आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका
माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही
म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....!
अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ
बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....!
पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया
बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....!
कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड
फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....!
मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण
कुर्हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....!
सद्गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!
गंगाधर मुटे
......... **.............. **............. **.............
प्रतिक्रिया
20 Oct 2010 - 4:24 pm | गणेशा
अतिशय छान आशय असलेली कविता ...
कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड
फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....!
वाचुन हसु आले एक्दम ..
आणि आम्हाले असे छानसे विदर्भ भाषेत लिहिलेले वाचायला दिल्याने धनवाद
20 Oct 2010 - 8:32 pm | तर्री
कविता आवडली .
सद्गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!
झाडाच्या संदर्भात , ह्या कडव्याचा अर्थ लागला नाही .
बाकी ऊत्तमच.
22 Oct 2010 - 2:57 pm | दिपोटी
मला लागलेला अर्थ असा :
ग्रंथ, पुराणे वा पुस्तके वाचून व त्यातील ज्ञान / विचारधन मिळवूनही भेदभाव करणार्या / नीतीमत्ता सोडलेल्या 'माणसा'च्या अवगुणांच्या पार्श्वभूमीवर असे काहीही न वाचून सुध्दा सदगुणांचे महत्व कळलेले / भेदभाव न करणारे / नीतीमत्ता धरुन ठेवणारे / सर्वांना मित्र समजून मदत करणारे सारेच वृक्ष कसे उठून दिसतात.
असो ... कविता छान आहे.
- दिपोटी
24 Oct 2010 - 10:34 am | गंगाधर मुटे
धन्यवाद दिपोटीजी.
20 Oct 2010 - 8:47 pm | मदनबाण
सुंदर कविता... :)
20 Oct 2010 - 10:57 pm | यशवंतकुलकर्णी
जे न देखे रवि, ते-ते देखे कवि!
झाडाकडं पाहिल्याचं सार्थक झालं! :)
21 Oct 2010 - 9:18 am | फ्रॅक्चर बंड्या
सुंदर...
21 Oct 2010 - 10:41 am | चिगो
येकदम मस्त आहे बावा...
21 Oct 2010 - 2:43 pm | llपुण्याचे पेशवेll
सुंदर कविता मुटेसाहेब.
21 Oct 2010 - 6:19 pm | मूकवाचक
अप्रतिम कविता, मुटे साहेब.
21 Oct 2010 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता......!
-दिलीप बिरुटे
23 Oct 2010 - 10:27 am | पाषाणभेद
एकदम मस्त कविता मुटेसाहेब
24 Oct 2010 - 10:40 am | वेताळ
बहिणाबाईंच्या कवितेची आठवण झाली.
25 Oct 2010 - 10:29 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद मित्रांनो. :)
26 Oct 2010 - 4:43 am | मराठमोळा
मस्त कविता. :)