घट्ट काळोखातून वाट काढत
प्रकाशाचा पाठलाग करणारा मी आहे.
अथांग सागरातून बुडी मारुन
अनमोल मोती मिळवणारा मी आहे.
अवघं आसमंत माझ्या मुठीत
बंदिस्त करु शकणारा मी आहे.
स्वतःच्या तेजाने सूर्यालाही
झाकोळून टाकणारा मी आहे.
माझी गती एवढी
प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा मी आहे.
मुठीत आहे माझ्या सामर्थ्य...
दुनियेला चकीत करणारा मी आहे.
तल्लख बुद्धीच्या जोरावर सार्या
जगावर अधिराज्य गाजवणारा मी आहे.
नवनवीन संशोधन करुन निसर्गाचे
गुपित उलगडणारा मी आहे.
स्वतःच्या स्वप्नातलं छोटसं घरं
चंद्रावर बांधणारा मी आहे.
माझा प्रभाव इतका
वाहत्या पाण्याला थांबवणारा मी आहे.
कोणत्याही परिस्थितीत खचुन न जाता
पर्वताप्रमाणे अचल राहणारा मी आहे.
विश्व कवेत घेतांना माणुसकी
न विसरलेला मी आहे...
मी आहे एकविसाव्या शतकातील तरुण
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 11:19 am | पॅपिलॉन
आशावादी भाव आवडला परंतु कविता न मुक्तछंदातील न छन्दबद्ध!
7 Aug 2010 - 1:12 pm | लिखाळ
ह्म्म...छान
काळोख कसला? असा काळोख खरेच जाणवतो का?
यावरुन आठवले - बाबा आमटे (?) यांची माणूस म्हणून कविता पाठ्यपुस्तकात होती.
माणूस माझे नाव
बिंदूमात्र मी क्षुद्र खरोखर
परि जिंकले सातही सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नियान मम घेत चालले
आकाशाचा ठाव
.... अजून कडवी आहेत