लख्ख

अर्धवट's picture
अर्धवट in जे न देखे रवी...
7 Aug 2010 - 10:04 am

लेकराला मायेच्या ह्या मायेची तहान
मायेनेच दिला सूर, उजळाया रान
आजीच्या कवतिकाचा सोनियाचा तोडा,
आईच्या पदराचा आधारही थोडा
मायेच्या गावाला या नाहीच किनारा
मऊशार पंखाखाली साजिरा निवारा.

थोडी आभाळात आता नवी दिशा दिसे.
नव्या क्षितिजाचे मला लागलेले पिसे.
नव्या नव्या पंखाना या भरारीची आस
कधी स्वच्छ सूर्य, कधी ससाण्याचा भास
खोलखोल दरी आणि माणसे निश्चेत
प्रेमानेच सावरले पुन्हा घेऊन कवेत

मायेनेच दिले लख्ख, मायेनेच प्राण
मायेचाच ठेवा आता, नाही काळा क्षण.

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

7 Aug 2010 - 1:03 pm | अवलिया

सुरेख !!

छान..
आईच्या पदराचा आधार थोडा.. म्हणजे काय?/असे का?
आणि 'माणसे निश्चेत' म्हणजे काय?

कविता आवडली. छान आहे.

अर्धवट's picture

7 Aug 2010 - 6:48 pm | अर्धवट

>>आईच्या पदराचा आधार थोडा

म्हणजे अनेक प्रेमाच्या व्याख्यांपैकी ती एक आहे म्हणुन, 'तोपण' ह्या अर्थी

>>'माणसे निश्चेत'

चेतनाहीन, प्रेत असा अर्थ अपेक्षीत आहे.

आवडली कवीता.
पण लिखाळरावांना पडलेले प्रश्न मलाही पडलेत.

आईच्या पदराचा आधार थोडा..

इथे थोडा हा शब्द फक्त यमकासाठी वापरलाय की अजुन काही अर्थ अभिप्रेत आहे ?

पॅपिलॉन's picture

8 Aug 2010 - 5:25 pm | पॅपिलॉन

कविता ठीक पण कल्पना विसंगत. मायेचे असे दमदार पाश असलेला आभाळात उंच भरारी काय मारणार? मायेचे पाश तोडावेच लागतात, भरार्‍या घेण्यासाठी....

दत्ता काळे's picture

8 Aug 2010 - 6:04 pm | दत्ता काळे

कधी स्वच्छ सूर्य, कधी ससाण्याचा भास
( म्हणजे कधी मुक्तपणे संचार करण्याचा आनंद ( म्हणजे सुरक्षितता ), तर कधी वाईट सावटाची छाया, असेच आहे नां ? )
.. हि कल्पना आवडली, पण शब्द असे असते तर .. ?

कधी स्वच्छंदी आभाळ, कधी ससाण्याचा भास

काका, तुम्ही संगितलेलं जास्त चांगलं वाटतय. मला पण मुळ कवितेत घालुन वाचल्यावर आवडलं.
पण त्या क्षणी जशी अनुभुती होती तसं लिहिलय.