मध्यरात्र..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
17 Dec 2010 - 12:01 am

मध्यरात्री कधीतरी येते जाग
कशी कुणास ठाऊक ...?
मी बघत बसतो खिडकीतून
डोळे किलकिले करून
माझ्या खिडकीतून दिसणारे आभाळ
नि खिडकीतून दिसणारे हे पारिजातकाचे झाड
मध्यरात्री कधी जाग आली की
झाडावर ओठंगलेला चंद्र दिसतो
माझ्या सुरक्षित अंतरावरून हे दृश्य सुंदर मस्त दिसतेय !!
चीडीचीप्प रात्र नि हे जीवघेणे झाड
ध्यान लावून बसलेले....

बायको मस्त गाढ झोपलेली
नि मी असा बेचैन
मी उठतो नि किचन मध्ये जातो
सकाळी काहीच नसणारे झुरळे
आता मस्त फिरत असतात
अन्न-कण शोध मोहिमेवर ....
कोठे लपतात नि कोठून येतात अचानक
कुणास ठाऊक.. ?

निद्रानाशाची काहीशी सवय जडलीय मला
मी बघत बसतो झुरळाकडे
दिव्याच्या उजेडात ती दिपतात काहीशी
सैरावैरा धावतात
माझी चाहूल लागून
मी बघत बसतो त्यांची गंमत
नाही मारत चुकून सुद्धा
किती वेळ लागतो मारायला त्यांना .[?]
मी त्यांना जीवदान देतो
अभय देतो

मध्यरात्र कशी छान असते !!
सन्न सन्न एकातातला आवाज ऐकत बसतो
सगळे गाढ झोपेत
स्वप्नात हरवून
नि मी हा असा जागा
मी टीवी पण बघत नाही
पुस्तक पण वाचत नाही
मी शांत बघत असतो ध्यान लावून ह्या मध्य रात्रीचा
कोवळा आभास...!!
पारिजातकाच्या फुलांचा मंद वास
नि काळ्या कबर्या आभाळाचा रंग
कोठे कोठे विखुरलेल्या चांदण्याचा
मी अलगद डोळे मिटून
हरवून जातो चंद्राच्या कोवळ्या भासात ...!!

मी डोळे मिटून
अशा मध्यरात्री
मी चवीचवीने भोगत असतो हा कोवळा काळाभोर अंधार ...!!...

शांतरसकविता

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

18 Dec 2010 - 11:59 am | जाई अस्सल कोल्हापुरी

सही..

माझ्या बद्दलच लिहिलय !even i am born insomniac..
मी पण हेच अनुभवते....
.....अंधार्......स्तब्धता....!
छान!

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 3:22 pm | नगरीनिरंजन

छान लिहीलीये. आवडली! मला मध्यरात्री घरापेक्षा सामसूम झालेले रस्ते पाहायला आवडतं. भटकी कुत्री, कोपर्‍यात झोपलेला भिकारी, रात्रपाळीला जाणारे चुकार लोक आणि अर्धवट अंधारात वेडीविद्री दिसणारी झाडे. सुन्न शांततेत स्वतःच्या हृदयाचे ठोके सुद्धा स्पष्ट ऐकू येतात. स्वतःचं इतरवेळी फारसं नसलेलं भान अनुभवायची हीच उत्तम वेळ.

राघव's picture

19 Dec 2010 - 2:15 am | राघव

:)

राघव

इंटरनेटस्नेही's picture

19 Dec 2010 - 4:47 pm | इंटरनेटस्नेही

छान!

जबरदस्त

मी शांत बघत असतो ध्यान लावून ह्या मध्य रात्रीचा
कोवळा आभास...!!
पारिजातकाच्या फुलांचा मंद वास
नि काळ्या कबर्या आभाळाचा रंग
कोठे कोठे विखुरलेल्या चांदण्याचा
मी अलगद डोळे मिटून
हरवून जातो चंद्राच्या कोवळ्या भासात ...!!

मी डोळे मिटून
अशा मध्यरात्री
मी चवीचवीने भोगत असतो हा कोवळा काळाभोर अंधार ...!!...