Skip to main content

लावणी: जाल हो राया उद्या

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 26/08/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी: जाल हो राया उद्या
जाल हो राया उद्या,रात आजची खास शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||धृ|| हात नका धरू हाती, सोडा मज थोडी लांब नाही जायची नको ओढा ओढी तुमच्या अशा वागण्यानं वेगळं वाटं खास शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||१|| तुम्ही शेवंती गजरा आणला मला माळला शुर रसीक पाहूनी तोरा जिव भाळला कसं जगावं तुम्हावीण लागली तुमची आस शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||२|| कालच्या दिशी वाट पाहीली, भेट राहीली नजरेनं घायाळ केलं, काया तुम्हा वाहीली नका जावू आता, पुढ्यात ओतली ज्वानीची रास शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २६/०८/२०१०
काव्यरस

वाचने 964
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

काय चाबुक लिहीलयस गड्या तू !