Skip to main content

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

Published on बुधवार, 20/10/2010
आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....! अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....! पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....! कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....! मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण कुर्‍हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....! सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....! गंगाधर मुटे ......... **.............. **............. **.............
लेखनविषय:

वाचन संख्या 2778
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अतिशय छान आशय असलेली कविता ... कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....! वाचुन हसु आले एक्दम .. आणि आम्हाले असे छानसे विदर्भ भाषेत लिहिलेले वाचायला दिल्याने धनवाद

कविता आवडली . सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....! झाडाच्या संदर्भात , ह्या कडव्याचा अर्थ लागला नाही . बाकी ऊत्तमच.

In reply to by तर्री

मला लागलेला अर्थ असा : ग्रंथ, पुराणे वा पुस्तके वाचून व त्यातील ज्ञान / विचारधन मिळवूनही भेदभाव करणार्‍या / नीतीमत्ता सोडलेल्या 'माणसा'च्या अवगुणांच्या पार्श्वभूमीवर असे काहीही न वाचून सुध्दा सदगुणांचे महत्व कळलेले / भेदभाव न करणारे / नीतीमत्ता धरुन ठेवणारे / सर्वांना मित्र समजून मदत करणारे सारेच वृक्ष कसे उठून दिसतात. असो ... कविता छान आहे. - दिपोटी

अप्रतिम कविता, मुटे साहेब.

आवडली कविता......! -दिलीप बिरुटे

धन्यवाद मित्रांनो. :)