मात्रा

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
21 Jun 2010 - 5:56 am

शाळा सुरु होउन आता आठवडा उलटलाय. महिन्या-दिड महिन्याच्या सुट्टी नंतर पालाक आणि त्यांचे पाल्य परत त्यांच्या रहाटाला जुंपलेत. पाउसही अधुन मधुन हजेरी लावुन जातोय. या वर्षापासुन लेकीच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल झालाय. गेल्या वर्षी ८ ते १२:३० पर्यंत असणारी शाळा आता ९ ते ३ पर्यंत केली आहे. त्यामुळे बर्‍याच मुलांच वेळापत्रक साफ बिघडलय.
पुर्वी १ वाजता घरी पोहोचल की १ तास खाउन पिउन आणि थोडावेळ खेळुन २ च्या आसपास मस्त ताणुन द्यायची. मग संध्याकाळी फ्रेश झाल्यावर थोडावेळ सवंगड्यां सोबत बाहेर खेळणं, १/२ तास टिव्हीवर टॉम अँड जेरी, मग थोडा वेळ हसत खेळत अभ्यास. सगळ कसं सुरळीत चाललेल. पण आता बिचारीला घरी पोहोचतानाच ३:३० होतात. मग कसबस दोन घास खाल्ले की झोप येइस्तो ४ - ४:३० होतातच. किमान तास दिडतासाची झोप अपेक्षीत असते. (कारण शाळा जरी ९ ची असली तरी बस ८ लाच येते. त्यामुळे ७ला उठुन सगळ आटोपाव लागतं.) मग झोप पुर्ण होत नाही. दहा-दहा वेळा विनवण्या कराव्या लागता की बास आता. खेळायला वेळ पुरत नाही. त्यामुळे तिची चीड चीड होते.

परवा अशीच ती चीडली. ऐकेच ना. आदळ आपटं. आधी समजावुन पाहिल. पण जेव्हा त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा मग आईचा पारा चढला. चांगल तासभर लेक्चर चालल होतं. रात्र झाली होती सकाळी परत लौकर उठायच. त्यामुळे तो विषय तिथेच संपला.
सकाळी शाळेची तयारी चालु असताना ती हळुच पुटपुटली "बाप्पा मला लवकर मोठ्ठं कर." बसची वेळ होत आली होती त्यामुळे आईने विषय वाढवला नाही.
त्या संध्याकाळी तिने लेकीला जवळ घेतलं. सहज गप्पांच्या ओघात विचारल की "का ग सकाळी असं का म्हणालीस?"
त्यावर लेक म्हणाली की " मोठ्ठ्यांना कुणी रागवत नाही. लहानांनाच सगळे ओरडतात. काल मला तु कित्ती -कित्ती बोललीस. एकच गोष्ट कंटाळा येई पर्यंत सांगत होतीस."

आईला वाईट वाटल. तीनं तीची चुक मान्य केली. "I'm sorry. खरचं पिट्या जरा जास्तच बोलले मी तुला. जशी मोठी माणस लहानांच्या चुका दाखवुन देतात तस लहानांनी ही जर मोठी माणसं चुकत असतील तर योग्य रीतीने सांगाव. मला बर वाटल तु हे माझ्याशी बोललीस. " एव्हाना लेकही खुष झाली.
आई पुढे म्हणाली, "तुला माझ्या सतत एकच गोष्ट बोलण्याचा कंटाळा आला ना, ठिक आहे. या पुढे मी तुला काहीही सांगायच असेल तर फक्त एकदाच सांगेन. दुसर्‍यांचा चुकुन पण बोलायचे नाही. पण मग तुझ तुलाचं कळल पाहिजे की आता आपण कुठे थांबायच ते."
लेक गुणी आहे. तिलाही जाणीव आहे आई नक्कीच आता दुसर्‍यांदा हाक मारणार नाही. तेव्हा पासुन सगळी काम एका हाकेत पुर्ण होतायत.

सध्यादोनच दिवस झालेत पन ही मात्रा पुरे पुर लागु पडली आहे.
पाहुया अजुन किती दिवस टिकते.

मौजमजाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

सहज's picture

21 Jun 2010 - 6:33 am | सहज

आधी वाटले की बल्लवाचार्य पदार्थ उत्तम होण्याकरता, कुठला जिन्नस किती मात्रा असावा असा काही सल्ला देतायत.

पण हेही मस्त! अगदी युनिव्हर्सल आहे हो, सगळ्याच मुलांना वाटते आपले पालक जरा जास्तच बोलतात / नॅग करतात. :-)

शानबा५१२'s picture

21 Jun 2010 - 9:11 am | शानबा५१२

"बाप्पा,मल परत छोट कर!".............

वावा काय दीवस होते ते!!

बाकी हा टाइम फारच चुकीचा आहे.काय मैलामैलांवर शाळा नाहीये का की ही अशी वेळ ठेवावी लागते??

मी(जर आपल्या जागी असतो तर) फक्त ह्या अशा वेळापत्रकामुळे गरज पडल्यास शाळा बदलताना पण विचार केला नसता!

सध्यादोनच दिवस झालेत पन ही मात्रा पुरे पुर लागु पडली आहे.
पाहुया अजुन किती दिवस टिकते.

:) :) इथे मोठ्यांना संकल्प मोडायला पण जास्त दीवस लागत नाहीत्,ही तर छोट्या मुलीची कथा! पण असच चालु राहण्यास आपल्याला शुभेच्छा!

गणपा's picture

21 Jun 2010 - 7:15 pm | गणपा

सीबीएसी शाळा नाहीत हो मैला मैलावर.
(आता म्हणाल की का मराठी/महाराष्ट्र बोर्डाच्या शाळा नाहित का.
याला उत्तर .....मजबुरी आहे.)
असो पण शाळा तशी ही लांब नाहीच हो. रिक्षाने १५ मिनिटावर आहे.
पण बस सगळ्या मुलांना घेत घेत जाते त्यामुळे १ तास मोडतोच आणि जर ट्रॅफिक असल तर मग काय बघायलाच नको.

टारझन's picture

21 Jun 2010 - 10:07 am | टारझन

टची !!

रेवती's picture

21 Jun 2010 - 8:12 pm | रेवती

थोडी वर्षे थांब टार्‍या!
मुलांच्या सकाळच्या शाळा आणि पालकांची पळापळी यांचा अनुभव नाही तुला!

रेवती

टारझन's picture

21 Jun 2010 - 9:36 pm | टारझन

म्हणुनंच मी आयबापाला सोडुन र्‍हाणार णाये :)

गणपा's picture

21 Jun 2010 - 9:38 pm | गणपा

=))
साला मतलबी
=))

चतुरंग's picture

21 Jun 2010 - 9:54 pm | चतुरंग

मोठ्ठे व्हा!!! ;)

चतुरंग

रामदास's picture

21 Jun 2010 - 10:16 am | रामदास

कळा सहन कराव्या लागतात.
हो, तरी अजून परीक्षेचे दिवस यायचे आहेत.

प्रभो's picture

21 Jun 2010 - 6:39 pm | प्रभो

:)

अरुंधती's picture

21 Jun 2010 - 6:49 pm | अरुंधती

लहान मुलांचे निरागस बोल मोठ्यांना बर्‍याच गोष्टी शिकवून जातात, नै? :-) छान अनुभवकथन.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

रेवती's picture

21 Jun 2010 - 8:10 pm | रेवती

ही मात्रा पुरे पुर लागु पडली आहे.
नेहमी असेच राहण्यासाठी शुभेच्छा!
मुली कदाचित मुलांपेक्षा लवकर ऐकतात असे वाटते (नक्की माहित नाही).

रेवती

शुचि's picture

21 Jun 2010 - 9:38 pm | शुचि

नेहमी असेच राहण्यासाठी माझ्यातर्फेदेखील शुभेच्छा!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||