Skip to main content

प्रेम..जगावेगळे...

लेखक अथांग
Published on मंगळवार, 12/10/2010
मंडळी, या कवितेला नाव सुचत नाहीये किंवा जे सुचलेय ते रुचत नाहीये. मदत कराल प्लीज ? तिने चांगलाच धरला हट्ट.... म्हणाली, कसही कर आणि दे मला.. तुझ्या टपोर अक्षरमोत्यांची भेट.. युगं उलटलीत त्यांना बघून.. भकासलेल्या डोळ्यांत साठवून मिरवेन त्यांना दागिन्यासारखे, मग डोळेही माझे चमकतील बघ एका वेगळ्याच तेजाने.. ..... ....... त्यालाही आणायचेच होते परत तिच्या डोळ्यातील हरवलेले ते झळाळ-क्षण.. मनातील सर्व भावभावनांना गुंफित अक्षरमोत्यात त्यानेही मग उधळून दिले.. त्याच्याकडे होते-नव्हते ते सगळे.. कोणा-कोणालाच कळले नाही, हे प्रेम त्यांचे जगावेगळे !!
लेखनविषय:

वाचन संख्या 1658
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त...... खुप सही..... थोड्या शब्दात्.... खुप उत्कट भाव !

अ-क्षर दान हे नाव कसे वाटते? साम॑त

In reply to by kamalakant samant

धन्यवाद !! पण अ नन्तर - का? आणि ही अधिकाराने मागितलेली प्रेमभेट आहे, आणि तशीच उधळून दिलेली, मग 'दान' कसे?

अक्षर म्हणजे जे क्षर नाही ते म्हणजेच कायम टीकणारे. दुसरा अर्थ म्हणजे आपण लिहीतो ते. दोन्ही अर्थ अ-क्षर मध्ये समाविश्ट होतात.

In reply to by kamalakant samant

नुसते 'अ-क्षर' असेच नाव द्यायला आवडेल कवितेला..

प्रत्येकाचे प्रेम हे त्याच्या साठी जगावेगळेच असते. त्यामुळे प्रेम....जगावेगळे ..... हे नाव ही उचित वाटत आहे. सुन्दर कल्पनेची सुन्दर कविता !!!!!!!!!!!!!!!१