✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मात्रा

ग
गणपा यांनी
Mon, 06/21/2010 - 05:56  ·  लेख
लेख
शाळा सुरु होउन आता आठवडा उलटलाय. महिन्या-दिड महिन्याच्या सुट्टी नंतर पालाक आणि त्यांचे पाल्य परत त्यांच्या रहाटाला जुंपलेत. पाउसही अधुन मधुन हजेरी लावुन जातोय. या वर्षापासुन लेकीच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल झालाय. गेल्या वर्षी ८ ते १२:३० पर्यंत असणारी शाळा आता ९ ते ३ पर्यंत केली आहे. त्यामुळे बर्‍याच मुलांच वेळापत्रक साफ बिघडलय. पुर्वी १ वाजता घरी पोहोचल की १ तास खाउन पिउन आणि थोडावेळ खेळुन २ च्या आसपास मस्त ताणुन द्यायची. मग संध्याकाळी फ्रेश झाल्यावर थोडावेळ सवंगड्यां सोबत बाहेर खेळणं, १/२ तास टिव्हीवर टॉम अँड जेरी, मग थोडा वेळ हसत खेळत अभ्यास. सगळ कसं सुरळीत चाललेल. पण आता बिचारीला घरी पोहोचतानाच ३:३० होतात. मग कसबस दोन घास खाल्ले की झोप येइस्तो ४ - ४:३० होतातच. किमान तास दिडतासाची झोप अपेक्षीत असते. (कारण शाळा जरी ९ ची असली तरी बस ८ लाच येते. त्यामुळे ७ला उठुन सगळ आटोपाव लागतं.) मग झोप पुर्ण होत नाही. दहा-दहा वेळा विनवण्या कराव्या लागता की बास आता. खेळायला वेळ पुरत नाही. त्यामुळे तिची चीड चीड होते. परवा अशीच ती चीडली. ऐकेच ना. आदळ आपटं. आधी समजावुन पाहिल. पण जेव्हा त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा मग आईचा पारा चढला. चांगल तासभर लेक्चर चालल होतं. रात्र झाली होती सकाळी परत लौकर उठायच. त्यामुळे तो विषय तिथेच संपला. सकाळी शाळेची तयारी चालु असताना ती हळुच पुटपुटली "बाप्पा मला लवकर मोठ्ठं कर." बसची वेळ होत आली होती त्यामुळे आईने विषय वाढवला नाही. त्या संध्याकाळी तिने लेकीला जवळ घेतलं. सहज गप्पांच्या ओघात विचारल की "का ग सकाळी असं का म्हणालीस?" त्यावर लेक म्हणाली की " मोठ्ठ्यांना कुणी रागवत नाही. लहानांनाच सगळे ओरडतात. काल मला तु कित्ती -कित्ती बोललीस. एकच गोष्ट कंटाळा येई पर्यंत सांगत होतीस." आईला वाईट वाटल. तीनं तीची चुक मान्य केली. "I'm sorry. खरचं पिट्या जरा जास्तच बोलले मी तुला. जशी मोठी माणस लहानांच्या चुका दाखवुन देतात तस लहानांनी ही जर मोठी माणसं चुकत असतील तर योग्य रीतीने सांगाव. मला बर वाटल तु हे माझ्याशी बोललीस. " एव्हाना लेकही खुष झाली. आई पुढे म्हणाली, "तुला माझ्या सतत एकच गोष्ट बोलण्याचा कंटाळा आला ना, ठिक आहे. या पुढे मी तुला काहीही सांगायच असेल तर फक्त एकदाच सांगेन. दुसर्‍यांचा चुकुन पण बोलायचे नाही. पण मग तुझ तुलाचं कळल पाहिजे की आता आपण कुठे थांबायच ते." लेक गुणी आहे. तिलाही जाणीव आहे आई नक्कीच आता दुसर्‍यांदा हाक मारणार नाही. तेव्हा पासुन सगळी काम एका हाकेत पुर्ण होतायत. सध्यादोनच दिवस झालेत पन ही मात्रा पुरे पुर लागु पडली आहे. पाहुया अजुन किती दिवस टिकते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4719 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

:-)

सहज
Mon, 06/21/2010 - 06:33 नवीन
आधी वाटले की बल्लवाचार्य पदार्थ उत्तम होण्याकरता, कुठला जिन्नस किती मात्रा असावा असा काही सल्ला देतायत. पण हेही मस्त! अगदी युनिव्हर्सल आहे हो, सगळ्याच मुलांना वाटते आपले पालक जरा जास्तच बोलतात / नॅग करतात. :-)
  • Log in or register to post comments

"बाप्पा,मल

शानबा५१२
Mon, 06/21/2010 - 09:11 नवीन
"बाप्पा,मल परत छोट कर!"............. वावा काय दीवस होते ते!! बाकी हा टाइम फारच चुकीचा आहे.काय मैलामैलांवर शाळा नाहीये का की ही अशी वेळ ठेवावी लागते?? मी(जर आपल्या जागी असतो तर) फक्त ह्या अशा वेळापत्रकामुळे गरज पडल्यास शाळा बदलताना पण विचार केला नसता!
सध्यादोनच दिवस झालेत पन ही मात्रा पुरे पुर लागु पडली आहे. पाहुया अजुन किती दिवस टिकते.
:) :) इथे मोठ्यांना संकल्प मोडायला पण जास्त दीवस लागत नाहीत्,ही तर छोट्या मुलीची कथा! पण असच चालु राहण्यास आपल्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सीबीएसी

गणपा
Mon, 06/21/2010 - 19:15 नवीन
सीबीएसी शाळा नाहीत हो मैला मैलावर. (आता म्हणाल की का मराठी/महाराष्ट्र बोर्डाच्या शाळा नाहित का. याला उत्तर .....मजबुरी आहे.) असो पण शाळा तशी ही लांब नाहीच हो. रिक्षाने १५ मिनिटावर आहे. पण बस सगळ्या मुलांना घेत घेत जाते त्यामुळे १ तास मोडतोच आणि जर ट्रॅफिक असल तर मग काय बघायलाच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

टची !!

टारझन
Mon, 06/21/2010 - 10:07 नवीन
टची !!
  • Log in or register to post comments

थोडी वर्षे

रेवती
Mon, 06/21/2010 - 20:12 नवीन
थोडी वर्षे थांब टार्‍या! मुलांच्या सकाळच्या शाळा आणि पालकांची पळापळी यांचा अनुभव नाही तुला! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

:)

टारझन
Mon, 06/21/2010 - 21:36 नवीन
म्हणुनंच मी आयबापाला सोडुन र्‍हाणार णाये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

साला मतलबी

गणपा
Mon, 06/21/2010 - 21:38 नवीन
=)) साला मतलबी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हॅ हॅ हॅ!

चतुरंग
Mon, 06/21/2010 - 21:54 नवीन
मोठ्ठे व्हा!!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

पालक होण्याच्या

रामदास
Mon, 06/21/2010 - 10:16 नवीन
कळा सहन कराव्या लागतात. हो, तरी अजून परीक्षेचे दिवस यायचे आहेत.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

प्रभो
Mon, 06/21/2010 - 18:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments

निरागस

अरुंधती
Mon, 06/21/2010 - 18:49 नवीन
लहान मुलांचे निरागस बोल मोठ्यांना बर्‍याच गोष्टी शिकवून जातात, नै? :-) छान अनुभवकथन. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ही मात्रा

रेवती
Mon, 06/21/2010 - 20:10 नवीन
ही मात्रा पुरे पुर लागु पडली आहे. नेहमी असेच राहण्यासाठी शुभेच्छा! मुली कदाचित मुलांपेक्षा लवकर ऐकतात असे वाटते (नक्की माहित नाही). रेवती
  • Log in or register to post comments

नेहमी असेच

शुचि
Mon, 06/21/2010 - 21:38 नवीन
नेहमी असेच राहण्यासाठी माझ्यातर्फेदेखील शुभेच्छा! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा