कधी येशील तू?
मी तुझी वाट बघतोय
आभाळ भरून आलंय
ढगही गडगडताहेत
माझ्या मनातला टाहो
जणू तेच व्यक्त करताहेत
बघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय
तु नाही आलीस तर
लवकरच ते रडायला लागेल
त्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल
पण मी रडणार नाही
त्याला साथ देणार नाही
आणि
जर आलच रडायला तर
सरळ पावसात भिजत राहीन
कोणालाच माझे अश्रू दिसू देणार नाही
कारण
माझ्या रडण्याचे बोल तुला लावलेलं
मला सहन होणार नाही