अरुंधती !!

अनिल हटेला's picture
अनिल हटेला in जनातलं, मनातलं
19 Oct 2010 - 10:15 pm

नमस्कार मिपाकर्स !!

गेले २-३ दिवस गणपाभै नी टाकलेल्या भयपटा च्या धाग्यावर वेगवेगळे प्रतीसाद वाचले.अजुनही धागा पहील्या पानावरच आहे.आलेले सारे प्रतीसाद हा लेख लिहुन (हो ! हो ! तेच ते टंकून!!) होईपर्यंत ईंग्रजी आणी हिंदी चित्रपटाबद्दलच माहीती देतायेत.साधारण रोख हाच दिसतोये की किळसवाणी,हीडीस ( टार्‍याचा ही+ ही नाही ;-) ) शीनेमे नकोयेत किंवा पहावत नाहीत ...
ह्या पाश्र्वभुमीवर तेलुगु मध्ये बनलेला अरुंधती सिनेमा नक्कीच करमणुक प्रधान आणी उत्तम भयपट आम्हास वाटतो...

अरुंधती !!
A1
अगदीच हॉरर म्हणवण्यापेक्शा उत्तम भयपट असं म्हनणं सयुक्तीक ठरेल!!

चित्रपटाचं सार असं आहे की एखाद्या मॄत व्यक्तीचा आत्मा अनाठायी अतृप्तावस्थेत जग सोडून जात नाही.(जसे मिपावरचे बरेचशे ब्लॉक्ड आयडी !!) :-D

अनुष्का उपरोक्त चित्रपटात दोन भूमिकात आहे.१९२० च्या काळातील अरुंधती (उर्फ जेजेम्मा) आणी चालू वर्षातील साधारण स्त्री.
गढवालच्या राजाच्या तिसर्‍या पीढीत जन्मलेली अरुंधती,जीच्या लग्नाची तयारी सुरु असते.लहाणपणापासूनच हैद्राबादेत राहणार्‍या अरुंधतीला गढवाल मध्ये यावं लागतं गढवालच्या त्या जुनाट,शापीत किल्ल्यात! तीच्या होणार्‍या यजमानांचा तसा तीला भ्रामक फोन कॉल येतो आणी सुरु होते खर्‍या अर्थाने कहाणी.....

फोन कॉल मध्ये राहुल(अर्जुन बाजवा) म्हणजेच अरुंधतीचे यजमान संकटात आहेत आणी त्याला मदतीची गरज आहे असं तीला जाणवतं.किल्ल्यात प्रवेशताच तीला आतुन राहुलचा आवाज ,मदतीची याचना ऐकु येत असते.अचानकच अन्वर (सयाजी शिंदे) तीला त्या किल्ल्यातुन बाहेर आणतो आणी ह्या सर्व अमानवी गोष्टींपासून दुर ,गढवाल पासुन दुर जाण्याची सुचना देतो.अन्वर हा एक फकीर आहे.अर्थातच विसाव्या शतकातील अरुंधती त्याच म्हणन ऐकत नाही ,तीचे होणारे पतीदेव आत आहेत आणी त्यांन माझ्या मदतीची गरज आहे हेच सांगत रहाते.

गढवालातल्या वॄद्ध नोकराणी कडून तीला समजतं की ती स्वतः तीन पीढ्या आधीची रुढार्थाने महान आणी सशक्त आजीची प्रतीकॄती आहे.
जेजम्म उर्फ अरुंधतीची आजी (पून्हा अनुष्का!! :-)) गायन ,नॄत्य आणी तलवारबाजी वगैरे गोष्टीत निपून आहे.
A2
तीच्या मोठ्या बहीणीचं लग्न वडीलाचा पुतण्या पशुपती(सोनु सूद) सोबत होतं.पशुपती एक नंबरचा womaniser ( प्रतीशब्द?) आणी नकार दिल्यास देहांत देणारा असा सणकी किलर!!
अरुंधतीची बहीण सार्‍या जाचाला आणी पती म्हणवणार्‍याला कंटाळून आत्महत्या करते .
अरुंधतीच्या आज्ञेवरून पशुपतीची गढवालच्या जनतेकडून मरेपर्यंत धुलाई होते.अगदी मरणासन्न अवस्थेत पशुपतीला घोड्याला बांधुन राज्याबाहेर हाकललं जातं.जेणे करून त्याचा मृत्यु त्याला केलेलं एकेक पाप नजरेसमोर आणुन देइन.सारी जनता पशुपतीच्या मॄत्युचा आनंद मनवते.आता राज्याचा कारभार आपल्या हातात घेउन अरुंधती उत्तम राज्य चालवत असते.
A4

पण पशुपतीला काही अघोरी वाचवतात आणी प्रतीशोधाच्या उर्मीनी स्वतः पशुपती अघोरी विद्येत पारंगत होतो.
A5

काही वर्षानी गढवालात पशुपती परततो आणी बदला घेण्यासाठी बर्‍याच निरपराधाना मारतो.एक अघोरी आपल्या बोटांच्या तालावर आणी अस्फुट मंत्रओच्चाराने मॄत्युचा खेळ चालवतो.अरुंधती/जेजम्माला सुद्धा त्याच्या त्या अलौकीक शक्ती समोर काही काळ स्थानबद्ध व्हावं लागतं.
A3
त्यावेळी तीथे उपस्थीत एक साधु तीला ह्सामोरं जाउन युद्ध करु नकोस असा सल्ल देतात.पण नॄत्य,युद्ध कलात पारंगत जेजम्मा आपल्या विशेष नृत्याच त्याला जेरबंद करते त्याचे हात ,पाय आणी जीभ बंद करुन टाकते.कारण त्याला जीवे मारल्यास तो एखाद्या सैतानात परीवर्तीत व्हायची भीती असते.किल्ल्यातच त्याचं थडगं बांधलं जातं आणी वेगवेगळ्या होम-हवन आणी मंत्र -मंत्राद्वारे त्याला कायमचं बंदीस्त करण्यात येतं.पण चार्च दिवसानी थडग्यातल्या पशुपती मरण पावतो आणी तुझं गढवाल बरबाद होइल,मी कधी ना कधी ह्या थडग्यातुन बाहेर येउन पून्हा आपला सूड पूरा करीन असा आक्रोश करत रहातो.

हे सारं फ्लॅशबॅक मध्ये आजच्या अरुंधतीस वॄद्धा सांगत असते,आणी तीकडे एकजण आपल्या पत्नीच्या शोधात,जी त्याच किल्ल्यात हरवलीये, सैतानी अमलाखाली थडगं तोडतो....
इथे पशुपती (आत्मा/भूत ) पून्हा एकदा बाहेर पडतो..

कधी फ्लॅशबॅक तर कधी सद्य स्थीती अशा तर्‍हेने सीणेमा शेवट पर्यंत खिळवून ठेवतो.
मूळात हे चित्रपटाचं परीक्षण नसून निव्वळ ओळख करुन देण्याचा प्रमाणीक प्रयत्न आहे ,हे लक्शात घ्या!

पशुपती कधी ना कधी मोकळा होणार आहे,आणी त्याला आवरणं किंवा संपवण आपल्याला किंवा आपल्या पुढल्या पीढीला अवघड जाणार म्हणुन आधीच अरुंधती सुद्धा अघोरी विद्येद्वारे त्याला संपवायची तजवीज करुन जाते .राज्य सोडण्या आधीच " आपल्या पीढीत जन्माला येणारी पहीली मुलगी मीच असेन ,तीला माझं नाव द्या,असं समजा की ती मीच आहे आणी तीचा प्रत्येक शब्द आज्ञा समजुन वागा " असं आधीच सांगुन गेलेली जेम्ममा कशा पद्धतीने शस्त्र बणवते ,हे ईथे सांगणे म्हणजे अवघड आहे.

त्यासाठी थोडा वेळ काढुन सीनेमा बघाच,अशी मी शिफारस करीन....

एकंदर चित्रपट वेगवान आहे ,उत्तम कथानक ( वरचं कथानक म्हणजे फक्त बेसीक माहीती आहे बरं!)
उत्तम दिग्दर्शन असा त्रिवेणी संगम म्हणाता येइल.
अनुष्काने दोन्हीही भूमीका लाजवाब केल्या आहेत .तोडीस सोनु सूद नावाच्या हिंदी चित्रपटात टक्याचा अभिनय येत नसलेल्या ठोंब्याने अगदी टक्कर दिली आहे..( त्याच्या बोम्माली वर तर आपण फूल्टूस फीदा!) आपले मराठी कलाकार सयाजी शिंदे अन्वरच्या भूमेकेत अगदी चपखल बसतायेत.ईतर मंडळी आपापल्या ठीकाणी ठिक- ठाक आहेत....

२००९ साली झळकलेला हा चित्रपट निर्विवाद मनोरंजक आहे !!

(उपरोक्त लेखात अनुष्काचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल तात्या एक डाव माफी देतीलच !!) :-)

कलामुक्तकचित्रपटप्रकटनविचारलेखमतप्रतिसादशिफारसमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

20 Oct 2010 - 2:24 am | प्रियाली

हा चित्रपट कधी मी ना ऐकला ना पाहिला पण हॅलोवीनसाठी आधी एक कथा लिहित होते तिच्यात या कथेसारखं थोडसं साम्य वाटलं. नंतर ती कथा मला पुढे चालवता येईना म्हणून टाकून दिली आणि दुसरी लिहायला घेतली. :(

गंमत आहे.

बायदवे, चित्रपट इंग्रजी सबटायटल्ससह नेटावर आहे का? बघून माझ्या कचर्‍याच्या टोपलीत गेलेल्या गोष्टीला झिलई देता आली तर बघते. ;)

वा छान ओळख. सिनेमाला इंग्रजी सबटायटल्स आहेत का ? म्हणजे बघताना सोपे पडेल. जमल्यास लिंक पण द्या .

नगरीनिरंजन's picture

20 Oct 2010 - 8:26 am | नगरीनिरंजन

अनुष्का कोण?

प्राजु's picture

20 Oct 2010 - 8:52 am | प्राजु

घ्या!! सांगा यांना आता!!

स्पंदना's picture

20 Oct 2010 - 9:12 am | स्पंदना

मला पण सांग

की विचारु परत?

अनुष्का कोण? ( एव्हढी तात्यांची माफी मागण्या जोगी..अनुष्का कोण?)

यशवंतकुलकर्णी's picture

20 Oct 2010 - 9:19 am | यशवंतकुलकर्णी

वरचा
अनुष्का कोण?
हा प्रश्न आणि
"घ्या, सांगा यांना आता!"
हे दिलेलं उत्तर वाचून मिपा हा प्रत्येक सदस्याचा विश्वव्यापी दिवाणखाणा आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं!
अगदी बैठकीत बसून म्हटल्यासारखं "घ्या, सांगा यांना आता!"

लिंक्सबद्दल थांक्यू!

स्पंदना's picture

20 Oct 2010 - 9:15 am | स्पंदना

अनिल भाय तुमना बहोत श्टोरी बताई फिर हम क्या देखनेका?

इत्ता नय बताने का भाय । थोडा तो सस्पेन्स रखनेका । क्या भाय? तुमने तो पुरी श्टोरी को खुंदल खुंदल के मार्‍या ।

सुहास..'s picture

20 Oct 2010 - 2:25 pm | सुहास..

अनिल एक नंबर परिक्षण रे !! एखाद्या तेलगु मित्राला पकडुन 'अरूंधती' बघायला पाहिजे ..

नेत्रेश ...लिकांबद्दल धन्यवाद !!

नंदन's picture

20 Oct 2010 - 3:38 pm | नंदन

एका तेलगू मित्राच्या घरी पाहिला अलीकडेच. टाईमपास आहे. परीक्षणात म्हटल्याप्रमाणे वेगवान हाताळणी, अनुष्का आणि सयाजी शिंदेंचा अभिनयही चांगला. बाकी सोनू सूदचा ठोंब्या अभिनय आणि इतर पात्रांचा टिपीकल भडक, लाऊड अभिनय आहे. कथा तशी वेगळी आहे, पण बाकी डिटेल्स हॉलिवूडपटांतून ढापले आहेत (उदा. तलवारबाजी --> बहुतेक डेथ ट्रान्स, पाण्याच्या ओघळाने पाठलाग करणे --> फायनल डेस्टिनेशन, छतावर फिरणारी मुलगी ---> ग्रज इ. इ.). गेल्या वर्षी मगधिरा ह्या चिरंजीवीपुत्राच्या पिक्चरखालोखाल याच चित्रपटाने सर्वात अधिक नफा मिळवला होता म्हणे.

प्रियाली's picture

20 Oct 2010 - 6:07 pm | प्रियाली

काल यूट्यूबवर बघायला सुरूवात केली. टाईमपास आहे पण सोनू सूद आणि त्याच्या लंपटपणातला बटबटीतपणा हास्यास्पद आहे. अनुष्का मात्र आवडली बॉ आपल्याला. ;) मी पाहिलेला तिचा हा पहिलाच चित्रपट.

अनिल हटेला's picture

21 Oct 2010 - 8:55 pm | अनिल हटेला

लिंक दिल्याबद्दल स्पासीबा नेत्रेश !! ;-) (धन्यवाद !)

अनिल भाय तुमना बहोत श्टोरी बताई फिर हम क्या देखनेका?
--> लेकीन ये फूल ष्टोरी हैच नै !! :-)

एखाद्या तेलगु मित्राला पकडुन 'अरूंधती' बघायला पाहिजे .
---> मित्र नसेल तर मैत्रीणही चालेल ! उत्तम ट्रांसलेटर असल्याशी मतबल काय !! :-D

अनुष्का मात्र आवडली बॉ आपल्याला.
--->भयालीतैशी बाडीस !! :-)

कथा हॉलीवूड पटातुन नाही ढापलेली. हो, काही करामती (स्पेशल ईफेक्ट्स )ढापले आहेत.पण ते तर चालायचेच.त्याबाबतीत नंदनशी सहमत..

काही अपरीहार्य कारणाने प्रतीसाद द्यायला (मिपावर लॉगईन व्हायला) वेळ लागला ,म्हणुन हा प्रपंच!!