प्रेम..जगावेगळे...

अथांग's picture
अथांग in जे न देखे रवी...
12 Oct 2010 - 12:22 am

मंडळी, या कवितेला नाव सुचत नाहीये किंवा जे सुचलेय ते रुचत नाहीये. मदत कराल प्लीज ?

तिने चांगलाच धरला हट्ट....
म्हणाली, कसही कर आणि दे मला..
तुझ्या टपोर अक्षरमोत्यांची भेट..
युगं उलटलीत त्यांना बघून..
भकासलेल्या डोळ्यांत साठवून
मिरवेन त्यांना दागिन्यासारखे,
मग डोळेही माझे चमकतील
बघ एका वेगळ्याच तेजाने..
.....
.......
त्यालाही आणायचेच होते परत
तिच्या डोळ्यातील हरवलेले
ते झळाळ-क्षण..
मनातील सर्व भावभावनांना
गुंफित अक्षरमोत्यात त्यानेही
मग उधळून दिले..
त्याच्याकडे होते-नव्हते ते सगळे..
कोणा-कोणालाच कळले नाही,
हे प्रेम त्यांचे जगावेगळे !!

कविता

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 2:19 am | जाई अस्सल कोल्हापुरी

मस्त......
खुप सही.....
थोड्या शब्दात्.... खुप उत्कट भाव !

मनीषा's picture

12 Oct 2010 - 8:09 am | मनीषा

सुरेख !

kamalakant samant's picture

12 Oct 2010 - 11:25 am | kamalakant samant

अ-क्षर दान
हे नाव कसे वाटते?

साम॑त

अथांग's picture

12 Oct 2010 - 9:24 pm | अथांग

धन्यवाद !!
पण अ नन्तर - का? आणि ही अधिकाराने मागितलेली प्रेमभेट आहे, आणि तशीच उधळून दिलेली, मग 'दान' कसे?

kamalakant samant's picture

14 Oct 2010 - 12:05 pm | kamalakant samant

अक्षर म्हणजे जे क्षर नाही ते म्हणजेच कायम टीकणारे.
दुसरा अर्थ म्हणजे आपण लिहीतो ते.
दोन्ही अर्थ अ-क्षर मध्ये समाविश्ट होतात.

अथांग's picture

16 Oct 2010 - 5:17 am | अथांग

नुसते 'अ-क्षर' असेच नाव द्यायला आवडेल कवितेला..

काव्यवेडी's picture

14 Oct 2010 - 12:10 pm | काव्यवेडी

प्रत्येकाचे प्रेम हे त्याच्या साठी जगावेगळेच असते.
त्यामुळे प्रेम....जगावेगळे ..... हे नाव ही उचित वाटत आहे.
सुन्दर कल्पनेची सुन्दर कविता !!!!!!!!!!!!!!!१