ठाणे खादाडी - क्षणचित्रे..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
11 Apr 2011 - 2:19 pm

आमच्या कट्ट्याचा जीव छोटा आहे हे माहीत असल्याने पुरेपूर कोल्हापूरमधे असलेलं चोवीस जणांची व्यवस्था असलेलं छोटंसंच ए.सी. कंपार्टमेंट आम्ही अडवून ठेवलं होतं.

मी आणि स्पावड्या साडेसातालाच तिथे पोचलो. स्पावड्यासोबत सुधांशू आणि वपाडाव आलेले होते. नंतर बराच काळ डोक्यांचा काउंट चारवरच स्थिर होता. सगळेजण जमेपर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत आम्ही चौघे तिथेच खड्या पारश्यासारखे पण गप्प न राहता गप्पा हाणत उभे राहिलो. आम्ही सर्वच जण (स्पावड्या धरुन) एकमेकांना पहिल्यांदाच बघत होतो. मग "ओळखा पाहू" चा मस्त राउंड झाला. आपापल्या टोपणनावांविषयी प्रत्येकाने (खरे काय त्याचा थांग लागू न देता) डीटेलवार सांगितलं.

तेवढ्यात मदनबाण तिथे येऊन रुतला. पुन्हा "ओळखा पाहू"चा मजेदार सोहळा आणि "मदनबाण" या नावाची चिरफाड झाली.

विश्वनाथ मेहेंदळे असे नाव सांगत एक तरुण हजर होताच आम्ही सर्व अचंबित झालो. मेहेंदळे यायचे बाकी आहेत हे माहीत असल्याने मलमलीचा सदरा लेंगा घातलेले, हातात भाजीची पिशवी असे एखादे नुकतेच रिटायर्ड गृहस्थ पाहण्याच्या तयारीत आम्ही उभे होतो आणि हे काहीतरी वेगळेच.

मग लीमाउजेट आली. तिचे नाव "लीमाउजेट" का आहे? याचा पत्ता मात्र अज्जिबात लागला नाही बॉ. त्याच सुमारास मिसळलेला काव्यप्रेमी हजर झाला. मग मात्र आम्ही आपली रिझर्व केलेली जागा हातची जाऊ नये म्हणून हॉटेलात घुसलो.

स्थानापन्न होऊन ऊर्दू वाचनपद्धतीने मेन्यूकार्डावर नजर टाकताक्षणीच उजव्या बाजूचे आकडे वाढलेले आहेत हे लक्षात आलं. धाग्यात आम्ही टाकलेलं मेन्यूकार्ड नोव्हेंबर वीसशेदहातलं होतं. त्यानंतर ही वाढ झालेली दिसून गोंधळाने सुरुवात होण्याची प्राचीन परंपरा आपण पार पाडणार हा समाधानकारक विचार माझ्या आणि स्पावड्याच्या मनात आला.

पण उपस्थित मिपामित्रगणांनी त्यावरून मनात आलेले स्वल्पगालिप्रदान मनातच ठेवले आणि चेहर्‍यावर येऊ दिले नाही. उदाहरणार्थ हे पहा:

सुधांशू, वपाडाव, लीमाउजेट आणि विश्वनाथ मेहेंदळे यांनी मेन्यू पाहूनही चेहर्‍यावर ठेवलेलं हसू..

तदनंतर हात्तेच्या म्हणायची वेळ मजवर आली. कारण स्पावड्या धरुन पाच सहा जण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत असे म्हणू लागले.

रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की..

असो.. पण व्हेज थाळीचा मेनू पाहून मजसारखे "पोहणारे, धावणारे आणि सरपटणारे जीव पोटात घालण्यास उत्सुक (आभार: शिरीष कणेकर)" सामिषाहारी मेंबर्सही व्हेज खाण्याचा विचार करु लागले.

आम्ही तासभर उभ्याने वाट पाहून अखेरीस लाभलेले विजुभाऊ मात्र "रामदासकाका आल्याशिवाय आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श करणार नाही", असं म्हणू लागले.

(त्यामुळे बहुधा समोर बसलेल्या मदनबाण आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींनाही काही मागवता येईना.)

शेवटी मदनबाणांनी नुसतीच सोलकढी मागवली. आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींची शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात अखेर रामदासकाका आले..

त्यांच्या सोबत गुलाबी पानांची डायरी होती. (मी फक्त निरिक्षण नोंदवले..). त्यांनी आल्या आल्याच आपण जेवणार नाही असे जाहीर केले.

मी आणि मेहेंदळे हे दोघेच मांसाहारी उरलो होतो. त्यामुळे विजुभाऊंना मांसाहाराच्या गळास लावून आपली संख्या वाढवण्यासाठी तातडीने धनगरी मटणताट मागवून आम्ही दोघे त्यांच्यासमोर चापू लागलो.

अखेरीस विजुभाऊ आमच्या क्लबात आले.

मधेच जयपालही येऊन थोडावेळ गप्पा मारुन गेले.

तेवढ्यातच खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली. (एव्हाना ठ्ठोठ्ठो हसण्याच्या आवाजाने आणि एकूण गप्पागोंधळ घालून मिपाकरांनी त्या लहानशा खोलीचे "घटनास्थळ" बनवले होते..)

हे केक जेमतेम फोटो काढेपर्यंत टिकून राहिले. नंतर दहावीस सेकंदात रिकामा डबा उरला. केकची चटणी नावाची उत्स्फूर्त पाकृ समस्त उपस्थितांनी बनवली.

मग मात्र गप्पा आणि बडबडीने थकलेले सर्वजण गपागप खाण्यात गुंगले. तेवढावेळ एकदम शांतता झाली.

रामदासकाका उपास सोडायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर बाजूला बसलेल्या स्पावड्याने त्यांचा नाद सोडून आपली थाळी रिकामी केली आणि हात वाळवत बसला..मागे खादाडताईही उगीच मला जेवायचं नाही म्हणत पोळीभाजी घ्यावी तशी काहीतरी थोडंसं घेऊन बसली. अशा अल्पाहारी मेंबरांना आधी चोवीस तास उपास ठेवण्याची वेगळी सूचना यापुढे सर्व कट्टा करणार्‍यांनी द्यावी अशी विनंती.

शेवटी साग्रसंगीत जेवण झाल्यावर आणि बाहेर वेटिंगलिस्ट वाढतेय असं दिसल्यावर अत्यंत नाईलाजाने कट्टेकरी हात धुवून रस्त्यावर आले. मदनबाण "निघतो" म्हणून गायब झाले. अमिताताईलाही निघावे लागले.

सर्वसाक्षी, विजुभाऊ आणि रामदासकाकांनी गप्पांना पुन्हा तोंड फोडले. फोटो काढण्यासाठी अनेकदा सर्वांचे कोंडाळे फोडून चेहरे कॅमेर्‍याकडे वळवावे लागत होते, इतका गप्पांना जोर चढला होता.

तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..", इति विजुभाऊ.. वगैरे अशी उपयुक्त वचने ऐकताना धमाल येत होती. कट्टा सार्थकी लागत होता आणि पाय मात्र दुखायला लागले होते.

तरीही दर दहा मिनिटांनी कोणीतरी म्हणायचं, "चला.निघूया आता..मजा आली..वगैरे.." आणि तरीही कोणीच तिथून न हलता परत गप्पा पुढे सुरु व्हायच्या.

असाच तास सव्वा तास गेला. मग नाईलाजाने एकेक गडी गळायला लागला. स्पावड्या, वपाडाव, सुधांशू वगैरे सांसारिक वेसणीत न अडकलेली मंडळी मध्यरात्र उलटून गेली तरी कट्ट्यात आणि गप्पांत रंगली होती. (त्यांनी नंतर एकट्याने आइस्क्रीम खाल्ले असे ऐकतो.. नोंद घेतली आहे. योग्य वेळी कारवाई करण्यात येईल.)

एकूण कट्टा आनंदात पार पडला. खूप मोठा कट्टा नव्हता, अगदी छोटासाच. पण जवळजवळ सर्वच जण एकमेकांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटत होते.

रोजच्या नोकरी आणि घर अशा साच्यात अडकून गेलेल्या लाईफमधे नवीन मित्र मिळणं ही किती गरजेची गोष्ट होती हे या कट्ट्यामुळे जाणवलं. कॉलेज संपल्यापासून अशा मनसोक्त गप्पा कोणाशीच कधी झाल्या नव्हत्या.

तात्यांची अगदी निघण्याच्या वेळेपर्यंत वाट पाहूनही ते आलेच नाहीत याचं मात्र खूप वाईट वाटलं.

मौजमजालेखप्रतिसादप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2011 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार

चाळीस ओळींची प्रतिक्रीय लिहिली आणि मिपा गंडले :(

निषेध !

Warning: Table './misavcom_misalsix/sessions' is marked as crashed and should be repaired query: SELECT u.*, s.* FROM users u INNER JOIN sessions s ON u.uid = s.uid WHERE s.sid = 'ae06d2fd19eddad645123ce2babd9544' in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 136

Warning: session_start() [function.session-start]: Cannot send session cache limiter - headers already sent (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 1162

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 726

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 727

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 728

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc:136) in /home/misavcom/public_html/includes/bootstrap.inc on line 729

अगीन कोल्हा नाही का वापरत तु?
(त्यात बॅक बटण दाबलं की झालं. हाकानाका :))

विजुभाऊ's picture

24 Oct 2013 - 7:28 pm | विजुभाऊ

हे सगळं लै मिस करतोय इथे जोहान्सबर्गात.
सोबतचे एकतर गुलटे आहेत. नायतर अफ्रीकन.
त्याना काय कळणार कट्ट्याची गम्मत.
बघु डिसेंबर /जानेवारीत तिकडे येतोय. तेंव्हा कसर काढतो

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2011 - 3:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली.

हे खरचं फार फार अवघड असते हो... ;)

खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली.

या बद्दल योग्य ठिकाणी तक्रार नोंदवल्या गेली आहे.

मज्जा आली.... पहिलाच कट्टा वेन्जॉय केल्या गेलेला आहे.

हा योग जुळवुन आणल्याबद्दल गवि आणि स्पा यांचे मनापासून आभार!!
त्यांच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत हीच इ. प्रा.!!

प्रीत-मोहर's picture

11 Apr 2011 - 3:15 pm | प्रीत-मोहर

मस्त वृत्तांत गवि :)

यशोधरा's picture

11 Apr 2011 - 3:18 pm | यशोधरा

म्हणते.

५० फक्त's picture

11 Apr 2011 - 3:16 pm | ५० फक्त

फोटो आणि सचित्र वर्णन दोन्हीही एकदम मस्तच.

विशेषत: स्पा आणि गविंचे या कट्ट्याला पुढाकार घेतल्याबद्दल आभार.

आपले असेच कट्टे भविष्यात वारंवार होत राहोत ही सदिच्छा.

कार्यालयीन कामांमुळे कट्ट्याला येउ शकलो नाही आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायची संधी निसटुन गेली. असो, पुन्हा जेंव्हा योग येईल तेंव्हा भेटुच.

मराठमोळा's picture

11 Apr 2011 - 3:19 pm | मराठमोळा

वा वा... मस्त..

मिपाकरांचे असे कट्टे वारंवार होत रहावेत आणि आंतरजालीय मराठी परिवार असाच फुलत रहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना!!!
पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू. :)

गणपा's picture

11 Apr 2011 - 4:01 pm | गणपा

शेम टु शेम असच बोल्तो. :)

कुंदन's picture

11 Apr 2011 - 4:07 pm | कुंदन

पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2011 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा वा... मस्त..

मिपाकरांचे असे कट्टे वारंवार होत रहावेत आणि आंतरजालीय मराठी परिवार असाच फुलत रहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना!!!
पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू.

-दिलीप बिरुटे

नंदन's picture

12 Apr 2011 - 5:00 am | नंदन

वा वा... मस्त..

मिपाकरांचे असे कट्टे वारंवार होत रहावेत आणि आंतरजालीय मराठी परिवार असाच फुलत रहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना!!!
पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू.

सहमत आहे! झकास वृत्तांत, गवि.

गणेशा's picture

11 Apr 2011 - 3:25 pm | गणेशा

अतिशय छान वाटले वाचुन ... फोटो पण मस्त ...

असेच भेटत रहा .. कधी तरी त्या कट्ट्यामध्ये आम्ही पण सामिल असु ..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2011 - 3:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

म्हणजे कांदेपोह्यांचे कार्यक्रम संपल्यावर का??

ह. घ्या. ;)

पियुशा's picture

11 Apr 2011 - 3:26 pm | पियुशा

कट्टा झक्कास जमला ह!
:)

आचारी's picture

11 Apr 2011 - 3:27 pm | आचारी

का रे छळतोस असा....................काय ति ताट ...छायाचित्रे नुसता जळफळाट केलास रे ...........जिव नुसता कासाविस झालाय

विशाखा राऊत's picture

11 Apr 2011 - 3:31 pm | विशाखा राऊत

कट्टाचे वर्णन वाचुन आणि फोटो बघुन खुपच मस्त वाटले.. एकदम फक्कड लिहिले आहे.. सगळ्यां फोटो सारखे.. :)

sneharani's picture

12 Apr 2011 - 10:40 am | sneharani

कट्ट्याचं वर्णन अन फोटो झकास!!
:)

टारझन's picture

11 Apr 2011 - 3:40 pm | टारझन

अरे वा ? : मस्त च :)

स्पा काका तर गरिबांचे मोहन आगाशे आहेत :)

मोठी प्रतिक्रीया टाकुन सेंड करताना एरर आल्याने एवढंच :)

वाहीदा's picture

11 Apr 2011 - 4:01 pm | वाहीदा

मी ही हेच म्हणणार होते पण गरिबांचे नाही
(चक्क टार्‍याशी सहमत ;-) )
स्पा,
तु अगदी मोहन गोखले दिसतोस रे
बाकी कट्टा मिस केला याचे दु:ख आहे

टारु तुम्हाला मोहन गोखले म्हणायचय का ? ;)

टारुने मोहन आगाशे म्हटल्यावर फोटु २ वेळा निरखुन पाहिला.
वाहिदाने त्याला अनुमोदन दिल्यावर अजुन ४ वेळा निरखुन पाहिला. =))
मोहन गोखलेच म्हणायचं असाव त्यांना. ;)

आत्मशून्य's picture

11 Apr 2011 - 4:31 pm | आत्मशून्य

पण मग थोडा वीचार केला आणी लक्षात आलं ही प्रतीक्रीया जूणे जाणत्या अशा प्रस्थापीत लेखक महाशयांनी दीलेली आहे म्हणजे कदाचीत आपण नाहीका लहानपणी "यमूनाबाइ आगाशे" चीडवायचो ? मग "मोहण अगाशे" पण त्या संदर्भात लेहले असावेत असा साँषय मणात आला.

मृत्युन्जय's picture

11 Apr 2011 - 4:35 pm | मृत्युन्जय

यमूनाबाइ आगाशे

हाहाहा. बर्‍याच दिवसांनी हा शब्द ऐकला. विस्मृतीत गेल्यासारखा झाला होता.

वाहीदा's picture

11 Apr 2011 - 4:46 pm | वाहीदा

यमूनाबाइ आगाशे
हा हा हा =))

बॅटमॅन's picture

24 Oct 2013 - 8:11 pm | बॅटमॅन

यमूनाबाइ आगाशे

ठ्ठो!!!! लै दिवसांनी ऐकला आणि हहपुवा झाली पुनरेकवार.

सुहास..'s picture

11 Apr 2011 - 3:44 pm | सुहास..

झ का स !!

दीविरा's picture

11 Apr 2011 - 3:45 pm | दीविरा

अतिशय छान वाटले वाचुन ..

फोटो पण मस्त :)

कट्टा एकदम झकास झाला
रामदास काका , विजुभाऊ आणि सर्वसाक्षी आवर्जून उशिरा आले तरी आले त्याबद्दल त्यांचे आभार ;)

गाविंनी आल्या आल्या गेम केला " त्यांचा डायलॉग (मला उद्देशून- स्पा मी विचार केलेला त्यापेक्षा तू खूप बारीक आहेस, आणि तू विचार केला असशील त्या पेक्षा मी खूप जाड आहे )
सगळे मजबूत हसत होते

बाकी, जेवण तर सुसाटच .
धनगरी मटण बघून तर , इनो ची कमतरता जाणवत होती
खादाड अमिताने जो केक करून आणलेला ... अहाहा अफाटच होता
मदन बाण ने मिपाच्या सुरुवातीच्या काळातले डू आय डी आणि एक्सेल शिट चे तुफान किस्से सांगितले

वपा डाव हा नवीन असून सुद्धा पुण्याहून आला होता, त्याचे सुद्धा विशेष आभार
विश्वनाथ मेहेंदळे हे सरप्रीझ प्याकेज होत ;)
रामदास काकांनी सुद्धा आल्या आल्या धमाल करायला सुरुवात केली

विजुभौंनी बरेच किस्से सांगितले, त्याचं मराठी साहित्याच ज्ञान खरच अफाट आहे
प्रत्येक लेखकाची लिहिण्याची पद्धत त्यांनी मस्तच उलगडून सांगितली

शेवटी सगळ्यांना टाटा बाय बाय केल्यावर आम्ही चालत चालत ठाण्याला आलो
मी विमे सूड आणि वपा रात्री ठाणा स्टेशन वर टीपी करत बसलो
त्यात परत एक दीड तास गेला

एकूण काय अपेक्षेपेक्षा कट्टा जबर्या रंगला

>>मदन बाण ने मिपाच्या सुरुवातीच्या काळातले डू आय डी आणि एक्सेल शिट चे तुफान किस्से सांगितले
यु टुबच्या लिंका नाही दाखवल्या का? कमाल आहे.

अन्या दातार's picture

11 Apr 2011 - 4:13 pm | अन्या दातार

गविंचे कट्टानिरुपण आणी त्याला स्पावड्याची चुरचुरीत फोडणी! अप्रतिम कॉम्बिनेशन!

पुढच्या कट्ट्याला यायलाच हवे असे वाटत आहे.......
(स्पावड्या, गवि: कळवतो मी कधी येत आहे ते. त्याप्रमाणे आपण प्लॅन करुयात!)

मृत्युन्जय's picture

11 Apr 2011 - 3:56 pm | मृत्युन्जय

ज्जेबात. कट्टा जोरात झालेला दिसतो आहे.

अवांतरः स्पाने तिन्ही पोळ्या खाल्ल्या का?

प्रास's picture

11 Apr 2011 - 3:55 pm | प्रास

पहिला कट्टा पार पडला.

चांगला पार पडलेला पहिला कट्टा ही पुढल्या कट्ट्यांची नांदी असतेय.

स्पा आणि गवि चांगले आयोजन आणि गवि, उत्तम वृत्तांत! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!

या वेळी काही जमलं नाही पण पुढल्यावेळी हजर राहण्याचा नक्की प्रयत्न होईल.

रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की..

हेच मी देखिल म्हणालो असतो......

वैष्णवनिरामिषभोजनाभिलाषि -

डावखुरा's picture

11 Apr 2011 - 4:04 pm | डावखुरा

चला हा धागा म्हणजेच कट्टा.. हा अतिशय महत्वाचा असा आंतर्जालीय दस्तेइवज आहे की अशा काही व्यक्ती डुप्लिकेट आयडी नसुन त्या खरंच अस्तित्वात आहेत....
कधीतरी मी पण प्रयत्न करेल कट्ट्यात हजेरी लावायचा...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2011 - 4:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काही व्यक्ती डुप्लिकेट आयडी नसुन त्या खरंच अस्तित्वात आहेत.

नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही?? ;)

प्रचेतस's picture

11 Apr 2011 - 4:23 pm | प्रचेतस

ठाणे खादाडी कट्टा दणक्यात साजरा झाल्याचे पाहून आनंद जाहला. आयडींमागच्या व्यक्ती पाहण्यास मिळाल्या. शाकाहारी ताट पाहून तर अगदी तोंडास पाणी सुटले.
गविंचा वृत्तांत सुरेखच.

मी ऋचा's picture

11 Apr 2011 - 4:26 pm | मी ऋचा

वरून चौथ्या फोटोत कोपर्‍यातल्या खुर्चीत बसलेला स्मार्ट प्राणी स्पा आहे का?

(मोहन आगशे आणि मोहन गोखले या गोंधळात अडकलेली)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2011 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार

वरून चौथ्या फोटोत कोपर्‍यातल्या खुर्चीत बसलेला स्मार्ट प्राणी स्पा आहे का?

तुम्हाला सपाट म्हणायचे आहे का?

पसरट

मी ऋचा's picture

11 Apr 2011 - 4:43 pm | मी ऋचा

ए नाही रे मला स्मार्टच म्हणायचे आहे! खालच्या प्रतिसादांवरून लक्षात आलय कोण आहे तो ते ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2011 - 4:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अंदाज साफ चुकलेल्या आहे :)

गवि's picture

11 Apr 2011 - 4:30 pm | गवि

क्यों बेटा? मन में लड्डू फूटा? ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2011 - 4:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नाही नाही.... सपाट म्हटल्यावर काय लड्डु फुटणार?? भरलं वांगच फुटले की वो :(

"सपाट" परा म्हणाला मी नाही :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2011 - 5:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आता जरा हुरुप आला मला ;)

सूड's picture

12 Apr 2011 - 7:53 am | सूड

अहो म्हणा की मग,

लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर असतं,
कुणासाठी सपाट कुणासाठी बेटर असतं,
कुणासाठी शालजोडीत ठेऊन
मारलेलं खेटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर असतं !!

जाता जाता: इतिहासाची कधीकधी पुनरावृत्ती होते म्हणतात, त्याची इथे शक्यता नाकारता येत नाहि. तसं कुणीही कसंही वागावं, मी फक्त निरीक्षण नोंदवलं.

:D

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Apr 2011 - 9:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अस्स.... नोंद घेतल्या गेली आहे. ;)

ओ लव्हलेटरवाले! जरा दमानं घ्या!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Apr 2011 - 11:07 am | मिसळलेला काव्यप्रेमी

>>जरा दमानं घ्या!

जाऊ द्या हो!! त्याला दम लागणार आहे आता ;)

स्पा's picture

11 Apr 2011 - 5:28 pm | स्पा

"सपाट" परा म्हणाला मी नाही

मिका होप्स आहेत रे :D

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2011 - 6:04 pm | परिकथेतील राजकुमार

"सपाट" परा म्हणाला मी नाही

ऑ ऑ ऑ ?? मी कधी म्हणालो ?
मी तुम्हाला 'सपाट' म्हणायचे आहे का असे विचारले फक्त.

निरागस

मी ऋचा's picture

12 Apr 2011 - 10:58 am | मी ऋचा

ब्बॉर!

क्यों बेटा? मन में लड्डू फूटा?

हॅ हॅ हॅ

नितिन थत्ते's picture

11 Apr 2011 - 4:37 pm | नितिन थत्ते

तेजायला विजूभाऊंचा जेवणाच्या कार्यक्रमाखेरीज फोटो खूप काळात पाहिल्या गेलेला नाही.

विजुभाऊ मात्र "रामदासकाका आल्याशिवाय आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श करणार नाही", असं म्हणू लागले.
रामदास काका अन विजुभाऊ ,म्हणजे अगदी राम बनाये जोडी दिसतेय
जिवश्च कंठश्च मित्र !

कुंदन's picture

11 Apr 2011 - 5:14 pm | कुंदन

विजु भाउ हळुच तिरप्या नजरेने मेन्यु कार्ड अन त्यावरील किंमतींचा अंदाज घेत आहेत असे दिसत्येय.

प्यारे१'s picture

12 Apr 2011 - 9:29 am | प्यारे१

>>>>जिवश्च कंठश्च मित्र !

जीव जाईपर्यंत कंठ दाबून धरणारा मित्र अशीही एक व्याख्या प्रचलित आहे. मी आपलं सांगितलं हो.....;)

बाकी एवढे सगळे शाकाहारी असताना 'पुरेपुर कोल्हापूर'ला जाणे म्हणजे .... काय कारण काय हो गवि????

गवि's picture

12 Apr 2011 - 9:49 am | गवि

एवढे सगळे शाकाहारी आहेत हा साक्षात्कार घटनास्थळीच झाला.

ज्याने माझ्यासोबत मिळून प्लॅन केला तो स्पासुद्धा त्यातलाच निघेल असं वाटलं नव्हतं. इतरांचा तर काहीच अंदाज नव्हता. मूळ धाग्यावर फक्त वपाडावने आपण शुशा असल्याचं जाहीर केलं होतं.

काय गवि मीसुद्धा म्हणालो होतो.

नि३सोलपुरकर's picture

11 Apr 2011 - 5:14 pm | नि३सोलपुरकर

पुढच्या कट्ट्याला शुभेच्छा!!.
आयडींमागच्या व्यक्ती पाहण्यास मिळाल्या.. छान

अवातर : पुण्यातील नियोजीत कट्ट्याचे वर्णन.(५० फक्त याचेकडून हे वेगळे सागणे न लागे) आणि फोटो (आयडींमागच्या व्यक्ती ) पाह्ण्यास उत्सुक....

मुलूखावेगळी's picture

11 Apr 2011 - 5:57 pm | मुलूखावेगळी

मस्त कट्टा आनि व्रुत्तंत
बाकि मेहेन्दळे बद्दल माझा पन असाच अंदाज होता.
पन ह्या कट्ट्याचा निषेध.
काल स्पाने लिन्क दिली अन फोटु बघुन मी टरबुजा वर नाही राहु शकले.
मला सॅन्डविच वर भागवावे लागले :(

स्मिता.'s picture

11 Apr 2011 - 6:09 pm | स्मिता.

ठाणे कट्टा एकदम जोरदार झाला म्हणायचा!! फोटोंसहीत वृतांत आवडला.
आयडींचे चेहरे बघून छान वाटलं. असेच कट्टे आणखि जमू द्यात.
आता पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत...

रेवती's picture

11 Apr 2011 - 6:12 pm | रेवती

फोटू आणि कट्टा वर्णन झकास!
तेवढ्यात मदनबाण तिथे येऊन रुतला.
खी खी खी.
विश्वनाथ मेहेंदळे ही व्यक्ती वयस्कर नाही हा अंदाज होताच पण इतका चुकेल असे वाटले नव्हते.
अमिताबाईंनी कट्ट्यास हजेरी लावूनही काही फारसे न खाता सगळ्यांसमोर डाएटींगचा आदर्श ठेवला आहे......अजिबात घोटाळा न करता!;) केक हा लो फ्याट होता की नाही?
सगळ्यांचे फोटू छान आलेत. रामदास उशिरा येण्याचं कारण म्हणजे त्यांना सध्या मिपा आणि सामना यातील लेखनाला भरपूर वेळ द्यावा लागतो.
पुढील कट्ट्यास शुभेच्छा!

हेच म्हणते.. खादाड बाई तेथे येऊनही न खाताच राहिल्या!! दॅट्स द स्पिरिट! :)
बाकी फोटो पाहून काही अंदाज साफ चुकले आहेत याचि खात्री झाली.

निवेदिता-ताई's picture

11 Apr 2011 - 6:32 pm | निवेदिता-ताई

ठाणे कट्टा एकदम जोरदार झाला म्हणायचा!! फोटोंसहीत वृतांत आवडला!!!!!!!!

नरेशकुमार's picture

11 Apr 2011 - 7:05 pm | नरेशकुमार

जब्रा.
I miss yaaaaaaaaaaaaaarrrrrrrrrrrrrrrrrr !!!!!!!!!!!!!!!!!!!!

तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..",

ह्म्म्म्म्म्म.

प्रभो's picture

11 Apr 2011 - 7:11 pm | प्रभो

क ड क!!!

धमाल मुलगा's picture

11 Apr 2011 - 7:46 pm | धमाल मुलगा

काय रे?
काय पाहतोयस?

प्रभो's picture

11 Apr 2011 - 7:50 pm | प्रभो

मटणताट......बाकी कोणते फटू दिसलेच नाहीत... ;)

असो कालच अंजापार-चेट्टीनाड हाटेलात जाउन उत्तम असा मटण खिमा पराठा हादडून आल्याने जास्त जळजळ झाली नाही आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Apr 2011 - 7:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कट्ट्याला खरोखरच धमाल आली. स्पा ने स्वतःचे वर्णन केले होते तसाच तो दिसतो हे बघून आश्चर्य वाटले (म्हणजे तो धागा मनापासून काढला होता. च्यामारी, हल्ली कुणाला डू आयडी गृहीत धरायची सोय उरली नाही.) गवि जसे दिसत असतील असे वाटले होते तसे अजिबात दिसत नाहीत, त्यामुळे आश्चर्य हे दुतर्फा होते. पुढील वेळेस त्यांनी खरे विमान आणल्यास मी पण मलमलीचा सदरा लेंगा घालून आणि हातात भाजीची पिशवी घेऊन हजर होईन हे वचन. ;-)

"खादाड अमिता" चा केक मस्तच आणि कोल्हापुरी जेवण पण फर्मास. धनगरी मटण सहीच. त्या दिवशी प्रथमच वजरी खाल्ली, तो नक्की काय प्रकार आहे हे माहित असून सुद्धा. (वजरी चा अर्थ जिज्ञासूंनी खव मध्ये विचारावा)

कट्टा आयोजित केल्याबद्दल स्पा आणि गवि या जोडीचे आभार. आणि हो कट्ट्याच्या शेवटी त्यांनी दिलेल्या सरप्राईज बद्दल पण ;-)

सर्वांना भेटून बरे वाटले. पुन्हा भेटू, पुढील कट्ट्याला !!!

ता.क. :- एक दोन जणांकडून (हे कोण आहेत ते त्यांना आणि कट्टेकरांनाच कळेल) शिव्यांची लाखोली आणि प्रत्यक्ष भेटल्यावर लाथा मिळणार आहेत, असे गृहीत धरत आहे.

>>>> एक दोन जणांकडून (हे कोण आहेत ते त्यांना आणि कट्टेकरांनाच कळेल) शिव्यांची लाखोली आणि प्रत्यक्ष भेटल्यावर लाथा मिळणार आहेत, असे गृहीत धरत आहे.

खि: खि: खि: !!!!!! खा मार खा आता लेका.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Apr 2011 - 8:28 pm | निनाद मुक्काम प...

ठाणे तिथे काय उणे असे म्हणावेसे वाटते .
ठाणेकर मिपाकरांची कट्याला गैरहजेरी जाणवली .
मेहंदळे ह्यांच्याविषयी वर उल्लेख केलेले वर्णन योग्य आहे. .विशेष कोणतेही प्रयत्न न करत केवळ सकस प्रतिसाद देऊन मेहेंदळे ह्यांचे एक व्यक्तिचित्र मिपाकरांच्या मनात नकळत उभे केले. .ते तरुण आहेत ह्यांचा गौप्य स्फोट एका व्यनी मध्ये आधीच झाला होता.
त्यांना जेव्हा मी काका असे संबोधिले तेव्हा'' अरे मी तुझा समवयस्क आहे .'' हे वाक्य वाचताच मी तीनताड उडालो .
अल्पकाळात कट्टा जमवून यशस्वी केल्याबद्दल कट्टा वीरांचे अभिनंदन

निनाद ने एवढा सुरेख प्रतिसाद दिल्याचे पाहून खूप बरे वाटले... निन्या आभार रे

चतुरंग's picture

11 Apr 2011 - 8:14 pm | चतुरंग

एकेक वीर आणि वीरांगना बघून धन्य झालो!

मदनबाणा समोर सध्या दुसरे 'लक्ष्य' असले तरीही तो कट्टयात येऊन रुतला हे विशेष! ;)
आणि रामदासकाका उशिरा येण्याचे कारण त्यांच्या हातातली गुलाबी डायरी असावे! ;)

चिरोटा's picture

11 Apr 2011 - 8:16 pm | चिरोटा

झकास कट्टा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Apr 2011 - 8:40 pm | निनाद मुक्काम प...

पुण्याच्या कट्ट्याची खादाडी सचित्र वृतांत सह पाहण्यास उत्सुक
ह्यात नवे, जुने पुणेकर खादाडीत रंगत आणतील ह्यात शंका नाही .

माझ्या आख्यानात माझे एवढे फोटो असतात की मला प्रत्यक्ष न भेटता देखील माझ्या विषयी समग्र माहिती बर्याच मिपाकरांना आहे डू आयडी चा प्रश्नच नाही . ..( कदाचित प्रत्यक्ष भेटता येत नाही म्हणून माझी माझ्या परिवारातील सदस्यांची सातासमुद्रापलीकडून जवळीक साधण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो .)

च्यायला येथे बऱ्याच मराठीचा एक शब्द कानावर पडेल तर शपथ .
ह्या आयटी मध्ये सगळे सायाबराबाद मधील लोक असतात .आमच्या मराठी आयटी वीरांनी दिनेश दा सारखी जर्मनीला का बरे आपली कर्मभूमी करून घेत नाही ?
.

मी, वपाडाव आणि स्पा ठाकुर्लीहून एकत्र ठाण्याला यायचं ठरलं होतं. ठाकुर्लीला मी ज्या ट्रेनमधून उतरलो त्यातूनच वपाडाव उतरला. दोघे एकाच इंडिकेटर खाली उभे राहून स्पा ला कॉल करत होतो. स्पा चा फोन व्यस्त, तो गविंशी बोलत होता. मीही सारखा डिस्कनेक्ट करुन कॉल ट्राय करतोय हे वपाडाव शेजारी उभा राहून बघत होता, त्याचा समज झाला की मीच स्पा आहे आणि आम्ही दोघे एकमेकांना कॉल करतोय. अशी सगळी मजा मजा झाली. कट्ट्याला जमलेल्या पहिल्या तीनात मी होतो (अधोरेखित करावं का ?). नंतरची गंमत म्हणजे नाक्यावर उभी, पत्ते विचारणारी, चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह असलेली मंडळी पाहिली की, हे पण कट्ट्यालाच आलेले दिसतायत असे भाव चेहर्‍यावर येत.
आश्चर्य म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे, आम्हाला (म्हणजे निदान मला तरी) वाटलं हे आजोबा कट्ट्याला काय म्हणून येतायत देव जाणे.
एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कट्ट्याला आलेल्या सर्वांनी स्पा यांना अगदी न चुकता ओळखले आणि स्पा हे 'स्पा ' आयडी का मिरवतात तेही कळले.
आयडींच्या मागच्या व्यक्ती आणि वल्लींची भेट घडली.
कट्टा संपला तरी ठाणे स्टेशनवर आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. साडेबाराच्या कर्जत गाडीने शेवटी घराकडे कूच केले.

इतक्या उत्साहाने कट्टा आयोजित केल्याबद्दल आणि शेवटच्या सरप्राईजबद्दलही स्पा, गविंचे आभार.

पुढील कट्ट्याला पुन्हा नक्की भेटू.

शिल्पा ब's picture

11 Apr 2011 - 9:39 pm | शिल्पा ब

धमाल कट्टा झाला म्हणायचा!! मटनताट अन शाकाहारी ताट दोन्हीही चवदार दिसताहेत...
बाकी विमे, गवि,लीमाउजेट वगैरे अंदाज चुकलेच म्हणायचे :)
खादाडीसाठी जमुन न खाताच निघुन गेलेल्या अन स्वतःला खादाड अमिता म्हणवणार्‍या अमिताबाईंचा निषेध.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Apr 2011 - 9:48 pm | बिपिन कार्यकर्ते

असे कट्टे वारंवार होवोत! फोटो छान आले आहेत. काही अंदाज भलतेच चुकले आहेत तर काही काही अंदाज भलतेच बरोबर आले आहेत. चालायचंच.

थत्तेचाचांशी सहमत आहे. ;)

रामदासकाकांची गुलाबी डायरी बघून आश्चर्य वाटले नाही... गोडबोलेच ते शेवटी. असो.

त्याच दिवशी, त्याचे वेळेस आम्हीही एक उत्स्फूर्त छोटेखानी कट्टा केला. हॅहॅहॅ!!!

धमाल मुलगा's picture

11 Apr 2011 - 10:09 pm | धमाल मुलगा

श्रीमन् स्पा, श्रीमन् गगनविहारी ह्या कट्टायोजक द्वयीचे कवतिक करणे तितुके तोकडे!
ऐसेच समस्त मिपाजन मेळवावा, मिपाधर्म वाढवावा!!

कोणे एके काळी मिपागावाचा आद्यकट्टा योजुन मिपाधर्माचा बंधूभाव वाढविणेच्या भावनेस प्रयत्न करणार्‍या मज, आज ह्याची चिंता नोहे. तिकडे स्पा, गवि तैसेच, इकडे हर्षद, वल्ली ऐसि रत्ने मिपाधर्मास मिळाली ह्याचा बहुत संतोष आहे.
------

लेको, जंक्षान मजा केली की रे..निस्त्या चैन्या केल्या म्हणायच्चं की!
आणि, साक्षात सर्वसाक्षीदेवांचं दर्शन झालं म्हणजे काय हो...ब्येष्टच की. :)

उदंड कट्टे व्हावे, मैत्र जिवांचे वाढावे ही तो श्रींची इच्छा!

-(आद्य कट्टाकारक ;) ) ध.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मिसळपाव मस्तकी धरावा| अवघा कल्लोळ माजवावा||
मिपाजन तितुका मेळवावा| मिपाधर्म वाढवावा||

:)

सचित्र वर्णन फारच मजेशीर आहे.

स्मिता.'s picture

12 Apr 2011 - 2:31 am | स्मिता.

हे शेवटचे सरप्राईज काय प्रकार आहे? काय होते ते? की आम्हा न येऊ शकलेल्या लोकांना उगाच विचारात टाकायला ठाणे कट्ट्यावाल्यांची चाल आहे??

मटणताटा मुळे जीभ लाळेच्या सागरात पोहायला लागली.
बाकी गविंचे वर्णन आणि फोटो दोन्ही मस्तच

प्यारे१'s picture

12 Apr 2011 - 11:35 am | प्यारे१

>>>>गविंचे वर्णन आणि फोटो दोन्ही मस्तच

काय माणूस आहे राव 'भारी'च नै..... ;)

(घाबरु नका हो 'गवि'. आम्ही पण 'गवा'च आहोत)

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Apr 2011 - 11:15 am | llपुण्याचे पेशवेll

वा वा वा.. झक्कास वर्णन.

प्राजक्ता पवार's picture

12 Apr 2011 - 10:36 pm | प्राजक्ता पवार

एकदम जोरदार झाला कट्टा .
फोटो व वर्णन दोन्ही मस्तं .

पिवळा डांबिस's picture

12 Apr 2011 - 11:31 pm | पिवळा डांबिस

छान कट्टा आणि सुरेख वर्णन!!
अभिनंदन!!
आमचे परममित्र श्री. रामदास आणि श्री. विजुभाऊ हे शिंगे मोडून वासरांत यशस्वीपणे वावरतांना पाहून डोळे पाणावल्या आहेत!!
:)

पुष्करिणी's picture

13 Apr 2011 - 12:14 am | पुष्करिणी

मस्त वर्णन आणि फोटो,

ते शेवटचं सरप्राइझ काय होतं ते सांगा की कोणीतरी..

मेघवेडा's picture

13 Apr 2011 - 12:43 am | मेघवेडा

मलाही हाच प्रश्न पडला आहे केव्हाचा.

बादवे, कट्टावृत्तांत झकास हो गवि! :)

माझीही शॅम्पेन's picture

13 Apr 2011 - 11:19 pm | माझीही शॅम्पेन

च्यायला हा "कट्टा काळजात घुसला" , पुढचा कट्टा ठाण्यात जून मध्ये असेल तर नकीच हजर होईन

च्यायला सरप्रईझ काय असाव माथेरांच खरडिस्तान झाल

१. गविनि सगळ्याच बिल दिल ?
२. पुरेपूर कोल्हापूर माझाच मालकीच आहे हे जाहीर केल ?
३. अवलिया हा माझाच डू-आयडी आहे अस जाहीर केल ?

कुणीतरी लवकर सांगा ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Apr 2011 - 12:49 am | विश्वनाथ मेहेंदळे

हे गविच सांगू शकतील. :-)