राष्ट्रीय विज्ञान दिन

अवलिया's picture
अवलिया in विशेष
28 Feb 2011 - 8:34 am
मराठी दिन

राम राम मंडळी

सध्या मिपावर मराठी दिन जोरात चालू आहे. तसेच सर्वत्र मराठीचा जय घोष चालू आहे. मराठी पुन्हा एकदा सर्वत्र मानाचे स्थान पटकावणार याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही.

आज राष्ट्रीय विज्ञान दिन.

यानिमित्ताने सर्वांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा ! आणि जास्तीत जास्त वैज्ञानिक माहिती मराठीत यावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सुचवून तसा प्रयत्न आपण सर्वांनी करण्याची प्रतिज्ञा या निमित्ताने करुया असे मला वाटते.

जय ज्ञान ! जय विज्ञान !

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Feb 2011 - 9:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जय ज्ञान ! जय विज्ञान !

+१

जास्तीत जास्त वैज्ञानिक माहिती मराठीत यावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे

+१
जमेल तेवढा प्रयत्न करत आहे.

लव्ह बर्डस ना जसा रोजच वॅलेंटाईन तसा आम्हाला रोजच सायस्न डे.

बाकी मराठीत बरीच माहिती आणायच्या प्रयत्नाचे मनसुबे आहेत. बघु जमतंय का.

पैसा's picture

28 Feb 2011 - 10:44 am | पैसा

विज्ञान दिनाच्या सर्वाना शुभेच्छा! विज्ञान दिनानिमित्त कोणी विज्ञानावर आधारित लेख लिहिणार का?

टारझन's picture

28 Feb 2011 - 10:46 am | टारझन

मी लाल आणि णिळ्या लिटमस पेपर चा रंग आम्ल किंवा अल्कली मधे डुबवल्यावर (शब्द आठवत नाही ) कसा बदलतो ह्यावर लेख लिहीणार !

- (सामान्य विज्ञानिक) टारझन ओहम

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 7:55 pm | धमाल मुलगा

च्यायला...
सगळे वैज्ञानिक सुट्टीवर गेले की काय? :)

असो.
नानबा, वैज्ञानिक माहिती मराठीत आणण्याची कल्पना उत्तम. परवा मराठी भाषादिनासंदर्भात आलेल्या पुरवणीतले लेख चाळताना असं ओझरतं वाचलं की गुजरातेत गुजरातीमधून, उत्तरेत हिंदीमधून अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची सोय आहे. (वस्तुस्थिती काय आहे ते मला ठाऊक नाही.) हे जर खरं असेल तर आपल्याकडं मराठीमध्ये किती मोठं काम बाकी आहे ह्याची कल्पनाच करवत नाही.