचे "यु पी एस सी"साठी वापरण्यात येणारे "प्राचीन भारताचा इतिहास"
ह्यात तेवढा इतिहास्स थोड्क्यात दिलाय.
ही पद्धत मुख्यत्वे होती तो भागः-
नेपाळ्,तिबेट्,त्यांच्या सीमेलगतचा आजच्या भारतातील भाग(मुख्यत्वे छोटी छोटी राज्ये आणि काही गणराज्ये)
षोडश् महाजन पदांपैकी इतरांचा ह्या प्रथेला कठोर विरोध होता.
(पुढे त्यांचेच म्हणणे टिकले, आणि ह्या प्रथा जवळ जवळ संपुर्ण बंद झाल्या.)

हवं तर ह्यासाठी इतिहास वाल्या मंडळींनी नवीन धागा सुरु करावा.
(नक्क्की आठवत नाहिये, पण यम्-यमी का असलीच कुठलितरी आणखी एक भारतीय आख्यायिका तिबेट मध्ये
नवरा-बायको हे नातेही धारण करते.(जी आपल्याकडे भाउ-बहीण आहे.)
)

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

मनस्वी's picture

13 May 2008 - 5:28 pm | मनस्वी

मी पण अशीच एक भयंकर एकांकीका पुरुषोत्तमला पाहिली होती.

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 5:04 pm | विसोबा खेचर

नमस्कार मास्तर,

परिक्षणवजा लेख खूप चांगला वाटला.

अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो..

अगदी खरं आहे!

नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे....

पूर्णत: सहमत आहे.

( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)...

मास्तर, आपल्या मनातले विचार,तळमळ, चिडचिड आपण या निमित्ताने मनमोकळेपणाने मिपावर व्यक्त केलीत हे बरेच झाले! मिपा त्याकरताच आहे! अजूनही असेच आपल्या मनातील विचार मिपावर व्यक्त होऊ द्या, ही विनंती!

अवांतर - या नाटकाशी संबंधित मंडळींनी हे लेखन आवर्जून वाचावे असे वाटते!

तात्या.

राजे's picture

13 May 2008 - 5:34 pm | राजे (not verified)

मास्तर, आपल्या मनातले विचार,तळमळ, चिडचिड आपण या निमित्ताने मनमोकळेपणाने मिपावर व्यक्त केलीत हे बरेच झाले! मिपा त्याकरताच आहे! अजूनही असेच आपल्या मनातील विचार मिपावर व्यक्त होऊ द्या, ही विनंती!

सहमत १००%

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मनस्वी's picture

13 May 2008 - 5:11 pm | मनस्वी

या एकांकीचे नाव "लिटल बॉय"??

काही आंतर महाविद्यालयीन एकांकीका खरंच दिव्य असतात.
त्यांना दाखवून द्यायचे असते की - आम्ही किती सखोल / बदलत्या समाजानुरुप / परिस्थितीचा किती बारकाईने अभ्यास करतो / पुढच्या शतकाला शोभणारे (त्यांच्या मते) विचार कसे आत्ताच मांडू शकतो - काय देव जाणे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2008 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर,
एकांकिकेतील विषयाच्या बाबतीत आपल्या मताशी सहमत आहे.

त्यांना दाखवून द्यायचे असते की - आम्ही किती सखोल / बदलत्या समाजानुरुप / परिस्थितीचा किती बारकाईने अभ्यास करतो / पुढच्या शतकाला शोभणारे (त्यांच्या मते) विचार कसे आत्ताच मांडू शकतो -

एकदम बरोबर !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेताळ's picture

13 May 2008 - 6:10 pm | वेताळ

जबरदस्ती करताना त्याचे भ्रमणध्वनी वर चलतचित्रण कसे काय करता येईल? आईला, माझा डो़क्याचा पार भुगा झाला आहे विचार करुन. एक तर तिला त्याची जबरदस्ती आवडली असावी म्हणुन तीने चित्रिकरणाला परवानगी दिली असावी. परंतु त्या चित्रिकरणा चा प्रसार फुकट अन तीच्या अनुमती शिवाय केल्याबद्दल तिला त्याचा राग आला असावा.मास्तर आपणास ह्या एकांकिकेच्या लेखक महाशयाचे नाव ठाउक आहे का? भेटुन चलतचित्रण कसे केले समजाउन घेतले असते.

वेताळ.

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

13 May 2008 - 6:14 pm | डॉ. श्लोक _भातखंडे

मोबाईल दूरवर ठेवून आधीच नीट अँगल ऍडजस्ट करून हे शक्य आहे असे आम्हाला वाटते...हो की नाही मास्तर?

भडकमकर मास्तर's picture

13 May 2008 - 6:19 pm | भडकमकर मास्तर

होय हो, शक्य आहे...

भडकमकर मास्तर's picture

13 May 2008 - 6:18 pm | भडकमकर मास्तर

परंतु त्या चित्रिकरणा चा प्रसार फुकट अन तीच्या अनुमती शिवाय केल्याबद्दल तिला त्याचा राग आला असावा
=)) =)) =))

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

13 May 2008 - 6:11 pm | डॉ. श्लोक _भातखंडे

मी पाहिली ती एकांकिका...
आम्हाला आवडली होती पाहून...पण तेव्हा एवढा विचार नव्हता केला मी...
असो...भडकमकरांचे विचार पटले ..
अवांतर सूचना : या कॉलेजातल्या पोरांचं काय हो, इतके मनावर घेऊ नका सर...

भडकमकर मास्तर's picture

13 May 2008 - 6:22 pm | भडकमकर मास्तर

सूचनेबद्दल धन्यवाद...
....आणि तेव्हा नाही जाणवले, निदान आता तरी आमचे विचार पटले हे पाहून बरे वाटले...

शितल's picture

13 May 2008 - 6:11 pm | शितल

>> पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले...
एकदम सहमत.
गुन्हाला शिक्षा ही आलीच.

प्रियकर -प्रेयसीच्या नात्यात जबरदस्तीला स्थान असुच नये, त्यामुळे प्रेमाचे स्थान दुय्य्म होते,
आणि मग त्यात वासना शिरल्यासारखी वाटते.

वेताळ's picture

13 May 2008 - 6:52 pm | वेताळ

ही एकांकिका सु(?)प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट वर बेतल्याची वाटते.तो प्रियकर व महेश भट्ट ह्याच्यात साम्य आढळते.तेही आपल्या सर्व चित्रपटात प्रेयसीला नैसर्गिक अवस्थेत लोकाना दाखवायला उत्सुक असतात.
वेताळ.

भडकमकर मास्तर's picture

14 May 2008 - 12:08 am | भडकमकर मास्तर

तेही आपल्या सर्व चित्रपटात प्रेयसीला नैसर्गिक अवस्थेत लोकाना दाखवायला उत्सुक असतात.

पण फरक इतकाच की ती नटी कोणते कपडे घालत आहे किंवा कोणते कपडे घालत नाहीये याची तिला पूर्ण कल्पना असते...
मला वाटते, इथे तिच्या नकळत शूटिंग करणे हा विषय चालू आहे ,...
असो...

एकांकिकेचे नाव द्यायला लेखक महाशय जरासे चुकले आहेत असे वाटते.
नाव हवे होते 'सटल प्ले बॉय'!

बाकी असल्या एकांकिका लिहिणारे आणि त्याला बक्षिसे वगैरे देणारे असल्यावर म्या पामराने बोलण्यासारखे काही नाही!

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

14 May 2008 - 12:01 am | भडकमकर मास्तर

'सटल प्ले बॉय'!
=D> =D> =D>
रंगदेवता आणि रसिकप्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत,
एक काळाच्या पुढचं तरूणाईचं नाटक

'सटल प्ले बॉय'!

टाळ्या टाळ्या.... :O) :O) :O)

प्रभाकर पेठकर's picture

13 May 2008 - 8:16 pm | प्रभाकर पेठकर

श्री. भडकमकर मास्तर,
आपल्या सर्व मतांशी मी सहमत आहे. प्रस्थापितांविरूद्ध बंड करणे म्हणजे 'मॉड' पणा हे समीकरण खूप जणांच्या डोक्यात असतं. त्याच मुळे प्रस्थापित संस्कार, नीतीमुल्ये पायदळी तुडवून नेमके त्या विरूद्ध वागणे म्हणजे आपले सुधारलेपण असे मानणारा गट असतो. ही एकांकिका अशा विकृत विचारांचेच अपत्य वाटते आहे.

दोघे कितीही प्रेमात पडले तरीही आपल्या प्रेमसंबंधांचे, शरीर संबंधांचे 'चित्रीकरण' करणे मनाला पटत नाही. त्यातून जोडीदाराच्या नकळत, म्हणजेच फसवून, चित्रिकरण करणे गंभीर गुन्हाच मानला पाहीजे. असे चित्रीकरण चुकून स्प्रेड होण्यामागे बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि जोडीदाराविषयी अनादर तर दिसून येतोच पण 'प्रेम' ह्या उच्च संकल्पनेलाही पायदळी तुडविल्याचे दिसून येते. इथे हे कृत्य करणार्‍याच्या मनात 'प्रेमभावने'पेक्षा शरीरसंबंध, त्याचे चित्रीकरण आणि ते मिटक्या मारीत पाहणे, एंजॉय करणे ही विकृत भावना प्रकर्षाने दिसून येते. अशा माणसाला समजून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कुठल्याही कोनातून हे कृत्य समर्थनीय वाटत नाही.

भडकमकर मास्तर's picture

14 May 2008 - 12:04 am | भडकमकर मास्तर

इथे हे कृत्य करणार्‍याच्या मनात 'प्रेमभावने'पेक्षा शरीरसंबंध, त्याचे चित्रीकरण आणि ते मिटक्या मारीत पाहणे, एंजॉय करणे ही विकृत भावना प्रकर्षाने दिसून येते. अशा माणसाला समजून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कुठल्याही कोनातून हे कृत्य समर्थनीय वाटत नाही.

काय बोललात काका...मस्त... B) B)

आंबोळी's picture

14 May 2008 - 12:17 am | आंबोळी

दोघे कितीही प्रेमात पडले तरीही आपल्या प्रेमसंबंधांचे, शरीर संबंधांचे 'चित्रीकरण' करणे मनाला पटत नाही. त्यातून जोडीदाराच्या नकळत, म्हणजेच फसवून, चित्रिकरण करणे गंभीर गुन्हाच मानला पाहीजे. असे चित्रीकरण चुकून स्प्रेड होण्यामागे बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि जोडीदाराविषयी अनादर तर दिसून येतोच पण 'प्रेम' ह्या उच्च संकल्पनेलाही पायदळी तुडविल्याचे दिसून येते.
पेठकर साहेब तुमचे विचार योग्यच आहेत. आणि माझे त्याविषयी अजिबात दुमत नाही.
तरी
"प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते"(या वाक्याबद्दल मास्तराना दंडवत) च्या धरतीवर "ह्यानी केलेली जबरदस्ती ४ चौघाना दाखवल्यशिवाय मला बाई चैनच पडत नाही" अशी मानसिकता असेल तर कसला आलाय बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि अनादर? ही तर श्वान योनीची लक्षणे.(अधिक माहीतीसाठी भेटा अगर लिहा "धोंडोपंत").

बाकी भडकमकर मास्तरानी आपली केस एकदम स्ट्राँग उभी केली आहे..... त्यामुळे अता नाटक बघायला गेलो तरी ते मास्तरांच्या चष्म्यातूनच पाहीले जाणार..... असो.

पण लोक ती एकांकीका पाहुन भारावले म्हन्जे कलाकारानी उत्तम काम करुन कथेतील उणिवा झाकण्यचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. फक्त ते भडकमकर मास्तराना नाही फसवू शकले.... (मास्तरांच्य क्लासचे नसणार..... पोरानो वेळीच क्लास लावला आसता तर अशी जाहीर चिरफाडीची वेळ नसती आली.....)

भडकमकर मास्तर's picture

14 May 2008 - 12:35 am | भडकमकर मास्तर

बाकी भडकमकर मास्तरानी आपली केस एकदम स्ट्राँग उभी केली आहे..... त्यामुळे अता नाटक बघायला गेलो तरी ते मास्तरांच्या चष्म्यातूनच पाहीले जाणार..... असो.
:)) :))
धन्यवाद..
पण लोक ती एकांकीका पाहुन भारावले म्हन्जे कलाकारानी उत्तम काम करुन कथेतील उणिवा झाकण्यचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.
हे बाकी अगदी खरे... मी वर लिहिल्याप्रमाणे अभिनेते चांगलेच आहेत, नेपथ्य ,प्रकाश उत्तम... त्यामुळे मूळ कथेच्या आत न जाता वरवर सगळे झकासच वाटते.

वरदा's picture

13 May 2008 - 11:31 pm | वरदा

माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही

अगदी हेच वाटलं..काय वाट्टेल ते लिहितात का नाटक म्हणून?
भडकमकर सर तुमच्याशी १०१ % सहमत.

अभिज्ञ's picture

14 May 2008 - 1:37 am | अभिज्ञ

माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही

या एकाच नाटकावरून आपण सर्वच प्रायोगिक नाटकांबद्दल "वाइटच"असे मत कसे काय व्यक्त करु शकता?
"प्रायोगिक" रंगभूमी वर असे प्रकार नवीन नाहित.

खुद्द भडकमकर मास्तरांनाहि अशा प्रकारच्या वेगळ्य़ा वाटेच्या नाट्याचा मोह आवरलेला दिसत नाहि.

बाकि पेठकर काकांनी मांडलेले मुद्दे पटतात.
अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते.

हे पटत नाहि.मुळात लेखकाचा पर्स्पे़क्टिव हा फक्त "घडणारी " घटना आणि त्यातून त्या नाट्याच्या "(खल)नायकाचि" कुचंबणा एव्हढाच असावा.आणि मुळात आदिने आपला गुन्हा /चुक मान्य केलीच आहे.त्यामुळे तो गुन्ह्याची शिक्षा भोगेलच हे प्रेक्षक समजून घेतील अशिही लेखकाचि धारणा असावि. त्यात त्याला वाईट्ट शिक्षा होताना दाखवणे हे जरा फिल्मी झाले असते.
इथले परिक्षण हे फक्त विषयाच्या आशयावरच दिसते आहे.

बा़किचे पैलु आपण शिताफीने टाळले आहेत असे वाटते.

असो,
एका गंभीर विषयावर इथे चांगलि व सकस चर्चा वाचायला मिळाली.

अबब

भडकमकर मास्तर's picture

14 May 2008 - 9:44 am | भडकमकर मास्तर

खुद्द भडकमकर मास्तरांनाहि अशा प्रकारच्या वेगळ्य़ा वाटेच्या नाट्याचा मोह आवरलेला दिसत नाहि.
अबबराव, आम्ही कसले प्रायोगिक आणि वेगळी वाटवाले??
, दोन माणसं ग्राउंडवर बसून भाराभर बोलतात...यात काय प्रायोगिक आहे? उलट त्या ग्राऊंडवर उंट येतो आणि जोर्ज बुश येतो मग दोघे मिळून या हीरो हीरॊइनमध्ये फ़ूट पाडतात , मग एक कुत्रा आणि लिन्कनचा पुतळा येतो मग ते अणुबॊम्बच्या जन्मकथेबद्दल एका आदिमानवाला गोष्ट सांगतात...तोच कुत्रा खदाखदा हसत मी जिराफ असतो तर किती बरे झाले असते असे हीरोला सांगत असतानाच ते हीरो आणि हेरॊइन स्वप्नातून जागे होतात आणि तो तिला म्हणतो, " आज इकडे कुठे ताई?" मग ती म्हणते " थांब लक्ष्मी कुंकू लावते " मग सगळे लोक स्टेजवर येतात आणि चरखा चला चलाके लेंगे स्वराज लेंगे असे म्हणतात ...पडदा...

असं असतं प्रायोगिक नाटक... आम्ही आपले असेच सामान्य ....
इथले परिक्षण हे फक्त विषयाच्या आशयावरच दिसते आहे.
बा़किचे पैलु आपण शिताफीने टाळले आहेत असे वाटते.

जेव्हा मूळ गोष्टच पटत नाही तेव्हा बाकीचे कितीही चांगले असले तरी जे पटले नाही त्यावरच आम्ही बोलणार...
शिवाय बाकीच्या गोष्टींची आम्ही ( शक्य तेवढी ) दोन शब्दांत स्तुती केलीच आहे...
( नुकत्याच समीक्षणाच्या क्लासहून आलोय ना..त्यामुळे जास्त कौतुक नाही...इव्हेंट मॅनेजमेंट वरून आलो असतो , तर लै कौतुक दिसले असते)

धनंजय's picture

14 May 2008 - 2:49 am | धनंजय

मास्तरांचे विचार मग्न करायला लावतात.

पैकी हा एक पूर्णच पटतो:
> ४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते....
> ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण
> त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला
> पाहिजे?
आणि समजा ती जबरदस्ती सौम्य होती "गुस्से में तुम और भी सुंदर लगती हो" श्टाईलची, तरीही ती चूकच. चित्रण नसते तर ही चूक ऋताच्या पाया पडून तिने माफ करण्यालायक होती-नव्हती हे ऋताने ठरवायचे. चित्रण करायचे होते तर ऋताची परवानगी आवश्यकच होती. क्लिप पसरली नसती, तरी ऋताने त्याला सोडण्यासाठी ही चित्रणाची बाब पुरेशी होती. परवानगी देण्यास हरकत असू शकते. नसूही शकते. हे पूर्ण ऋताच्यावर अवलंबून आहे. चित्रण ही काही अतिरेकी विकृत भावना नव्हे. छोटे-छोटे कॅमेरे नव्हते तेव्हापासून कुंचलेबहाद्दर चित्रकार आपल्या प्रेयसींची नग्न रूपे चित्रित करतच होते. खजुराहे किंवा कोणार्कच्या सूर्यमंदिरावर संभोगाची शिल्पे कोरणारे बहुधा आपल्या अनुभवालाच शिल्पित करत होते.
पण हे सर्व अवांतर आहे, कारण (१) जबरदस्ती झाली, आणि (२) विनापरवानगी चित्रण झाले.
एवढ्यावरच नैतिक घात झाला आहे. चित्रण पसरले हा मुद्दा नैतिकदृष्ट्या गौण आहे, पण कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

अति-अवांतर : स्वतःवर जबरदस्ती होण्यात कोणाला लैगिक सुख मिळत असेल, तर ती केलेली "जबरदस्ती" केवळ नाटक असते. अशा परिस्थितीत भाषा ही कुचकामी ठरते, कारण या नाटकात "थांब, थांब" किंवा "नको, नको" हे त्या नाटकातले संवाद असतात. अशी आवड असणार्‍यांनी सुरुवातीला "काही ठेवणीतले शब्द नाटकाबाहेरचे, खर्‍या अर्थाचे आहेत" हे आपापसात ठरवलेले बरे. नव्हे, आवश्यक. या सेफवर्ड=सुरक्षित शब्दांबाबत विकिपीडियाचा दुवा.

मन's picture

14 May 2008 - 3:13 am | मन

चित्रण करायचे होते तर ऋताची परवानगी आवश्यकच होती.
म्हणजे काय?
(क्षणभरासाठी समजा की परवानगी देण्याइतकी ती येडी आहे.)तिची परवानगी असेल तरी असं करणं बरोबर वाटत नाही.
जानेवारी २००६ मध्ये एका मराठवाड्यातल्याच एका कॉलेजची अशी केस उघड झाली होती.
बातमी सगळीकडे(क्लिप सहीत) दाखवली गेली""सबसे तेज " वाहिनी वर.
तेव्हा जी काही फौजदारी केस झाली, त्यानुसार चोउकशीला आलेल्या पोलिसांनी सांगितलं की,
एखाद्या जोडप्याने दोघांची संमती असतानाही अशी क्लिप बनवुन वितरीत केली, तरी तो दखल्पात्र गुन्हा आहे.
स्वतः फौज दाराने त्या संस्थाप्रमुखाला सांगितले होते.(आम्ही काही फुटांवरुन ऐकत होतो.)
तस्मात्, अशी क्लिप बनविणे सध्या फौजदारी गुन्हा आहे.
(सदर मुलगा-मुलगी दोघांची संमती असे चित्रण होउ देण्यास असतानाही)
(ज्या कलमाखाली पॉर्न/अश्लील चित्रपटांना शिक्शा आहे, तेच कलम इथेही लागु होइल. व सदर मुलगा, मुलगी ह्यांना ती शिक्षा होइल;)

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

भडकमकर मास्तर's picture

14 May 2008 - 9:02 am | भडकमकर मास्तर

एखाद्या जोडप्याने दोघांची संमती असतानाही अशी क्लिप बनवुन वितरीत केली, तरी तो दखल्पात्र गुन्हा आहे.
वितरित झाली की गुन्हा झालाच हो, पण वितरित व्हायच्या आधी ??

धनंजय's picture

14 May 2008 - 5:11 am | धनंजय

विकृत मनोवृत्तीचे सिनेमात किंवा नाटकात सहानुभूतीपूर्वक चित्रण करणे थोडे धाडसी असते.

नाटककार-दिग्दर्शक-अभिनेता यथातथाच असला तर विकृत मनोवृत्तीचे ते अनैतिक पात्र प्रेक्षकाला केवळ राक्षसच वाटते. त्यात काही नवीन जाणीव नाही.

उत्कृष्ट नाटककार-दिग्दर्शक-कलाकार विकृत किंवा दुष्ट पात्रही मनुष्य म्हणून सहानुभूतीच्या योग्य दाखवू शकतो. लेडी मॅक्बेथला राक्षसीण म्हणून दाखवण्यात काय खास? पण एखादी तोडीची अभिनेत्री या खुनशी बाईला अशी काही वठवते, की आपल्याला तात्पुरता तिचा राजद्रोह, पतीची चिथवणी पटायला लागते.

प्रेक्षक विचारी असला, तर त्याला ही नवी अनुभूती मोठी भयानक असते. शेक्स्पियर+दिग्दर्शक+अभिनेत्री आपल्याला जाणीव करून देतात, की आपल्यातही तो दुष्टपणा दडलेला आहे. आपल्याकडून झालेल्या पापांचे आपण असेच समर्थन करत असले पाहिजेत. या खुनशी बाईबद्दल सहानुभूती वाटते, तर स्वतःच्या बारीकसारीक पातकांची आपण काय सारवासारव करत असू, हा विचार स्तिमित करतो.

विकृत लैंगिक वृत्ती आणि जबरदस्तीबद्दल एक चित्रपट मला असाच हेलकावून गेला - तो होता Talk to her (स्पॅनिशमध्ये) Hable con ella. (आय एम डी बी दुवा, सोनी पिक्चर्स दुवा-इंग्रजी)

दोन कोमामध्ये बेशुद्ध स्त्रिया आणि दोन पुरुष यांच्याबद्दल ही कथा आहे.
एक पुरुष पत्रकार आहे, आणि त्याचे बेशुद्ध पडलेल्या एका प्रसिद्ध बैल-झुंजवणारीवर प्रेम आहे.
दुसरा पुरुष परिचारक (दवाखान्यातला मदतनीस) आहे, आणि बेशुद्ध पडलेल्या आपल्या तरुण शेजारणीवर त्याचे प्रेम आहे.
शुद्धीवर असताना पैकी कुठल्याही बाईने त्या-त्या पुरुषावर अनुग्रह केला नव्हता, पण त्या होकार द्यायच्या मार्गावर होत्या, असा त्या दोघा पुरुषांनी आपापला गैरसमज करून घेतला होता.

पत्रकाराचे वागणे कायद्यास धरून, कोणीही सभ्य म्हणेल असेच आहे.
परिचारक मात्र बेशुद्ध स्त्रीशी संभोग करतो (कुठल्याही कायद्यात हा बलात्कारच).

पुढे याला अटक होते आणि तुरुंगात तो आत्महत्या करतो. (म्हणजे लिटल बॉय नाटकापेक्षा इतकेतरी बरे...) पण त्याच्याबद्दल आपल्याला कमालीची सहानुभूती वाटू लागते. तो सभ्य पत्रकार मनातून जे करत असतो, तो हा विकृत मनुष्य शरिराने करतो. हा चित्रपट बघून स्पष्ट नैतिकता विरुद्ध माणसाच्या विकृत स्वभावाबद्दल सह-अनुभूती वाटून मन अगदी कसावीस झाले होते.

त्यामुळे "लिटल बॉय"ने प्रयत्न करण्यात काही वावगे नाही, असे मला वाटते. नैतिकतेची ही परीक्षा पेलू शकणारा प्रेक्षकही धाडसी हवा, नाटककारही धाडसी हवा. असल्या हलाहलाचा खेळ करून दाखवायचा असेल, तर दिग्दर्शन-नेपथ्य उत्तम हवेच.

भडकमकर मास्तर's picture

14 May 2008 - 9:27 am | भडकमकर मास्तर

त्यामुळे "लिटल बॉय"ने प्रयत्न करण्यात काही वावगे नाही, असे मला वाटते. नैतिकतेची ही परीक्षा पेलू शकणारा प्रेक्षकही धाडसी हवा, नाटककारही धाडसी हवा. असल्या हलाहलाचा खेळ करून दाखवायचा असेल, तर दिग्दर्शन-नेपथ्य उत्तम हवेच.
असला खेळ लिटल बॉय ला दाखवायचा असता तर मला फार आवडले असते...पण गंमत अशी की हे लोक "तो वाईट नाहीच, त्याच्याकडून एक छोटीशी चूक घडलेली आहे " या गोष्टीपलिकडे जायला तयार नाहीत.... असा खेळ दाखवायला आधी आपले पात्र कसे आहे , कितपत वाईट आहे, दुष्ट आहे, हे ऍक्सेप्ट करणे आवश्यक आहे, एकदा विषय धाडसी निवडल्यानन्तर मग पुन्हा मागे जाण्यात अर्थ नाही, ( तो चांगलाय, चांगलाय, मला समजून घ्या वगैरे)...त्यामुळेच विचार करणार्‍या प्रेक्षकाला आदिला इतरांनी सहानुभूती देण्याचे कारण कळत नाही...

त्याच्या चुका काय आहेत हे तरी त्यांना क्लीअर नको का...क्लिप स्प्रेड होणे यापलिकडे त्यांना आदिची चूक वाटत नाही, हा माझा मुख्य आक्षेप आहे..... निदान त्याला एखाद्या पात्राने त्याच्या महत्त्वाच्या चुकांची ( १.जबरदस्ती + २.नकळत चित्रण) जाणीव तरी करून देणे आवश्यक होते....तेही नाही...
(हे लोक पात्राला सहानुभूती अशी देत होते की जणू १. चित्रण भलत्यानेच केले आहे, दोघांच्या नकळत आणि मग क्लिप स्प्रेड झाली आहे.
२. याने जबरदस्ती केली नाही... दोन कन्सेंटिंग ऍडल्ट्स मधलं मॅटर ....)....

त्यामुळे आपण म्हणता त्याप्रमाणे स्पष्ट नैतिकता विरुद्ध माणसाच्या विकृत स्वभावाबद्दल सह-अनुभूती , असा गंभीर विषय त्यांना दाखवायचा नसावा, आणि मनात असले तरी झेपला नसावा असे मला वाटते..

वाचक's picture

14 May 2008 - 8:19 am | वाचक

वेगळ्या दृष्टीकोनातून पहायचा प्रयत्न करत आहे - समर्थन / उदात्तीकरण / विद्रोह वगैरे काहीही नाही.

मास्तरानींच म्हंट्ल्याप्रमाणे 'कॉलेज तरूण क्लिप च्या प्रकारा सरावलेले दिसले' म्हणजेच 'ऋता' चाही त्या गोष्टीला विषेश आक्षेप असणार नाही. जबरदस्ती वर तिची मते काय आहेत हे इतरत्र मांडलेले नाही / मला अंदाज करता येत नाही. संशयाचा फायदा द्यायचाच झाला तर 'त्यावेळी तू असे वागायला नको होते पण तारुण्याच्या उन्मादात असे घडून गेले - असो' असेही एक मत असू शकते. त्यामुळे ह्या 'सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम' म्हणून ऋता त्याला सोडून गेली असे मी मानतो.

वर सांगितल्या प्रमाणे सगळे मित्र सोडून गेले, प्रेयसी सोडून गेली आणि सगळीकडे बदनामी (?) झाली. कायद्यानुसार गुन्हा दाखल होउ शकतो की नाही हा मुद्दा बाजूला ठेवला घटकाभर तर 'शिक्षा' झालेलीच आहे ना त्याला... किंवा शेवट प्रेक्षकांवर सुद्धा सोडला असेल....